शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

... हा तर राजकीय आत्मघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 4:40 PM

भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी दिलेला राजीनामा आणि त्यानंतर डॉ.संजीव पाटील यांची त्या पदावर झालेली निवड हा घटनाक्रम अनपेक्षित नसला तरी सत्ताधारी बनलेल्या पक्षातील अंतर्गत खळबळ दर्शविणारा आहे

मिलिंद कुलकर्णीभाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी दिलेला राजीनामा आणि त्यानंतर डॉ.संजीव पाटील यांची त्या पदावर झालेली निवड हा घटनाक्रम अनपेक्षित नसला तरी सत्ताधारी बनलेल्या पक्षातील अंतर्गत खळबळ दर्शविणारा आहे. वाघांची शिकार केल्याचा आव कुणी आणत असले तरी मुळात वाघ यांचा हा राजकीय आत्मघात आहे, असेच म्हणावे लागेल.राजकीय पक्षांमध्ये सदासर्वकाळ एका नेत्याची सत्ता अबाधीत राहत नाही. काळ, परिस्थिती बदलत जाते, तसे नेतृत्वाचेही होत जाते. चाणाक्ष नेते परिस्थितीचा अचूक अंदाज घेऊन हालचाली करतात, स्वत: बदलतात किंवा बंडाचा झेंडा हाती घेऊन परिस्थिती अनुकूल बनवितात. हल्ली बंडाचा झेंडा घेऊन परिस्थिती बदलण्याएवढी ताकद नेत्यांमध्ये राहिलेली नाही. छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे, एकनाथराव खडसे या नेत्यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला, पण फारसे यश हाती लागले नाही. ही पार्श्वभूमी पाहता स्मिता आणि उदय वाघ या विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेल्या उच्चशिक्षित दाम्पत्याकडून मोठ्या अपेक्षा असताना असे घडणे दुर्देवी आहे. मूळात राजकारणात एखाद्या दाम्पत्याची यशस्वी वाटचाल हा दुर्मिळ योग असतो. स्व. शरद्चंद्रिकाआक्का व डॉ.सुरेश पाटील, स्व.गोजरताई व रामरावदादा पाटील, प्रतिभाताई पाटील व डॉ.देवीसिंह शेखावत ही सन्माननीय उदाहरणे खान्देशात आहेत. महिलांसाठी आरक्षणाची तरतूद नसताना या महिला नेत्यांनी स्वकर्तृत्वाने राजकारणात स्वत:चा ठसा उमटविला. त्यांच्या यशात पतीसह संपूर्ण कुटुंबियांचेही मोठे योगदान होते, हे नाकारुन चालणार नाही.अलिकडे महिलांसाठी आरक्षणाची तरतूद झाल्यानंतर अनेक महिला नेत्यांनी राजकारणात सक्रीय सहभाग नोंदविला असला तरी त्यात राजकीय नेत्यांच्या कुटुंबातील महिलांची संख्या मोठी आहे. वाघ दाम्पत्यामध्ये आमदार स्मिता वाघ यांचे तसे नाही. उदय आणि स्मिता वाघ या दोघांनी विद्यार्थी चळवळीपासून सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली. स्वकर्तुत्वावर दोघांनी यश मिळविले. स्मिता या भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षांपासून प्रदेशाध्यक्ष, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, विधान परिषद सदस्य अशी वाटचाल राहिली. उदय वाघ यांनी ग्रामपंचायत, जिल्हा बँक संचालक, बाजार समिती सभापती या पदांपासून जिल्हाध्यक्षपदाची दुसरी कारकिर्द अशा चढत्या भाजणीने यश मिळविले.विद्यार्थी परिषद, रा.स्व.संघ यांची पार्श्वभूमी असल्याने या दोन्ही नेत्यांनी उत्तम जनसंपर्क आणि नेत्यांशी ऋणानुबंध जोडले. त्यामुळे विधान परिषदेची उमेदवारी असो की, लोकसभेची...अनेकांना मागे सारत त्यांनी ही कामगिरी बजावली होती. विशेषत: एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष या नात्याने उदय वाघ यांनी संघटनेची सूत्रे यशस्वीपणे हाताळली. जिल्हा बैठकांमधील वादळी चर्चा, प्रशिक्षण कार्यशाळांवर मुक्ताईनगर, बोदवड शाखांचा बहिष्कार अशा प्रसंगातून वाट काढत वाघ यांनी संघटनात्मक कार्यावर परिणाम होऊ दिला नाही. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, पालिका आणि आता लोकसभा निवडणुकीत भाजपच्या यशाची कमान चढती ठेवण्यात जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांचे योगदान नजरेआड करता येणार नाही.परंतु, एकीकडे यश मिळत असतानाच संघटनेत एकाधिकारशाही, घराणेशाही, आरोप यांची मालिकादेखील सुरु झाली. विद्यार्थी परिषदेचे पूर्व कार्यकर्ते असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्याकडे जळगावचे पालकमंत्रिपद आल्यानंतर वाघ दाम्पत्याचे वजन स्वाभाविकपणे वाढले. पाटील यांच्याशी घनिष्टता असताना जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यापासून मात्र दुरावा निर्माण होऊ लागला. महाजन यांचे मुख्यमंत्र्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध, संकटमोचक म्हणून निर्माण झालेली प्रतिमा, पक्षातील वाढलेले वजन लक्षात घेता हा दुरावा ठेवणे अयोग्य होते. आधी खडसे दुरावले असताना जिल्ह्यातील महाजन गटापासून अंतर राखणे हे वाघ दाम्पत्याला महागात पडले. लोकसभेची उमेदवारी मिळविताना महाजन यांना विश्वासात न घेतल्याने त्याचे परिणाम दिसून आले. अमळनेरात माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील यांना झालेली मारहाण वाघ यांच्या राजकीय आत्मघाताला कारणीभूत ठरली. पक्षसंघटनेत काम करताना प्रत्येकवेळी मनासारखे होतेच असे नाही, श्रध्दा आणि सबुरी हे गुण दीर्घकाळाच्या राजकारणाच्यादृष्टीने यशाचे गमक असतात. पक्षाने यापूर्वी भरभरुन दिलेले असताना काहीवेळा दिलेला नकार पचविण्याची ताकद, मनाचा मोठेपणा ठेवायचा असतो. तसे न घडल्याने अशी वेळ येते. राजकारण किती निर्दयी असते याचा अनुभव या प्रकाराने अधोरेखीत झाला. उमेदवारी कापली गेल्यानंतर ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’ असे जे वर्णन वाघ दाम्पत्याने केले होते, त्याची प्रचिती त्यांच्या राजीनाम्याने पुन्हा एकदा आली.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव