शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
3
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
4
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
5
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
7
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
8
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
9
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
10
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
12
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
13
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
14
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
15
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
16
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
17
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
18
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
19
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

अखंड तळपणारा ‘स्वरभास्कर!’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 08:18 IST

Bhimsen Joshi : भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षास आजपासून प्रारंभ होत आहे. किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका पद्मभूषण डॉ. प्रभा अत्रे यांनी भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांना वाहिलेली ही शब्दांजली.

एखादा कलाकार आपल्या कलेवर प्रभुत्व मिळवतो, तेव्हा कलाकार व कला एकरूप झालेली असतात हेच खरं! भीमसेनजी मला प्रथम आठवतात ते माझे गुरू सुरेशबाबू यांच्या पाठीमागे तंबोऱ्यावर बसलेले. गाणं नुसतं डोक्यात असून चालत नाही, तेवढ्याच ताकदीनं ते गळ्यातून बाहेर पडावं लागतं. नैसर्गिक देणगीबरोबरच पराकोटीची साधनाही हवी. नशिबाची साथ तर लागतेच. भीमसेनजी खरंच भाग्यवान! उतारवयातही त्यांचा आवाज एखादा प्रकाशाचा झोत चहूबाजूंनी अंगावर यावा, तसा श्रोत्याला भारावून टाकायचा. या आवाजात जबरदस्त ‘मास अपील’ होतं. भीमसेनजींचा आवाज रुंद, घुमारदार, पीळदार, लांब पल्ल्याचा, दमसास पेलणारा, सुरेल, गोड, भावस्पर्शी. आवाज बारीक करून भीमसेनजी जेव्हा तार षड्ज लांबवायचे किंवा तान घ्यायचे, तेव्हा श्रोत्यांना एक वेगळाच आनंद मिळायचा. भीमसेनजी मैफलीचे बादशहा होते. त्यांची मैफल म्हणजे श्रोत्यांची तुडुंब गर्दी आणि वाहवांची खैरात! किराणा गायकीला नवीन जीवनसत्त्व देऊन तिचं आयुष्य वाढवण्यात, तिला सुदृढ करण्यात भीमसेनजींचा मोठा वाटा आहे. ‘अभंगवाणी’नं भीमसेनजींना विलक्षण लोकप्रियता मिळवून दिली. भीमसेनजींसारखी ‘भीमसेनी’ लोकप्रियता मिळवणारा विनम्र शास्त्रीय गायक एखादाच.माझे गुरू सुरेशबाबू, हिराबाई यांच्या स्मरणार्थ गेली अनेक वर्षे विलेपार्ले इथे मी एक मोठा संगीत महोत्सव करते. या उत्सवाला भीमसेनजी आवर्जून यायचे. त्यामुळे उत्सवाची शान निश्चितच वाढायची. माझे दोन्ही गुरू गेल्यानंतर - सरस्वतीबाई, गंगूबाई, फिरोज दस्तूर आणि भीमसेनजी - माझं कौतुक करण्यासाठी, मला आशीर्वाद, शुभेच्छा देण्यासाठी माझ्या पाठीशी होते. मात्र पाहता पाहता ही वडीलधारी मंडळी एकेक करत सोडून गेली. आता मात्र मी खरोखरीच पोरकी झाले आहे.

टॅग्स :Bhimsen Joshiभीमसेन जोशी