शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

दगड मारण्यास कारण की....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 10:41 IST

लोकलवर दगड मारणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथक नेमल्याची घोषणा दोन आठवड्यांपूर्वी रेल्वे प्रशासनाने केली. त्यानंतर लोकलवर दगडफेक होण्याच्या घटनात वाढ झाली.

विनायक पात्रुडकर

लोकलवर दगड मारणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथक नेमल्याची घोषणा दोन आठवड्यांपूर्वी रेल्वे प्रशासनाने केली. त्यानंतर लोकलवर दगडफेक होण्याच्या घटनात वाढ झाली. हा योगायोग म्हणावा की रेल्वे प्रशासनाला दिलेले खुले आवाहन. अशा घटना घडण्याला रेल्वे प्रशासनदेखील  जबाबदार आहे हे नव्याने सांगायला नको. गेल्या काही वर्षांत मुंबईवर झालेले अतिक्रमणही या घटनांना पोषक ठरले आहे. रेल्वे हद्दीत एक फेरफटका मारला तरी तेथील सुरक्षारक्षक हटकतात आणि याच हद्दीच्या शेजारी अनधिकृत झोपड्या उभ्या आहेत. बहुतांश रेल्वे स्थानक, रूळांशेजारी झोपड्यांचे जाळे आहे. या अनधिकृत झोपड्यांना वीज, पाणी मिळते़ त्यामुळे अशा झोपड्यांची आकडेवारी दुप्पटीने, तिप्पटीने वाढली आहे.  याला अर्थातच राजकीय नेत्यांचे, स्थानिक गुंडांचे व भ्रष्ट अधिकाऱ्यांचे पाठबळ आहे. येथे राहणारे कोण आहेत, हे शोधले तर बहुतांश परप्रांतीय आहेत. हा भेदभाव स्थानिक व परप्रांतीय असा नाही, तर गरीबी व श्रीमंती असाही केला जातो आहे. त्यात समाधान मानणे हे प्रत्येकालाच जमत नाही.

मानवी प्रवृत्तीची सतत धडपड सुरू असते काही ना काही मिळवण्याची. या स्पर्धेत नैराश्य येते. अपयशाचे खापर फोडण्यासाठी कोणी तरी हवा असतो. अशा परिस्थितीतून समाजकंटक तयार होतात व लोकलवर दगड फेकण्याच्या घटना घडतात. अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करा, असे आदेश उच्च न्यायालयाने वारंवार दिले आहेत. त्यानुसार कारवाई देखील होते़ ही कारवाई तात्पूरती असते़ काही दिवसांनी पुन्हा तेथे झोपड्या उभ्या राहतात. गेली चार दशके या परिस्थितीत काहीही बदल झालेला नाही. अधिकारी कितीही शिस्तीचा असो त्याची कारवाई कधीही यशस्वी झाली नाही. एवढच काय तर घाटकोपर स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या झोपड्यांमध्ये वेश्या व्यवसाय चालतो. त्याला पोलिसांपासून सर्वांचेच अभय आहे. असे प्रकार रेल्वे रूळाशेजारी सुरू असतील तर समाज घातक घटना कशा रोखल्या जाणार, असा प्रश्न आहे. 

प्रवासात हवा घेण्यासाठी रेल्वे प्रवासी दरवाजात उभे असतात. हवा घेण्याच्या नादात एक दगड येतो आणि गंभीर दुखापत करतो.  मात्र अशा घटना थांबायला हव्यात व ती सर्वस्वी जबाबदारी रेल्वेचीच आहे. संपूर्ण देशात मुंबईतून सर्वाधिक महसूल रेल्वेला मिळतो. तरीही मुंबईकरांना सोयी सुविधा मिळत नाहीत़ किमान प्रवाशांना प्रवासात दगड लागणार नाही, याची तरी काळजी रेल्वे प्रशासनाने घ्यायला हवी. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. संपूर्ण जगातील पर्यटक येथे येतात. त्यामुळे लाजेखातर तरी रेल्वे प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था चोख ठेवयाला हवी. कारण परदेशात अशा घटना घडत नाहीत, हे वेगळे सांगायला नको. तेव्हा प्रवाशांचे हित व सुरक्षा रेल्वेने जपायला हवी.

 

टॅग्स :localलोकलMumbaiमुंबईcentral railwayमध्य रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे