शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

मुक्तीच्या आंदोलनाची अजूनही गरज

By admin | Updated: August 9, 2015 03:19 IST

मुक्तीचा संग्राम संपला आहे, असं मी मानत नाही. राजकीय स्वातंत्र्य मिळाले, पण स्वराज्य प्राप्त झालेलं नाही. महात्मा गांधींनी कधीही ‘स्वातंत्र्य’ शब्द वापरला नाही. त्यांचा शब्द होता स्वराज्य.

- न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी (निवृत्त)मुक्तीचा संग्राम संपला आहे, असं मी मानत नाही. राजकीय स्वातंत्र्य मिळाले, पण स्वराज्य प्राप्त झालेलं नाही. महात्मा गांधींनी कधीही ‘स्वातंत्र्य’ शब्द वापरला नाही. त्यांचा शब्द होता स्वराज्य. ते अजून स्थापन झालेलं नाही. धार्मिक, आर्थिक, सामाजिक असल्या कुठल्याच गुलामगिरीतून आपण खऱ्या अर्थाने अजूनही मुक्त झालेलो नाही. या सर्व क्षेत्रांत अजून मुक्तीच्या आंदोलनाची गरज आहे.सत्तेचं विकेंद्रीकरण झालं नाही, उलट केंद्रीकरण झालं. ‘बुनियादी शिक्षण’ ही गांधीजींची भावना होती, ती शिक्षण क्षेत्रात आली नाही. आम्ही मुंबईच्या ज्या भागात राहतो तेथील कुठल्याही घरामध्ये मातृभाषा मराठी राहिलेली नाही. म्हणजे कुठल्याच घरामध्ये असा नातू नाही, जो आजी-आजोबाला मराठी भाषेतून पत्र लिहू शकेल. म्हणून इंग्रज गेले अंग्रेजियत कायम आहे. आम्ही दोनच प्रकारचे स्वातंत्र्य मानत होतो, एक त्यागावर आधारित दुसरे भोगावर आधारित. त्यागावर आधारित संस्कृती जोपर्यंत प्रस्थापित होत नाही आणि गांधींची ग्रामस्वराज्याची कल्पना जोपर्यंत सार्थक होत नाही, तोपर्यंत स्वराज्य आलं असं आम्हाला वाटत नाही. स्त्रियांबद्दलचा प्रश्न, मजुरांचा प्रश्न असो वा शेतकऱ्यांचा प्रश्न असो सर्व क्षेत्रांत अजूनही मुक्तीच्या चळवळींची गरज आहे. श्रमाला प्रतिष्ठा नाही म्हणून कोणीही शेती करू इच्छित नाही. प्रतिष्ठेचं जगणं याला आम्ही स्वातंत्र्य म्हणतो, स्वराज्य म्हणतो; जे अजून मिळायचं आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रांत आज मुक्तीच्या चळवळीची गरज आहे.

(लेखकांनी छोडो भारत चळवळीत सहभाग घेतला होता.)