शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

विशेष जनसुरक्षा कायदा: अकारण ऊर बडवून घेण्याचे काय कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 11:49 IST

Special Jan suraksha Act: संविधानविरोधी, बेकायदेशीर अशा शहरी माओवादी, फुटीरतावादी व्यक्ती व संघटनांच्या कृत्यांना प्रभावीपणे प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्रात विशेष जन सुरक्षा कायदा येऊ घातला आहे.

- सागर शिंदे(राज्य संयोजक, विवेक विचार मंच) 

संविधानविरोधी, बेकायदेशीर अशा शहरी माओवादी, फुटीरतावादी व्यक्ती व संघटनांच्या कृत्यांना प्रभावीपणे प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्रात विशेष जन सुरक्षा कायदा येऊ घातला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जाईल, कोणालाही तुरुंगात टाकतील, संघटनास्वातंत्र्य धोक्यात येईल अशा फक्त संशयाच्या आधारे पण हेतुपूर्वक  या कायद्याला विरोध केला जात आहे. या कायद्याची आवश्यकता का भासली? नेमका कायदा काय आहे व कशासाठी विरोध केला जातो आहे?

९६७ मध्ये पश्चिम बंगालच्या नक्षलबारी येथे सशस्त्र उठावातून माओवादी (नक्षल) चळवळ विकसित झाली. २००४ साली कम्युनिस्ट माओवादी गटांचे विलीनीकरण होऊन भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) तयार झाला. २००९ साली UPA सरकारने या संघटनेला दहशतवादी संघटना घोषित करून बंदी घातली.  

शहरी भागात विविध नावांनी  संघटना सुरू करायच्या व त्या माध्यमातून विशेषतः दलित, आदिवासी व वंचित घटकांना लक्ष्य करून त्यांच्यात घटनात्मक संस्थांच्या विरोधात जहाल विचार पसरवायचे काम माओवादी करतात.  आक्रमक आंदोलने, जलसे, गाणी, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सोशल मीडिया, प्रचार साहित्य, पत्रके यांच्या माध्यमांतून फुटीरतावादी जहाल विचार पेरायचे, तणावपूर्ण वातावरण निर्माण करून गृहयुद्धाची परिस्थिती निर्माण केली जाते. 

हे सर्व करताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला जातो. प्रतिबंधित माओवादी धोरणानुसार व्यक्ती व संघटनांच्याद्वारे चालविल्या जाणाऱ्या शहरी भागातील कार्यक्रमांना आपण शहरी माओवाद म्हणू शकतो. विविध गोंडस नावांनी अशा अनेक संघटना देशभर सक्रिय आहेत. त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी ‘विशेष जन सुरक्षा कायद्या’ची आवश्यकता भासते.

विशेष जनसुरक्षा कायदा काय आहे?माओवादी फ्रंट संघटनेची रणनीती व कार्यपद्धती वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याचे अनेक क्रियाकलाप हे यूएपीए कायद्याच्या कक्षेत येत नाहीत. त्यामुळे गुन्हे सिद्ध होण्यास अडथळे येतात व अनेकदा आरोपी निर्दोष सुटतात. अशा खटल्यांमध्ये शिक्षा लागण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे स्वतंत्र कायद्याची आवश्यकता आहे. जंगलातील शस्त्रधारी माओवादी सैन्याचा मुकाबला सुरक्षा दले करतात,  पण शहरातील माओवादी अनेक मुखवटे घेऊन वावरत असतात. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करताना अडचण येते. 

आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि ओडिशा या माओवादग्रस्त राज्यात बेकायदेशीर कृत्यांना अधिक प्रभावीपणे प्रतिबंध करण्यासाठी जनसुरक्षा कायदा लागू केलेला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात येऊ घातलेल्या जनसुरक्षा कायद्यावर अनेक शंका घेत विरोध केला जातोय, अर्धवट व सोयीस्कर बोलले जात आहे. या कायद्यान्वये कारवाई करताना विनाकारण कोणाही व्यक्तीला अटक किंवा संघटनेवर बंदी घालणे असे होणार नसून कायदेशीर प्रक्रिया राबविली जाणार आहे. 

यामध्ये एक सल्लागार मंडळ गठित केले जाणार असून त्यात उच्च न्यायालयाचे तीन न्यायाधीश असणार आहेत. एखाद्या संघटनेवर बंदी घालताना या मंडळासमोर अहवाल सादर करावा लागेल तसेच संबंधित संघटनेलासुद्धा भूमिका मांडण्याची संधी दिली जाईल. या कायद्यान्वये व्यक्तीवर गुन्हा दाखल करताना पोलिस उपमहानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागणार आहे. मुळात हा कायदा बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या व्यक्ती व संघटनांना आळा घालण्यासाठी आहे. त्यामुळे अशा दुष्कृत्यात सहभागी नसलेल्या व्यक्ती व संघटनांनी ऊर बडवून घेण्याची काय गरज आहे? 

नागरिकांनी, संघटनांनी या कायद्याच्या मसुद्यासंदर्भात आवश्यक दुरुस्त्या जरूर सुचवायला हव्यात; पण ‘कायदाच नको’ अशी भूमिका लोकशाहीला घातक ठरेल. कारण हा संविधान व राष्ट्रीय सुरक्षेचा विषय आहे. काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक पक्षांनी बेकायदेशीर माओवादी, फुटीरतावादी व्यक्ती व संघटनांवर याअगोदर कठोर कारवाई केलेली आहे.  

नोव्हेंबर २०२१ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी गडचिरोली दौऱ्यात म्हटले होते कि, राज्यातील बड्या शहरांमध्ये शहरी नक्षलवाद वेगाने पसरत आहे. त्यामुळे सरकारने त्वरित कारवाई करावी. आता नेत्यांनी सोयीस्कर राजकीय भूमिका न घेता संविधानिक भूमिका घ्यावी. लोकशाहीविरोधी कम्युनिस्ट माओवादी संघटनांनी गेल्या पन्नास वर्षांत सुरक्षा दलांमधले पोलिस, जवान तसेच शेकडो दलित आदिवासी बांधवांचे हत्याकांड केलेले आहे. आज केंद्र व राज्य सरकार जंगलातील माओवाद्यांच्या विरोधात अत्यंत कठोर कारवाई करत आहे. अनेक माओवादी शरण येत आहेत. 

नक्षलग्रस्त भागात विकासाच्या योजना राबविल्या जात आहेत. शहरातील जास्त धोकादायक समाजविघातक माओवादी, फुटीरतावादी गट मोकाट सुटू नयेत, यासाठी ‘विशेष जनसुरक्षा कायदा’ निकडीचा आहे.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारnaxaliteनक्षलवादीMediaमाध्यमे