शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
3
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
4
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
5
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
6
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
7
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
8
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
9
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
10
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
11
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
12
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
13
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
14
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
15
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
16
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
17
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
18
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
19
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
20
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा

सत्तांतराचे श्रेय घ्या विकास कामाची हमी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 09:50 IST

मिलिंद कुलकर्णी जळगाव महापालिकेत अडीच वर्षानंतर पुन्हा एकदा सत्तातर नाट्य घडून आले आहे. अडीच वर्षांपूर्वी खान्देश विकास आघाडीतील महत्त्वाचे ...

मिलिंद कुलकर्णी

जळगाव महापालिकेत अडीच वर्षानंतर पुन्हा एकदा सत्तातर नाट्य घडून आले आहे. अडीच वर्षांपूर्वी खान्देश विकास आघाडीतील महत्त्वाचे मोहरे भाजपमध्ये घेऊन गिरीश महाजन व सुरेश भोळे यांनी प्रथमच महापालिकेत भाजपला बहुमत मिळवून दिले. आता त्याच मोह र्यांपैकी काही जण मागे फिरले आहेत.  हे का घडले, कसे घडले, कुणामुळे घडले याविषयी वेगवेगळी कथानके, उप कथानके सांगितली जात आहेत. यशाला अनेक धनी असतात,  अपयश मात्र पोरके असते.  त्याप्रमाणे या सत्तांतराचे श्रेय घेण्यासाठी  लांबलचक यादी मारुतीच्या शेपटीप्रमाणे वाढत जात आहे. जळगावकरांनी यादी पूरती लक्षात ठेवावी कारण श्रेय या मंडळींना दिले जात असले तर जळगाव शहराचा विकास करण्याची जबाबदारी सुद्धा या नेत्यांनी घ्यायला हवी. एक वर्षात विकास करून दाखवेन, अन्य था विधानसभा निवडणुकीत मते मागायला येणार नाही, असे वचन देणाऱ्यांची अवस्था जनते एेवजी त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांनी कशी केली, हे नुकतेच आपण पाहिले. सत्तांतराचे श्रेय कुणाला?शिवसेनेच्या पंधरा जागा असताना भाजपमधून बाहेर पडून 27 नगरसेवकांनी दिलेल्या पाठिंब्याच्या बळावर सेनेचा महापौर झाला. ही खेळी यशस्वी झाली,  त्याचे श्रेय कोणाला या विषयी वेगवेगळी श्रेयनामावली सांगितली जाते. त्यात वाढ होत आहे .शिवसेनेचे संपर्कप्रमुख विलास पारकर,  पालकमंत्री गुलाबराव पाटील,  नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नावे सुरुवातीला श्रेयनामावलीत होती. त्यानंतर त्यात वाढ होऊन दुसरे संपर्कप्रमुख संजय सावंत,  अंबरनाथचे सुनील चौधरी,  एकनाथ खडसे यांची नावे जोडली गेली. सत्तांत राचे नाट्य  म्हटले की अनेक हात मदतीला धावतात. त्यात काही पडद्याआड असतात, काही पडद्याच्या बाहेर असतात. अजूनही काही नावे श्रेयनामावलीत असतील पण ती पडद्या आड असतील.  ती कधीच बाहेर येणार नाहीत. श्रेय सगळ्यांना द्यायला हरकत नाही, मात्र जळगाव शहराचा विकास अडीच वर्षात करून देण्याचे आव्हान श्रेय घेणाऱ्या नेत्यांनी स्वीकारले पाहिजे.भोळेंचे अपयश, पुन्हा परके नेतृत्वसुरेशदादा जैन यांनी जळगावची आमदारकी आणि नगरपालिका या दोन्ही कार्यक्षेत्रात 35 वर्षे राज्य केले. सगळ्यांना सोबत घेऊन त्यांनी ही सत्ता राबवली. या सत्तेला पहिल्यांदा आव्हान एकनाथ खडसे यांनी 2001 मध्ये डॉ. के.