शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

काठ्या पडल्या, डोस्की फुटली, आता ‘सातबारा’ सोपा होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 00:49 IST

जमिनीवरील मालकी हक्क सांगणारा कायदेशीर शासकीय अभिलेख म्हणजे ‘सात-बारा’. हा उतारा जमिनीची ओळख व जमिनीचा आरसा

तलाठ्याच्या चावडीत मिळणाऱ्या वितभर लांबीच्या सातबाºयाच्या कागदी तुकड्याचे महत्त्व ज्यांनी बांधावरचे तंटे अनुभवले ते चांगले जाणतात. सातबारा संपला की आपले जीवनच संपले असे बळीराजा मानतो. हा सातबारा मिळविण्यासाठी तासन्तास तलाठी चावडीपर्यंत खेटे मारत अनेकांनी आपल्या वहाणा झिजविल्या तर काहींनी सातबाºयासाठी खूनखराबाही केला. या सातबाºयाची कहाणी १९९७च्या अहमदनगर मराठी साहित्य संमेलनात टी.एन. परदेशी या कवीने मांडली होती.

सातबारापायी नंबरा-नंबरात जुपलीकुणाचा बांध सरकला, कुणी वाट अडवलीकाठ्या पडल्या, डोस्की फुटलीकधी कचाकच कुºहाडी घुसल्याधावून गेला जामीनकीलाही सातबाराशेतकºयाच्या उशाला-पायथ्याला अन् शेतकºयाचे अगदी अंथरूण-पांघरूणदेखील सातबारा असतो हे या कवीने सांगितले. सातबाºयाचा कागदी तुकडा हातावर पडला म्हणजे तलाठी भाऊसाहेबांनी आपल्यावर मेहेरबानी केली अशीच शेतकºयाची भावना असे. अर्थात जिंदगी गेली तरी अनेक शेतकऱ्यांना सातबाºयावरील उभे, आडवे रकाने समजले नाहीत. असा हा ‘रहस्यमयी’ सातबारा आता सुलभ होतो आहे ही महसूल क्षेत्रातील क्रांतीच म्हटली पाहिजे.

जमिनीवरील मालकी हक्क सांगणारा कायदेशीर शासकीय अभिलेख म्हणजे ‘सात-बारा’. हा उतारा जमिनीची ओळख व जमिनीचा आरसा. तलाठ्याकडे २१ प्रकारचे गाव नमुने असतात. त्यापैकी सातबाºयात ‘सात’ आणि ‘बारा’ असे दोन नमुने समाविष्ट असतात. ‘सात’ या नमुन्यात जमिनीचा मालक, त्याचे एकूण क्षेत्र, लागवडीलायक क्षेत्र व खराबा, जमिनीवर इतर कुणाचा हक्क आहे का? जमिनीवर कर्ज आहे का? याचा तपशील असतो. नमुना ‘बारा’मध्ये जमिनीत कोणत्या हंगामात कोणते पीक व घटक पीक घेतले, पाण्याची सुविधा काय? याची माहिती असते. या दोन्ही नोंदी म्हणजे सातबारा. या नोंदींना कायद्याच्या भाषेत खूप महत्त्व असते. जमीनमालक काय सांगतो त्यापेक्षा सातबाºयात काय लिहिलेले आहे त्याला कायद्याने महत्त्व असते.

सातबाºयात बदल का होत आहेत?

पूर्वी तलाठी कार्यालयात गेल्यानंतर तलाठी रजिस्टरमधील नोंदी पाहून एका छापील सातबारा नमुन्यात वरील सर्व तपशील हस्ताक्षराने लिहित. लिखापढीची ही प्रक्रिया वेळखाऊ होतीच; पण भाऊसाहेबांच्या अक्षराचे फराटे ओळखताना नाकात दम येई. त्यात ‘ध’चा ‘मा’ होऊन अनेक घोळ झाले. त्यामुळे शासनाने प्रथम या उताºयांचे २०१५ साली संगणकीकरण केले, नंतर तो आॅनलाइन केला. आता २ सप्टेंबरला त्यात आणखी बारा प्रकारच्या सुधारणा करुन तो सुलभ केला आहे.ब्रिटिशकाळात एम.जी. हार्टनेल अँडरसन यांनी महसूल मॅन्युअल तयार केले. त्यात १९४१मध्ये सुधारणा झाल्या. त्यानंतर आठ दशकांनंतर नवीन महसुली लेखांकन येत असून, सातबाºयात सुधारणा होत असल्याचा महसूल विभागाचा दावा आहे. जगात कोठेही घरबसल्या १५ रुपयांवर आता तलाठ्याच्या डिजिटल स्वाक्षरीसह सातबारा मिळेल.

नवीन बदल कोणते असतील?नवीन सातबाºयावर वरच्या बाजूला शासनाचा लोगो व महाभूमी प्रकल्पाच्या लोगोचा वॉटरमार्क असेल.गावाच्या नावासोबत एक कोडनंबरही असेल.लागवडीलायक व पोटखराबा क्षेत्राची एकत्रित बेरीजही आता दिली जाईल.पूर्वीच्या सातबाºयात मयत खातेदार, क्षेत्र विक्री केलेले खातेदार, इतर हक्कातील कमी केलेले कर्ज या नोंदी कंसात असत. आता या नोंदी कंसात असतीलच; पण त्यावर आडवी रेघ मारून खोडल्या जातील.पूर्वीच्या सातबाºयात खातेक्रमांक हा इतर हक्क रकान्यात होता. आता मालकाच्या नावासोबतच असेल.जमिनीचे मालक एकापेक्षा अधिक असतील तर दोघांच्याही नावात आडवी डॉटेड रेघ मारली जाईल.शेती व बिनशेती क्षेत्रासाठी वेगवेगळ्या स्वरूपातील उतारे असतील.बिनशेती उताºयात पिकाबद्दलची माहिती नसेल.शेती क्षेत्रासाठी हेक्टर आर चौरस मीटर व बिनशेती क्षेत्रासाठी आर चौरस मीटर एकक दाखवले जाईल.प्रलंबित फेरफार उताºयावरच दिसतील. नवे व जुने फेरफार, तसेच जमिनीत शेवटचा फेरफार कधी झाला तो क्रमांक व तारीखही उताºयावर नमूद असेल.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र