शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

हनुवटीवर ‘पारंपरिक ओळख’ मिरवणाऱ्या ओरिनीची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 07:50 IST

हनुवटीवर  टॅटू गोंदवून बातम्या देणारी न्यूज अँकर एवढीच ओरिनीची ओळख नाही. तिच्या संघर्षाचीही ती खूण आहे!

हनुवटीवर  टॅटू गोंदवून बातम्या देणारी न्यूज अँकर एवढीच ओरिनीची ओळख नाही. तिच्या संघर्षाचीही ती खूण आहे!ओरिनी कायपारा ही न्यूझीलंडमधील ३७ वर्षीय  न्यूज अँकर सध्या जगभरात  बातम्यांचा आणि चर्चेचा विषय झाली आहे. ही न्यूझीलंडमधील  माओरी या आदिवासी जमातीची तरुणी. देशात राजकीय प्रतिनिधित्व मिळावं म्हणून या जमातीचा लढा चालू असताना ओरिनीने न्यूझीलंडमधील प्रसारमाध्यमांच्या  मुख्य प्रवाहात स्वत:ची  पारंपरिक ओळख आणि वैशिष्ट्यांसह स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. गेल्या २० वर्षांपासून माओरी प्रसारमाध्यमात काम करते. आजवर ती फक्त दुपारच्या बातम्या द्यायची. पण, मागच्या आठवड्यात पहिल्यांदा तिने तिच्या वृत्तवाहिनीवर  प्राइम टाइममधे  बातम्या दिल्या आणि  संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं.

माओरी जमातीतल्या महिलांची ओळख असलेला ठसठशीत टॅटू हनुवटीवर गोंदवलेल्या ओरिनीने प्राइम टाइममधे आपल्या या “खुणेसकट” प्रवेश केला, हे महत्त्वाचं! स्वतः:च्या हनुवटीवरचा टॅटू  न पुसता जगासमोर येण्याची तिची ही कृती महत्वाची ! समाजाच्या मूळ प्रवाहात सामील होण्यासाठी आपली मुळे विसरण्याची गरज नाही या जागतिक भावनेला ओरिनीने एका नवा अर्थ दिला आहे.हा टॅटू म्हणजे मोको काऔ या महिलांची ओळख आहे. 

ओरिनीने २०१७मध्ये  आपल्या हनुवटीवर हा टॅटू गोंदवला. चार मुलांची आई असलेली ओरिनी मोठ्या आत्मविश्वासाने आपल्या क्षेत्रात वावरते आणि तीही आपली पारंपरिक आणि सांस्कृतिक ओळख घेऊन.  हा टॅटू गोंदवण्याची पध्दत आधुनिक काळात इतिहासाच्या पुस्तकापुरतीच सीमित होती. 

पण, आपण माओरी आहोत  हे दाखवणारी ओळख गोंदवण्याची पध्दत १९९०पासून पुन्हा सुरु झाली. ही पध्दत प्रामुख्याने आपल्याला पुरेसं राजकीय प्रतिनिधित्त्व मिळावं, यासाठी  होती. पण ओरिनीने हा टॅटू गोंदवला तो अभिमानानं. आपण आपली ओळख लपवून, सांस्कृतिक खुणा दडपून ठेवण्याचं कारण नाही. आपल्या सांस्कृतिक खुणांमधे आपली  ताकद आहे, या शब्दात ओरिनीने आपल्या जमातीतील इतर मुलींनाही प्रेरणा दिली आहे.- माधुरी पेठकर

टॅग्स :New Zealandन्यूझीलंड