शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

एसटी कामगार चाललाय, थेट गिरणी कामगारांच्या वाटेने?..

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2021 07:05 IST

एसटी ची निर्मिती ‘बहुजन सुखाय आणि बहुजन  हिताय’ यासाठी आहे

ठळक मुद्देमागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही, हा हेकेखोरपणा कामगारांना आणि  एसटीलाही  थेट खड्ड्यात घालणार आहे. ताठर भूमिका प्रशासनाला न शोभणारी आहे.

डॉ. दत्ता सामंत यांचा १९८० च्या दशकाच्या सुरुवातीस झालेला मुंबईतील गिरणी कामगारांचा संप अभूतपूर्व होता. कारण त्या संपाने मुंबईतील गिरणी कामगार संपला, अन् गिरण्याही संपल्या. त्याची आज प्रकर्षाने आठवण यायला लागली. एसटी कामगारांचा भरकटत चाललेला संप  पाहिला की, काळजाचा ठोका चुकायला लागतोय. यांचा गिरणी कामगार होऊ नये असंच सामान्य माणसांना वाटतंय. खरं म्हणजे सामान्य माणसाच्या चळवळीतून खाजगी वाहतुकीचे राष्ट्रीयीकरण झाले आणि एसटी हे सार्वजनिक वाहतुकीचे वाहन म्हणून धावायला लागले. गरिबांच्या हक्काचे वाहन म्हणून एसटी कडे पाहिले जाते . महाराष्ट्र सरकारपेक्षा महाराष्ट्रातील एसटीचा  राज्याच्या विकासात मोठा वाटा आहे. केवळ एसटीमुळेच ग्रामीण बहुजनांची मुलं मुली शिकल्या. मोठ्या झाल्या . ग्रामीण भाग शहराशी जोडला गेला. आरोग्य सुविधांपासून अन्य अनेक सुविधा आम्हास एसटीनेच दिल्या. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या सामान्य माणसांच्या गरजा राज्य शासनापेक्षा एसटीने जास्त भागवल्या, हे मान्यच करावे लागेल.

एसटी ची निर्मिती ‘बहुजन सुखाय आणि बहुजन  हिताय’ यासाठी आहे . एसटी नफ्यासाठी चालवली जात नाही तर, ती गरजेसाठी चालवली जाते. गरजेसाठी उत्पादन हा समाजवादाचा पाया आहे आणि  नफ्यासाठी उत्पादन हा भांडवलदारीचा पाया आहे. एसटी समाजवादी समाज रचनेचे उत्तम उदाहरण आहे. अमुक मार्गावर किती पैसे मिळतात यापेक्षा त्या मार्गावरील किती लोकांची सोय होते, हे बघितलं  पाहिजे. आताचा संप पाहिला असता घड्याळाचे काटे उलटे फिरवण्याचा काहीसा प्रकार वाटतो. सत्तेचे विकेंद्रीकरण करणे हे आपल्या संविधानात अभिप्रेत आहे. सत्तर वर्षापूर्वी निर्माण झालेले वाहतूक महामंडळ रद्द करून सरकारने  वाहतूक धंदा ताब्यात घ्यावा, अशी मागणी करणे म्हणजे विकेंद्रीकरण  करण्याऐवजी केंद्रीकरण करावे अशी मागणी केल्याचा प्रकार आहे . वास्तविक एसटीचा केंद्रबिंदू प्रवासी हवा . एसटीचा विचार करताना तिथे काम करणारे लाखभर  कामगार केंद्रस्थानी न ठेवता १२ कोटी प्रवासी ठेवणे गरजेचे आहे . परंतु या संपामध्ये राजकीय पक्षांनी आपापला झेंडा आणि आपला अजेंडा आणला आहे. हे चूक आहे. एसटी कामगारांच्या संपाला पाठिंबा देणाऱ्या सगळ्या राजकीय पक्षांनी त्यांच्या राज्याच्या पक्ष पातळीवर खासगीकरणाच्या विरोधातला ठराव संमत करावा. मगच संपात भागीदारी करावी. आता तशी परिस्थिती नाही. राज्यात आणि  केंद्रात असणाऱ्या पक्षांचे धोरण  खाजगीकरणाचा  पुरस्कार करणारे, तर, स्थानिक नेते  खाजगीकरणाच्या विरोधात. हे काय आहे? 

मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही, हा हेकेखोरपणा कामगारांना आणि  एसटीलाही  थेट खड्ड्यात घालणार आहे. ताठर भूमिका प्रशासनाला  न शोभणारी आहे. एसटी आणि एसटीचे कामगार जिवंत राहावेत असं खरोखर वाटतेय का, अशी शंका घेण्याइतपत वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाचा कोडगेपणा , सरकारची उदासीनता आणि संप करणाऱ्यांची हेकेखोर वृत्ती. कामगारांना फरपटत नेणारी , दिशाहीन करणारी , अंतिमतः नुकसानीत आणणारी अशी बाब आहे. दोन्ही बाजूने त्याचा विचार करून एसटी वाचली पाहिजे. गरिबांच्या हक्काचं वाहन वाचलं पाहिजे. एसटी कामगारांचा गिरणी कामगार होईपर्यंत हा संप ताणू  नये . गिरण्या बंद पडल्या तसा प्रवासी वाहतुकीचा धंदा मोडीत निघेल तोपर्यंत प्रशासनानेही ताणू नये. त्यातच महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेचे हित आहे  .या संपाकडे बघताना लाखभर कामगारांच्या फक्त नोकऱ्या न बघता बारा कोटी  जनतेचे हितही पहावे लागेल. - ॲड. के. डी. शिंदे, सांगली

टॅग्स :MumbaiमुंबईST Strikeएसटी संपBus Driverबसचालक