शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

मानसिक अनारोग्याचे ‘खेळ’ थांबवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 05:34 IST

mental illness: लॉकडाऊनमध्ये अनेक जण ड्रीम ११ सारख्या ऑनलाइन सट्टेबाजीकडे ओढले गेले. मानसिक स्वास्थ्य बरबाद करणाऱ्या या प्रकाराला कायद्यानेच पायबंद हवा!

-अ‍ॅड. असीम सरोदे(संविधान विश्लेषक, कायदेतज्ज्ञ) 

ऑनलाइन गेमिंगचे सध्या पेव फुटले आहे. जिथे केवळ ‘गेम ऑफ लक’ नाही तर प्रकर्षाने तो ‘कौशल्यावर आधारित गेम’ (preponderantly a game of skill) असेल त्याला सट्टा म्हणता येणार नाही, असा कायद्याचा तांत्रिक अन्वयार्थ काढणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि भारतात सर्वत्र ऑनलाइन खेळ नवनवीन स्वरूपात सरसावून पुढे आले. लॉकडाऊन काळात अनेक जण या ऑनलाइन सट्टेबाजीकडे ओढले गेले. केवळ युवकच नाहीत तर लहान मुलेसुद्धा यामध्ये मानसिकदृष्ट्या आजारी होण्याकडे प्रवास करीत आहेत.आजपर्यंत कोणीही या विषयाकडे कायद्याच्या अंगाने लक्ष दिले नाही. ऑनलाइन गेमिंगमुळे सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून रात्ररात्रभर गेमिंगमध्ये मग्न असणारी मुले आजूबाजूला बघायला मिळतात. अनेक कार्यालयांमधील कामगार व कंपन्यांमधील इंजिनीअर असलेलेसुद्धा नादी लागले आहेत.सट्टेबाजी प्रतिबंध करणारा कायदा प्रत्येक राज्याचा वेगळा आहे. केंद्र सरकारचासुद्धा कायदा आहेच; पण हे सगळे कायदे कमकुवत व जुने आहेत.सट्टेबाजीबद्दलचे कायदे बदलणार, हे जुने कायदे कचऱ्याच्या डब्यात टाकणार, सट्टेबाजी बंद करून मेहनत व श्रम यांच्या आधारे जगणारा बलशाली भारत तयार करणार, अशी घोषणा करणारा एखादा राजकीय नेता बघितला का कुणी?- नाही! कारण या विषयाचे राजकारण होऊ शकत नाही. उलट राजकीय नेते, पोलीस यांना मोठ्या प्रमाणात पैसा खाता येतो.ड्रीम ११ ही आयपीएलला जोडून तयार झालेली अशीच सट्टेबाजी! विना-श्रम पैसे कमावण्याची चटक लागलेली पिढी यातून तयार होते आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ऑनलाइन गेम खेळणे आणि यातून होणारे मानसिक आजार सर्वमान्य केले आहेत. त्याला ICD Standards (International Classification of Diseaces) म्हणजे आजारांचे आंतरराष्ट्रीय वर्गीकरण करण्याच्या पद्धतीनुसार आजार म्हणून समाविष्ट केले आहे. वैश्विक स्तरावर आरोग्याच्या समस्यांवर आधारित आजारांचे कल ओळखण्याच्या जगातील आरोग्य अभ्यासकांनी विकसित केलेल्या प्रक्रियांवर आधारित ‘गेमिंग डिसऑर्डर’चा ११ महत्त्वाच्या आजारांमध्ये समावेश होणे याचा काहीच संदर्भ आपल्याला घ्यायचा नसेल तर आपण मांजरीप्रमाणे डोळे मिटून वास्तवाकडे दुर्लक्ष करीत आहोत. डिजिटल व व्हिडिओ गेमिंग ॲक्टिव्हिटीचा आजार मानसिक स्वास्थ्य बिघडवितो म्हणजे गेम खेळताना कोणत्याच इतर आवश्यक कामांनासुद्धा प्राधान्य न देणे, आजूबाजूची परिस्थिती विसरून बेभान होणे, गेमच्या मध्ये कुणीही व्यत्यय आणला तर चिडचिडा तर कधी हिंसक प्रतिसाद देणे हे प्रकार वाढत चालले आहेत हे नवीन वास्तव आहे. सर्वोच्च न्यायालयाने तर कायद्याचे तांत्रिक अर्थ काढीत निर्णय देऊन टाकला; पण त्याचा देशातील पिढीवर होणाऱ्या दुष्परिणांचा विचार केला नाही. मेहनत न करता पैसा कमावण्याच्या प्रवृत्तीला बढावा देणे चुकीचे आहे.  प्रश्न केवळ कायद्याच्या तांत्रिक अर्थांचा नसतो तर मानवी जीवन निरर्थक होऊ शकते या भीतीचासुद्धा असतो.  कल्पनाविलासावर आधारित खेळ अनेकांना आळशी बनवितात आणि दैववादी बनवून पिढीच्या पिढी बरबाद करतात. निदान महाराष्ट्र शासनाने तरी राज्यातील गॅम्बलिंग संदर्भातील कायदे बदलावेत. बेटिंग व गॅम्बलिंग भारतीय संविधानातील ७ व्या परिशिष्ट यादी II आयटेम ३४ नुसार राज्य सरकारच्या अखत्यारीतील विषय आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत लोकांची कमिटी या विषयावर सल्ला देण्यासाठी गठीत करून याची सुरुवात होऊ शकते. व्हिडिओ ऑनलाइन गेमिंगबाबतच्या न्यायालयीन निर्णयांचा एकत्रित पुनर्विचार झाला पाहिजे. बलशाली भारत  काही एका दिवसाचा योगा डे करून निर्माण होणार नाही. सर्व वल्गना  हवेत विरून जातील इतका व्हिडिओ गेमिंगचा प्रवाह जोरदार आहे! नवीन कायदा करून हे खेळ वेळीच थांबविणे जरुरीचे आहे.asim.human@gmail.com

टॅग्स :Healthआरोग्यMental Health Tipsमानसिक आरोग्य