डी. पाटील यांच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या वेळी दिले. डॉ. पाटील निवडून आले. मात्र सर्वाधिक नगरसेवक सुरेशदादा जैन यांचेच होते. बंडू काळे यांच्यासह सतरा नगरसेवकांनी सुरेशदादा यांची आघाडी सोडून भाजपशी हातमिळवणी केली आणि सभागृहात भाजपचे बहुमत झाले.  हे पहिले सत्तांतर म्हणावे लागेल. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सुरेश भोळे यांनी सुरेशदादा जैन यांचा पराभव केला तर 2018 च्या महापालिकेच्या निवडणुकीत गिरीश महाजन व सुरेश भोळे यांच्या नेतृत्वाखालील भाजपने शिवसेनेचा पराभव केला. सुरेश भोळे यांची वाटचाल विधानसभा, महापालिका या मार्गाने पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदापर्यंत झाली. मात्र या सत्तांत रामुळे त्यांच्या नेतृ त्वाच्या मर्यादा ठळकपणे समोर आल्या. गिरीश महाजन यांनी महापालिकेची संपूर्ण धुरा त्यांच्याकडे सोपविलेली असताना आणि अडीच वर्षापैकी सव्वा वर्ष त्यांच्या पत्नी महापौर असताना जळगाव शहराचा विकास, जळगावकर नागरिकांचे समाधान तर सोडा परंतु  पक्षाच्या 57 नगरसेवकांना ते सांभाळू शकले नाही, हे या घटनेतून ठळकपणे समोर आले आहे. भोळे हे पक्षाचे नगरसेवक, महापालिका सांभाळण्यात अपयशी ठरल्याने आता जळगाव शहराचे नेतृत्व परक्‍या नेत्यांच्या हाती जातांना दिसत आहे.  महापालिकेत शिवसेना, भाजपचा बंडखोर गट आणि एम आय एम यांची सत्ता आली असली तरी सत्ता राबविण्याची क्षमता असलेले नेते कोण हा विषय ऐरणीवर आला आहे.  गुलाबराव पाटील हे पालकमंत्री आहेत. त्यांच्याकडे राज्याचे कॅबिनेट मंत्रिपद आहे.  पक्षाचे प्रवक्ते पद आहे.  ते जळगाव महापालिकेसाठी किती वेळ देतात हे बघायला हवे.  एकनाथ खडसे यांना जळगावात लक्ष घालायचे असेल तरी शिवसेनेचे नेते आणि नगरसेवक त्यांना तशी संधी देतात का हाही महत्त्वाचा मुद्दा राहील. महापालिकेची सत्ता आणि निर्णयांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आता माजी महापौर नितीन लढ्ढा, ललित कोल्हे, सुनील महाजन, सुनील खडके, कुलभूषण पाटील या दुसऱ्या फळीतील नेत्यांवर येऊन ठेपली आहे.  यापैकी काहींना 2024 च्या विधानसभा निवडणुकीचे स्वप्न पडू लागले आहे. त्यामुळे येणाऱ्या अडीच वर्षात विकास कामांचा सपाटा लावण्या चा त्यांचा प्रयत्न राहील. शिवसेनेची राज्यातील सत्ता,  पालकमंत्रीपद आणि महापालिकेतील सत्ता यात योग्य सुसंवाद राखून विकास कामे केली तर जळगावकर या नव्या युतीचे ही स्वागत करतील यात शंका नाही.भाजपाची हतबलता या सत्तांतर नाट्यात भाजप कोठेही आक्रमकपणे समोर येऊन लढला असे दिसले नाही. कोरोना बाधित झाल्याने गिरीश महाजन जामने रात  अडकून राहिले. कोरोनातून नुकतेच बाहेर आलेले सुरेश भोळे हे  बैठका आणि संवादात व्यस्त राहिले. ३०  नगरसेवक वाचले याचेच भाजपला समाधान आहे. जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे यांच्या पत्रकार परिषदेत देखील हतबलता दिसून आली. या सत्तांतर नाट्यात स्वतः मुख्यमंत्र्यांनी रस घेतल्यानंतर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला काय करता येणे शक्य आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांची एकंदरीत विधाने, युक्तिवाददेखील बचावात्मक राहिली. त्यांच्या कथनातून विसंगती सुद्धा समोर आली.  भोळे यांचा मतदार संघ हा महापालिकेचा कार्यक्षेत्र असते ना आहे त्यात विकास कामे करायची म्हटल्यावर ती महापालिकेकडून तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करावी लागतील अशावेळी संघर्षाचा संघर्षाचे प्रसंग न येईल येऊ देता विकासाचा व्यापक दृष्टिकोन ठेवल्यास भोळे आणि भाजप या दोघांना दूरगामी  परिणामाच्या दृष्टीने योग्य ठरेल.

टॅग्स :Jalgaonजळगाव