शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

मराठवाड्यात नेत्यांना धक्के

By सुधीर महाजन | Updated: October 11, 2017 01:07 IST

पाण्यात उभी म्हैस पंचवीस शेर दूध देते. ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाची हीच गत आहे. भाजपपासून शिवसेनेपर्यंत सगळेच पक्ष सर्वाधिक ग्रामपंचायती आमच्या ताब्यात असा दावा करतात.

पाण्यात उभी म्हैस पंचवीस शेर दूध देते. ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाची हीच गत आहे. भाजपपासून शिवसेनेपर्यंत सगळेच पक्ष सर्वाधिक ग्रामपंचायती आमच्या ताब्यात असा दावा करतात. केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपच्या दाव्याकडे गंभीरपणे पाहिले तर त्यांनी गावपातळीवर सत्तेत शिरकाव करणे साहजिक आहे; पण या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढल्या जात नसल्याने कोणत्या पक्षाच्या ताब्यात किती ग्रामपंचायती असे स्पष्ट चित्र नाही. मराठवाड्यात हीच परिस्थिती आहे. पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद वगळता सात जिल्ह्यातील १७७३ ग्रामपंचायतींचे निकाल लागले. उस्मानाबादेतील १६५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका दुसºया टप्प्यात आहेत. दावे प्रतिदावे काहीही असले तरी प्रमुख नेत्यांच्या बाबतीत धक्का देणाºया गोष्टी घडल्या.भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जवखेडा हे भोकरदन तालुक्यातील गाव ते भाजपकडे असणे साहजिक आहे पण येथे भाजपचीच तीन पॅनल्स एकमेकांच्या विरोधात लढत होती. कोणतेही जिंकले तरी ते दानवेंचेच असणार. अशा अडचणीच्या वेळी नेते मंडळी सर्वांनाच आशीर्वाद देतात. बीडमध्ये भाऊबंदकी जोरावर आहे. मुंडे-क्षीरसागर दोघेही त्रस्त आहेत. मुंडे भावंडामध्ये येथेही वरचढ ठरले. गोपीनाथगड असलेली पांगरीची ग्रामपंचायत त्यांच्या समर्थकांनी जिंकली. तर आमदार जयदत्त क्षीरसागर यांची नवगण राजुरी येथील ग्रामपंचायत पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी पळविली.लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना त्यांच्या तालुक्यातील महत्त्वाच्या ग्रामपंचायती ताब्यात घेता आल्या नाहीत. येथे काँग्रेस वरचढ ठरली. दापका, अंबुलगा या ग्रामपंचायती त्यांच्या हातून निसटल्या. परभणीत तर ग्रामपंचायतींचा कौल सत्ताधाºयांच्या विरोधात गेला. माजी खासदार गणेश दूधगावकर यांना दूधगावातील ग्रामपंचायत गमवावी लागली आणि पुतण्या दिलीप हा पराभूत झाला. नांदेडमध्ये शिवसेनेचा जोर कायम होता. तर हिंगोलीत काँग्रेसची कामगिरी चांगली राहिली. औरंगाबादमध्ये भाजप-शिवसेना या दोन पक्षांनी आघाडी घेतल्याचे चित्र आहे.या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे जनतेतून थेट निवडून येणारा सरपंच त्यामुळे त्याला अधिकारही जास्त. दीड वर्षांनंतर होणाºया लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने गावपातळीवरील ग्रामपंचायत निवडणूक महत्त्वाची ठरते. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात भाजपला आपले बस्तान बसवता आले नाही; पण आता उद्या होणाºया महापालिका निवडणुकीसाठी भाजपने जोर लावला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना धक्का देण्यासाठी संभाजी पाटील निलंगेकर तळ ठोकून आहेत. दोघांच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची समजली जाते. नांदेड जिल्ह्यात भाजप अजून स्थिर होऊ शकलेला नाही. तेथे काँग्रेस आणि शिवसेना यांचा प्रभाव असल्याने महापालिका निवडणुकीसाठी भाजपने येथे शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना गळास लावले. चिखलीकरांनी आपले साथीदार भाजपमध्ये पाठविले. आणि उघडपणे भाजपचा प्रचार केला. किंबहुना या निवडणुकीचे नेतृत्व केले; पण ग्रामपंचायत निवडणुकीत लाभ भाजपला मिळाला नाही. उद्या होणाºया महापालिका निवडणुकीत त्यांची भाजपसाठीची उपयुक्तता स्पष्ट होईल. शिवाय या निकालाचे दूरगामी परिणाम मराठवाड्याच्या राजकारणावर होतील. sudhir.mahajan@lokmat.com  

टॅग्स :sarpanchसरपंचgram panchayatग्राम पंचायत