शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

Sudhir Phadke: सुरांच्या हिंदोळ्यावर झुलवणारे ‘बाबूजी’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 05:59 IST

Sudhir Phadke: मराठी चित्रसृष्टीच्या इतिहासात, मराठी मनावर अधिराज्य गाजवलेले संगीतकार सुधीर फडके. ‘जगाच्या पाठीवर’, ‘लाखाची गोष्ट’, ‘सुवासिनी’, ‘ऊन-पाऊस‘, ‘प्रपंच..’ अशा गाजलेल्या चित्रपटांतील त्यांची गाणी अनेकांच्या ओठांवर रेंगाळलेली. ती गाणी गुणगुणतच रसिकांच्या तीन पिढ्या वाढल्या आणि ‘आपणही गाऊ शकू’ हा आत्मविश्वास, बाबूजींच्या सोप्या सुरावटींनी दिला.

- सुधीर गाडगीळ (ख्यातनाम लेखक, संवादक)

मराठी चित्रसृष्टीच्या इतिहासात, मराठी मनावर अधिराज्य गाजवलेले संगीतकार सुधीर फडके. ‘जगाच्या पाठीवर’, ‘लाखाची गोष्ट’, ‘सुवासिनी’, ‘ऊन-पाऊस‘, ‘प्रपंच..’ अशा गाजलेल्या चित्रपटांतील त्यांची गाणी अनेकांच्या ओठांवर रेंगाळलेली. ती गाणी गुणगुणतच रसिकांच्या तीन पिढ्या वाढल्या आणि ‘आपणही गाऊ शकू’ हा आत्मविश्वास, बाबूजींच्या सोप्या सुरावटींनी दिला.एखादी कला, तत्त्वनिष्ठ विचार, छंद जोपासायचा म्हणजे त्यात स्वत:ला संपूर्णपणे झोकून द्यायचं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बाबूजी ऊर्फ सुधीर फडके. बालगंधर्व आणि हिराबाई बडोदेकर हे बाबूजींचे आदर्श, तर ‘सावरकर’ हे दैवत. वाल्मीकीची प्रतिभा लाभलेल्या ग. दि. माडगूळकरांशी आणि त्यांच्या शब्दांशी बाबूजींचे सूर विशेष जुळले. स्वत: माडगूळकर आपल्या या सुरेल सहकाऱ्याबद्दल बोलताना म्हणाले होते, ‘पाखरू पंख घेऊन जन्माला येतं, तसं बाबूजी गाणं घेऊनच जन्माला आले आणि आयुष्यभर रसिकांना सुरांच्या हिंदोळ्यावर झुलवत राहिले.’बाबूजींच्या दादरच्या शिवाजी पार्कच्या घरी जाण्याचा योग पन्नास वर्षांपूर्वी पत्रकारिता करत असताना अनेकदा आला. बहुतांशी वेळेला लेंगा, हाफ गुरू शर्ट या वेषात ते असत. ‘जेऊनच जायचं’ असा आग्रह धरत. मूळ अरुणाचलच्या, ‘लेकी फुन्सो’ (दीपक) नावाच्या विद्यार्थ्याला त्यांनी आपल्या घरी सांभाळलं होतं. तो त्यांचा मानसपुत्र आता तिकडे वरिष्ठ अधिकारी आहे. बाबूजींच्या संस्कारांमुळे उत्तम मराठी बोलतो.मराठी भाषेचं, साहित्याचं, संस्कृतीचं अविभाज्य भाग बनलेलं महाकाव्य गीतरायामण. ते १९५५ सालीच स्वरबद्ध करून, रसिकांच्या मनात त्यांनी रूजवलं. वीर सावरकर चित्रपटाची निर्मिती निष्ठेनं केली. आशाताई मला म्हणाल्या होत्या, ‘शब्दांचं नेमकं शब्दोच्चारण माझ्याकडून घडवून घेणारे बाबूजी. ‘जीवलगा’मध्ये तर प्रत्येक कडव्याला वेगळ्या रागात गाण्याचं आव्हान त्यांनी मला दिलं होतं.’ अमराठी लोकांनीही डोक्यावर घेतलेलं बाबूजींच गाणं म्हणजे ‘ज्योती कलश छलके’ आणि ‘खुश है जमाना आज पहली तारीख है’. दरमहा एक तारखेला सादर होणारं बाबूजींचं हे गाणं, त्यांची आठवण जागती ठेवेल.     (समाप्त)

टॅग्स :marathiमराठीmusicसंगीत