शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जनगणनेला विलंब म्हणजे समोरचा रस्ता दिसणे अवघड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 11:58 IST

जनगणना ही अनेक गोष्टींचा, धोरणांचा आधार असते. २०११ मध्ये भारतात जनगणना झाली. ती परत नेमकी कधी होणार, याबाबत आजही साशंकता आहे.

जनगणना हा कोणत्याही देशाच्या विकासातील मैलाचा दगड असतो. देशाच्या धोरण निर्मितीमध्ये जनगणना महत्त्वाची भूमिका बजावते. जनगणना ही देशातील सर्व व्यक्तींशी संबंधित लोकसंख्याशास्त्रीय, सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक माहितीचे (डेटा) संकलन, विश्लेषण व प्रसारण करण्याची प्रक्रिया आहे. पारतंत्र्यकाळात सन १८७१ पासून भारतात दर दहा वर्षांनी जनगणना होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५१ साली  नववी जनगणना झाली. भारतातील शेवटची जनगणना २०११ मध्ये झाली होती. या जनगणनेनुसार भारताची एकूण लोकसंख्या १२१ कोटी म्हणजे १.२१ अब्ज होती. २०२१ मध्ये पुढील जनगणना होणे अपेक्षित होते; परंतु, कोविडमुळे ती होऊ शकली नाही. आता तर जनगणनेस दोन वर्षे विलंब झाला आहे. भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकले आहे; पण अधिकृत जनगणना केल्याशिवाय भारताच्या लोकसंख्येविषयी नेमकी व अचूक आकडेवारी शोधणे फार कठीण आहे. अधिकृत जनगणनेमुळे भारतातील राज्यनिहाय लोकसंख्या, साक्षरता, लिंग गुणोत्तर, लोकसंख्येची घनता, शहरी व ग्रामीण लोकसंख्या, वयोगटानुसार लोकसंख्या, धर्म, जाती- जमाती व भाषानिहाय लोकसंख्या इत्यादी अनेक बाबींचे अचूक विवरण व विश्लेषण करता येते.भारतात शेवटची जनगणना झाली होती २०११ साली. म्हणजे साधारण १२ वर्षांपूर्वी.  सरकार सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे पात्र लोकांना रेशन पुरवते; पण देशात किती अन्नधान्याची गरज आहे, याचा अंदाज आजही २०११ सालच्या आकडेवारीवरून घेतला जात आहे. याशिवाय शैक्षणिक आणि आरोग्य व्यवस्था, पायाभूत सोयी-सुविधा उभारण्यासाठी किती निधी कुठे दिला जावा, याचा अभ्यासही वेळोवेळी करणे गरजेचे आहे, अन्यथा आवश्यक साधनसामग्रीचा पुरवठा अपुरा किंवा असंतुलित होऊ शकतो. सरकारच्या कल्याणकारी योजना ठरवतानाही या आकडेवारीचाच आधार घ्यावा लागतो. काही अर्थतज्ज्ञांच्या मते जनगणना न झाल्यामुळे सुमारे १० कोटी लोक सरकारी योजनांपासून वंचित राहत आहेत. जनगणनेला विलंब म्हणजे समोरचा रस्ता दिसणेच अवघड होते.खरेतर २०२१  च्या जनगणनेचा पहिला टप्पा २०२० साली  सुरू होणार होता; पण तेवढ्यात काेरोना आला आणि सगळेच थांबले; पण काेरोनाच्या आधीही जनगणना वादाचा मुद्दा बनलाच होता. २०१९  मध्ये सरकारने आणलेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा, त्यानंतर ‘नॅशनल पाॅप्युलेशन रजिस्टर’ अर्थात ‘एनपीआर’चा वाद, यामुळे देशात आंदोलने झाली. ‘इम्पिरिकल डेटा’ नसल्यामुळे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गेली दोन वर्षे न्यायालयात प्रलंबित आहे. काेरोनानंतरच्या काळात आता बऱ्याच गोष्टी सुरू झालेल्या असल्या तरीही जनगणना इतक्यात होण्याची शक्यताही कमीच आहे. जनगणनेच्या आधी सर्व राज्यांना त्यांच्याकडे किती जिल्हे, तालुका आणि गावे आहेत, याची माहिती ‘रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया’ला द्यावी लागते. त्यानंतर जनगणना सुरू होण्याच्या तीन महिन्यांपूर्वी प्रशासकीय सीमा गोठवल्या जातात, जेणेकरून जनगणना सुरू असताना कुठल्याही सीमा बदलल्या जाऊ नयेत आणि किती लोक कुठे राहतात, हे कळू शकेल; पण रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाने सीमा गोठवण्याची मुदत गेल्या दोन वर्षांत सातत्याने वाढवली आहे. त्यामुळे काहींना असंही वाटते की, २०२४ च्या उत्तरार्धात म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतरच  जनगणना होईल.जनगणना हा विषय संविधानाच्या सातव्या सूचीनुसार केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारित येतो. या मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या रजिस्ट्रार जनरल व जनगणना आयुक्त कार्यालयातर्फे जनगणना केली जाते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी  ऑनलाइन (डिजिटल) जनगणना  करण्याचे सूतोवाच केले आहे. त्यांच्या मते ही ई- जनगणना अधिक शास्त्रशुद्ध व अचूक असेल. ई- जनगणनेमुळे नाव- पत्ता बदलणे, जन्म- मृत्यू यांच्या नोंदी करणे सोपे होईल.  त्यामुळे भारताची जनगणना सातत्याने अद्ययावत राहील.जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे पाहिले जाते. भारताची अवाढव्य लोकसंख्या हा यातील एक मोठा अडसर ठरेल, असे एकेकाळी मानण्यात येत होते; परंतु, भारताच्या लोकसंख्येतील तरुणांची लक्षणीय संख्या लक्षात घेता ते भारतासाठी एक संसाधन म्हणून वरदानही ठरू शकते.- टिळक उमाजी खाडे, नागोठणे, ता. रोहा, जि. रायगड

टॅग्स :Sensexनिर्देशांक