- शैलेश माळोदेदेशाची राजधानी दिल्ली, पुन्हा एकदा ‘नेमेची येतो मग पावसाळा’ या धर्तीवर प्रदूषण आणि गारठ्याच्या धुक्यात हरवून जात त्यातून दोषारोपांच्या चक्रात अडकली आहे. दरवर्षी या दिवसात दिल्लीतील धुके इतके दाट होते की हिवाळ्यापेक्षा प्रदूषणाचा विळखाच मनाला खूप यातना देतो, शारीरिक यातनांबद्दल तर न बोललेलेच बरे. दरवेळेला ‘प्रदूषणात वाढ’ यासारख्या मथळ्यांचे फार कौतुकही आता राहिलेले नाही. वायुप्रदूषण हा केवळ दिल्लीच नव्हे तर संपूर्ण देशाच्या दृष्टीने कळीचा मुद्दा बनलाय. तो केवळ पर्यावरणीय मुद्दा राहिलेला नाही की त्यावर परिषदांतून पक्त चर्चेचे गुºहाळ लावावे आणि बाहेर पडल्यावर वाहनातून डिझेलवर चालणाऱ्या इंजीनद्वारे प्रदूषणकारी वायुउत्सर्जन करीत निघून जावे.वायुप्रदूषण हा सार्वजनिक आरोग्याशी निगडित मुद्दा बनलाय. त्याचा संबंध प्रत्येक श्वसन करणाºया जीवाशी आहे. केवळ मनुष्यच नव्हे तर प्राण्यांशीही आहे. अबालवृद्ध आणि स्त्री-पुरुष तसेच धर्म, जात हा विषय त्यात नाहीच. ज्या प्रमाणात वायुप्रदूषणात वाढ होतेय त्याच प्रमाणात जणू नीती निर्धारकांचा त्या संदर्भातील प्रतिसाद मंदावतोय, असे मत व्यक्त होताना दिसते. जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलेल्या २०१६ च्या आकडेवारीनुसार देशात दरवर्षी १ लक्ष मुले पाच वर्षांची होण्याच्या आतच मृत्युमुखी पडताना दिसताहेत. कारण हवाप्रदूषण त्याचप्रमाणे देशातील लोकांचे सरासरी आयुर्मानही जागतिक प्रमाणापेक्षा दोन ते तीन वर्षांनी घटतेय.आकडेवारी असे दर्शवते की जगातील इतर समकक्ष परिस्थिती असलेल्या राष्ट्रांच्या तुलनेत भारताची स्थिती वायुप्रदूषणाचा विचार करता अत्यंत वाईट आहे. ग्रीनपीस संघटनेच्या आकडेवारीनुसार जगातील ३० सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी २२ शहरे भारतातील असून दिल्ली ही जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी आहे. शेजारी देशांशी तुलना केल्यास स्थिती अधिकच वाईट असल्याचे दिसते. चीनचा आकडा पाच, पाकिस्तान दोन आणि बांगलादेशचा एक आहे. पर्यावरणीय कामगिरीचा विचार करता जागतिक क्रमवारीत भारत शेवटून चौथ्या म्हणजे १८१ राष्ट्रांत १७७ व्या स्थानावर आहे. उर्वरित क्रमांक बांगलादेश, बुरुंडी, डेमॉक्रेटिक रिपब्लिक आॅफ कांगो आणि नेपाळ यांचे आहेत.
राजधानी दिल्लीतील प्रदूषण रोखण्यासाठी हवीत कठोर पावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 04:50 IST