शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
2
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
6
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
7
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
8
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
9
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
11
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
12
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
13
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
14
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
15
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
16
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
17
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
18
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
19
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
20
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

टॅम्प्लीऽऽज ! आ म्हा ला  बा स

By सचिन जवळकोटे | Updated: March 18, 2019 10:58 IST

माढ्याच्या रणांगणात दिसेल तो योद्धा पाठ दाखविण्याची भाषा करतोय. ‘थोरले काका’ माढ्यात चक्कर मारून पुन्हा बारामतीला गेले. ‘सुभाषबापू’ तर ...

माढ्याच्या रणांगणात दिसेल तो योद्धा पाठ दाखविण्याची भाषा करतोय. ‘थोरले काका’ माढ्यात चक्कर मारून पुन्हा बारामतीला गेले. ‘सुभाषबापू’ तर ‘मी कधी म्हणालो होतो?’ असं विचारू  लागले. ‘संजयमामां’नी तर ‘कमळ’वाल्यांनाच ‘मामा’ बनविलं. ‘विजयदादा’ही ‘मला नकोऽऽ माझ्या लाडक्या लेकरालाच द्या,’ म्हणत मागे सरकू लागले. ही सारी गंमत पाहताना लहानपणीचा खेळ आठवला. खेळात ‘आम्हाला बासऽऽ’ म्हणणारी पोरं जशी ‘टॅम्प्लीऽऽऽज’ म्हणायची.. ती भाषा डोळ्यांसमोर तरळून गेली. 

पार्थ.. स्वार्थ.. परमार्थ !‘थोरले काका बारामतीकर’ नेहमी एका दगडात तीन-तीन पक्षी (की पक्ष?) साधतात, याची पुन्हा एकदा अनुभूती आली. ‘पार्थ’साठी कौटुंबिक ‘तह’ करून मावळ प्रांत नातवाला दिला. त्यासाठी एकीकडं माढ्याची लढाई तहकूब केल्याचा आव आणून दुसरीकडं पराभवाचा शिक्का मारून न घेण्याचा ‘स्वार्थ’ही साधला. नंतर जाता-जाता परत ‘सहकाºयांसाठी माढ्याची जागा मोकळी करतोय’, अशा आविर्भावात ‘परमार्थ’ही साधला. दि ग्रेट काकाऽऽ तुमच्या चाणाक्ष चाणक्यबुद्धीला तोड नाही.. लगाव बत्ती...

  • -  ‘संजयमामा’ मुंबईला जाण्यापूर्वी आदल्या दिवशी झेडपीच्या केबिनमध्ये बसलेले. एवढ्यात मोबाईल वाजला. ‘बोला दादाऽऽ’ म्हणत ‘मामां’नी घाईघाईनं साºयांना बाहेर काढलं. कार्यकर्त्यांना प्रश्न पडला; नेमक्या कोणत्या दादांचा कॉल आला? कुणी म्हणालं, ‘बबनदादांचा आसंल.’ दुसºयानं सांगितलं, ‘नायऽऽ अजितदादांचा हाय.’ तिसºयानं शोध लावला, ‘नक्कीच चंद्रकांत दादांचा वाटतुया.’ चौथ्यानं तर कडी केली, ‘भौदा विजयदादांचाच दिसतुया.’
  • - अगाऽऽगाऽऽ एकाच वेळी किती ‘दादां’ना फिरविण्याची करामत हे ‘मामा’ करताहेत? त्यांच्या अनाकलनीय अन् अचाट कर्तृत्वाबद्दल खुद्द कार्यकर्त्यांनाच किती कल्पनांचे धुमारे फुटताहेत? असो.. मुख्य विषय राहिलाच बाजूला. फोन म्हणे फलटणमधील निंबाळकरांच्या ‘रणजितदादां’चा होता. 
  • - मुंबईत ‘वर्षा’वर खुद्द देवेंद्रपंतांनीच शब्द टाकूनही ‘नाना’चा पाढा वाचणाºया या ‘मामां’ना नेमकं हवंय तरी काय? एकाच वाक्यात सांगायचं झालं तर त्यांना स्वत:च्या कारखान्यात पंतांच्या सत्तेचा फायदा हवाय; परंतु ‘कमळ’ नकोय. माढा-करमाळा राजकारणात ‘बबनदादां’च्या आमदारकीचा वापर हवाय; परंतु ‘घड्याळ’ नकोय. म्हणूनच गेल्या विधानसभेला मनगटात ‘घड्याळ’ बांधून ‘हाता’त ‘कमळ’ धरण्याचा प्रयत्न करताना वाजलीच नाही त्यांची ‘शिट्टी’.. तेव्हा यंदा वाजवतील की काय ‘कपबशी’... अशी विरोधकांनाही वाटू लागलीय भीती. लगाव बत्ती..

राजकीय जॉब धोक्यातव्हीआरएस म्हणजेच स्वेच्छेनं काम थांबविणं, म्हणजे जॉब बंद.. परंतु नोकरीतला हा श्फर शब्द सोलापूरच्याराजकारणात वेगळ्या अर्थानं चर्चेत आलाय. ‘शहर उत्तर’ची जबाबदारी सुशीलकुमारांनी ज्यांच्यावर सोपवलीय, ती टीम म्हणजे व्हीआरएस. आता या शब्दाचा अर्थ ‘विश्वनाथ, राजशेखर अन् सिद्धाराम’ या तीन अण्णांना विचारायच्या भानगडीत पडू नका. अगोदरच त्या गौडगावच्या महाराजांमुळं यल्लारदू डोकं किट्ट झालंय. जळी-स्थळी भगवी वस्त्रंच दिसू लागलीत. ‘लोकसभेचं जाऊ द्या होऽऽ  समाजावरचा आपला कायमस्वरूपी असलेला होल्ड कमी होतोय की काय,’ अशी भीती या महाराजांमुळं श्फर टीमला वाटू लागलीय; कारण या समाजाच्या जीवावरच यांचा राजकीय जॉब आजपर्यंत ‘जनवात्सल्य’वर चालत आलेला. 

१९६१ नंतर प्रथमच ‘नम् मनशाऽऽ’ला खासदारकीची संधी मिळत असल्याचा मेसेज सध्या सोशल मीडियावर गुप्तपणे फिरू लागलाय. यामुळं ‘तम-तम मंदीं’चं ज्या पद्धतीनं झपाट्यानं ध्रुवीकरण होऊ लागलंय, ते ‘हात’वाल्यांसाठी निश्चितच धोक्याचं.. म्हणूनच ‘विश्वनाथ अण्णां’नी या महाराजांना ओपन चॅलेंज दिलं की, ‘तुम्हाला मदत करणाºयांची नावं सांगा, राजकारण सोडतो.’ हे ऐकून देशमुख मालकांच्या वाड्यावर म्हणे खुसपूस झाली, ‘आता सोडण्यासारखं राहिलंच काय?’ अशी खोचक प्रतिक्रियाही व्यक्त झाली. मात्र, ‘शहर उत्तरमध्ये कुणीही उभारलं तरी आमचे मालकच नेहमी निवडून येणार’, अशी दर्पोक्ती करणाºया कार्यकर्त्यांना हे माहीत नसावं की ‘काळाचा महिमा अचाट असतो. लोकशाहीत मतदारांची भूमिका अगाध असते.’ 

टॅग्स :SolapurसोलापूरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेPoliticsराजकारणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक