शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

पतंगराव कदम नावाचे वादळ

By वसंत भोसले | Updated: January 8, 2018 00:47 IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांचा आज वाढदिवस. ते अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्त...

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांचा आज वाढदिवस. ते अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्त...डॉ. पतंगराव कदम यांचा सळसळता उत्साह पाहण्यासारखा असतो. सांगली जिल्ह्यातील सोनसळ या लहान खेड्यातील शेतकºयाचा हा मुलगा. गावात चौथीपर्यंतच शाळा, पुढे कुंडलला माध्यमिक शिक्षण पूर्ण करून पुणे गाठले. द्विपदवीधर झाले. शिक्षक झाले. एक शिक्षकी शाळेत काम केले. राजकीय, शैक्षणिक पार्श्वभूमी नाही. मात्र, काहीतरी आगळंवेगळं करायचं असं त्यांच्या मनात पक्कं होतं. नावामागे डॉक्टरेट लागली. कुलपती पद लागले. आमदारपद आले. मंत्रिपद आले. ज्या ज्या क्षेत्रांत काम करण्याची ऊर्मी बाळगली, त्यात यशस्वी होतच गेले. काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून धडपडणारा एक छोटा कार्यकर्ता १९८० मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढविली आणि दोन-अडीचशे मतांनी पराभूत झाले. ही पहिलीच निवडणूक होती. सांगली जिल्ह्यात वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भरभक्कम होती, तेव्हा अपक्ष निवडणूक लढविण्याचे धाडसच आहे.पराभव झाला म्हणून खचून जाणारे ते पतंगराव कदम नव्हते. १९८५ मध्ये पुन्हा लढत दिली आणि आमदार झाले. तेव्हापासून १९९५ चा अपवाद वगळला तर सहावेळा निवडून आले. राजकारणात यशामागून यश मिळत असताना गावची कामं करणे कधी सोडले नाही. वास्तविक, पतंगराव कदम यांच्या राजकारणाची अधिक चर्चा होते; पण ते खरे शिक्षण प्रचारक-प्रसारक आहेत. सामान्य माणसांच्या घरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे, यासाठी १९६७ मध्ये स्थापन केलेल्या भारती विद्यापीठाचा प्रचंड विस्तार वाढत राहिला. सहकारातील त्यांच्या कामाची चर्चा कमी होते. त्यांनी बँक, सूत गिरण्या, साखर कारखाने स्थापन केले. या सर्व संस्था उत्तम चालविल्या आहेत. त्यांच्या ६०व्या वाढदिवसानिमित्त सांगलीत निवडक पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले होते, मला सांगलीत भव्यदिव्य रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करायचे आहे. तो शब्द खरा करण्यासाठी केवळ एकच वर्ष लागले. २००५ मध्ये ६१ व्या वाढदिवसाच्या वेळी त्यांनी ५० एकरांवरील वैद्यकीय महाविद्यालयाचा पाया खोदला. बारा वर्षांत त्या जागेवर शंभर कोटी रुपयांचा वैद्यकीय महाविद्यालयाचा परिसर फुलला आहे. उत्तम सेवा, गरिबांना आधार देणाºया योजना येथे सुरू आहेत.आपल्या मतदारसंघाचा कायापालट कसा करावा, याचे उत्तम उदाहरण त्यांचा पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ आहे. त्यांनी आपल्या मतदारसंघात दोन तालुके स्थापन केले. त्या तालुक्यांची सर्व कार्यालये पाच वर्षांत पूर्ण बांधून काढली. ताकारी योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहून कृष्णेच्या पाण्याच्या शिंपणाने कडेगाव तालुक्याचे नंदनवनच झाले आहे. अशी असंख्य कामे करताना अगदी मोकळा स्वभाव आणि धाडसीपणा ही दोन्ही रूपे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सातत्याने दिसतात. गरिबांविषयी प्रचंड कणव व श्रीमंताविषयी आकस नाही; पण आपणाला जे मिळाले आहे ते इतरांना दिले पाहिजे, ते सर्वांना वाटले पाहिजे असे ते एकदा म्हणाले आणि तसेच वागत राहिले. त्यामुळेच एक सामान्य माणूस वादळासारखा सतत सार्वजनिक कामात गर्जत राहिला. अशा या व्यक्तिमत्त्वाला अमृतमहोत्सवानिमित्त सलाम! 

टॅग्स :Patangrao Kadamपतंगराव कदम