शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Teachers' Day 2018: माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 03:27 IST

शिक्षक दिनाला आपले गुरू, मार्गदर्शक आणि योग्य दिशा दाखविणाऱ्या आपल्या शिक्षकांना अभिवादन करतात.

- डॉ. एस. बी. मुजुमदार(सिम्बायोसिस विद्यापीठाचे संस्थापक)

शिक्षक दिनाला आपले गुरू, मार्गदर्शक आणि योग्य दिशा दाखविणाऱ्या आपल्या शिक्षकांना अभिवादन करतात. मात्र, आजच्या शिक्षक दिनी माझ्यामधील शिक्षक, एका हरहुन्नरी विद्यार्थ्याप्रती आदराची भावना व्यक्त करू इच्छितो, जो विद्यार्थीदशेत पुणे विद्यापीठातील सक्रिय विद्यार्थी नेता होताच आणि सिंंबायोसिसच्या परदेशी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमातही सहभागी झालेला होता.आपल्या कामाशी बांधिलकी ठेवत, प्रामाणिकपणे केलेल्या अविरत मेहनतीमुळे हाच माझा विद्यार्थी आज भाजपाचा राष्ट्रीय प्रवक्ता आणि युनियन कॅबिनेट मिनिस्टर (HRD) अर्थात मनुष्यबळ विकासमंत्री म्हणून कार्यरत असणारा विद्यार्थी म्हणजे ‘प्रकाश जावडेकर’.मनुष्यबळ विकासमंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळात, बहुदा अनेक दशकांत, प्रथमच अनेक सकारात्मक बदल भारतीय उच्च शिक्षण प्रणालीमध्ये घडून येत आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये अत्युच्च दर्जा प्राप्त करण्याचे ध्येय भारतासमोर आहे. त्यासाठी काही मोजक्या पारंपरिक तंत्रज्ञान व शास्त्रीय शिक्षण संस्थांच्या कीर्तीचे गुणगान करणे पुरेसे नाही, तर खासगी शिक्षण संस्थांना उच्च शिक्षणात सहभागी करून घेणे ही काळाची गरज आहे.मानुष्यबळ विकास मंत्रालयाने जाहीर केलेली ‘नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क’ ही योजना म्हणजे उच्च शिक्षणाचा दर्जा ठरविण्याचे ‘मानद’ किंवा मापदंड आहे.

जागतिक दर्जाच्या विद्यापीठांची निर्मिती -मनुष्यबळ विकास मंत्रालयाने एकूण २० अभिमत विद्यापीठांची निर्मिती करण्याची घोषणा केलेली आहे. त्यातील १० खासगी, तर १० सरकारी क्षेत्रातील असतील. त्यांना संपूर्ण स्वायत्तता, तसेच एक हजार कोटींचे अनुदानही सरकारी शिक्षण संस्थांना देण्यात येईल. याचा ङ्खफायदा असा की, दर्जेदार शिक्षण संस्थांचा समावेश जागतिक श्रेणीच्या यादीमध्ये केला जाऊ शकतो. आताही तीन खासगी आणि दोन सरकारी शिक्षण संस्थांना Institute of Excellence(IOE) हा दर्जा दिला गेला आहे. या संस्था भारतीय विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देण्याबरोबरच परदेशी विद्वान आणि विद्यार्थ्यांनाही भारताकडे आकर्षित करीत आहेत़आजच्या जागतिकीकरणाच्या युगात आंतरराष्ट्रीय स्तरावरील मृत व्यापार, मानवी स्थलांतर, सेवांचे आदान-प्रदान या पार्श्वभूमीवर मनुष्यबळ विकास मंत्रालयाने Study in India अर्थातच, ‘भारतामध्ये शिक्षण’ ही योजना या वर्षी १८ एप्रिल रोजी, मुख्यत: परदेशी विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी कार्यान्वित केली आहे. नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठाने एके काळी जगभरातील विद्वान आणि विद्यार्थ्यांना आकर्षित केले होते, हे आपल्याला ज्ञात आहेच. ‘भारतामध्ये शिक्षण’ या योजनेंतर्गत आतापर्यंत दोन हजार विद्यार्थ्यांनी दर्जेदार विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला आहे. हेच विद्यार्थी भारताबद्दल आस्था बाळगत अनौपचारिकरीत्या ‘भारताचे सद्भावना राजदूत’ म्हणून मायदेशी परततील.शिक्षक दिनी या विद्यार्थ्याला मी आशिष देतो की, त्याचे असेच नेतृत्व देशाला अविरत मिळून, ज्ञानाने समृद्ध पायावर आपल्या भक्कम अर्थव्यवस्थेचा विकास होईल.

टॅग्स :Teacherशिक्षक