शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
4
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
5
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
6
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
7
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
8
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
9
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
10
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
11
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
12
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
13
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
14
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
15
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
16
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
17
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
18
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
19
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
20
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
Daily Top 2Weekly Top 5

पुरे झाला त्रागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 12:36 IST

मिलिंद कुलकर्णीभाजपा नेते एकनाथराव खडसे यांचा त्रागा रास्त असला तरी सातत्याने तो व्यक्त केल्याने गांभीर्य कमी होत आहे, हे लक्षात घ्यायला हवे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाची हुलकावणी आणि जून २०१६ मध्ये मंत्रिपद गेल्यापासून खडसे नाराज आहेत. भाजपामध्ये ज्येष्ठ असूनही ज्येष्ठताक्रम डावलण्यात आल्याची खंत त्यांनी पुन्हा एकदा भुसावळमध्ये व्यक्त केली. ...

मिलिंद कुलकर्णीभाजपा नेते एकनाथराव खडसे यांचा त्रागा रास्त असला तरी सातत्याने तो व्यक्त केल्याने गांभीर्य कमी होत आहे, हे लक्षात घ्यायला हवे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाची हुलकावणी आणि जून २०१६ मध्ये मंत्रिपद गेल्यापासून खडसे नाराज आहेत. भाजपामध्ये ज्येष्ठ असूनही ज्येष्ठताक्रम डावलण्यात आल्याची खंत त्यांनी पुन्हा एकदा भुसावळमध्ये व्यक्त केली. त्यांचे पक्षातील कट्टर प्रतिस्पर्धी गिरीश महाजन यांनी नाशिकमुक्कामी विधान करुन आगीत तेल ओतले. खडसेंना मुख्यमंत्रीच काय पंतप्रधान व्हावेसे वाटेल, पण पक्षाला तसे वाटायला हवे ना, असे महाजन म्हणाले. अर्थात महाजन काही चुकीचे विधान केलेले नाही. पण आता पक्षातील सहकारी त्यांना वास्तव लक्षात आणून देत असले तरी खडसे ते समजून घेत नाही, हे दुर्देव आहे. ४० वर्षे मी भाजपामध्ये आहे, भाजपाला वाढविण्यासाठी रक्ताचे पाणी केले, अनेकांना पदे देऊन संधी दिली, असे खडसे वारंवार म्हणत असतात. त्यांचे कथन पूर्ण सत्य आहे, कोणीही ते नाकारत नाही. परंतु पुन्हा त्यांनीच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासमक्ष म्हटल्याप्रमाणे, सद्यस्थितीत भाजपामध्ये ते चौकशीतील व्यक्ती आहे, क्लिन चिटमधील नाही, हे सत्य कटू असले तरी स्विकारावे लागणार आहे. शरद पवार यांच्या प्रसिध्द वाक्याचा आधार बहुदा भाजपाने खडसे यांच्याबाबत घेतला असावा. ‘भाकरी फिरवली नाही तर करपते’ या वाक्प्रचारानुसार भाजपाने खडसे यांच्याऐवजी गिरीश महाजन यांना बळ देण्याचे निश्चित केलेले दिसते. आणि महाजन यांनी या विश्वासाला पात्र ठरत पक्षाला अनुकूल असे निकाल दिले आहेत. जिल्हा परिषद निवडणूक, ग्रामपंचायत निवडणूक, जामनेर व जळगाव पालिका निवडणूक महाजन यांनी जिंकून दाखवली. जळगाव महापालिका निवडणुकीत खडसे यांनी केवळ समर्थक उमेदवारांसाठी दोन दिवस सभा घेतल्या तरी सहा पैकी केवळ एक उमेदवार निवडून आला. जामनेरात महाजन यांनी सर्वच्या सर्व २५ जागा जिंकल्या. मात्र खडसे यांना मुक्ताईनगरात १७ पैकी १३ जागा जिंकता आल्या. राजकारणात नेतृत्वाची पिढी बदलत आहे. भाजपामधील तरुण पिढीला खडसे यांच्याविषयी आदर असला तरी महाजन यांच्याविषयी आपुलकी आहे. सत्ता असल्याने कामांसाठी कार्यकर्त्यांचे मोहोळ महाजन यांच्याभोवती असते. लागोपाठच्या विजयामुळे महाजन यांचा प्रभाव वाढत आहे, हे नाकारुन चालणार नाही. राजकारणाचे बदलते वास्तव पाहता खडसे अस्वस्थ आहेत. त्यातून पक्षाला अडचणीत आणणारी विधाने, कारवाया खडसे यांच्याकडून सुरु आहे. आमदारांच्या बनावट लेटरपॅडवरील तक्रार, प्रचाराची बनावट क्लिप, मराठा आंदोलनाला पाठिंबा देणारा भाजपातील पहिला आमदार असल्याचे विधान हे पाहता भाजपा आणि खडसे या दोघांनी समन्वयाने वाद टाळायला हवे, अशीच भावना हितचिंतकांमध्ये आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव