शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
2
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
3
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
4
आ. विजयकुमार देशमुख यांचा असंतोष ३० तासात मावळला; मुंबईच्या बैठकीत उमेदवार निश्चित
5
Video: "पापाराझींना वाटलं सलमान खान कारमध्ये, पण...", चक्क ई-बाईकवरुन घेतली भाईजानने एन्ट्री
6
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
7
चांदी एका आठवड्यात ३२ हजारांनी महागली; तर सोन्याची ५७०० रुपयांची झेप; पाहा आजचे नवे दर
8
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
9
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
11
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
12
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? कोण मेले कोणासाठी..?
13
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
14
ये क्या था भाई? 'कमली कमली' गाण्यावर सुनिधी चौहानचा विचित्र डान्स, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
शाब्बास पोरी! प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूने घेतलं हक्काचं घर, कांची शिंदेंने शेअर केले फोटो
16
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांची टीका
17
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
18
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
19
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
20
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: म्हणेन ते धोरण, बांधेन ते तोरण?- नाही चालणार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 10:09 IST

United State: हुकूमशाही व्यक्तिवादाबद्दलचे अमेरिकी आकर्षण आटत आहे, हेच ममदानी यांच्या विजयातून सिद्ध होते. ढासळती लोकप्रियता ट्रम्प यांच्या पतनाचा संकेत आहे !

- प्रभू चावलागगनभेदी इमारतींची दाटीवाटी झालेल्या झगमगत्या न्यू यॉर्क शहरात धक्कादायक उलथापालथ झाली. जोहरान ममदानी हा ३४ वर्षीय  जहाल लोकशाही समाजवादी नेता महापौरपदाच्या निवडणुकीत विजयी होऊन न्यू यॉर्कच्या प्रदीर्घ इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात तरुण महापौर बनला आहे. हा केवळ मतपेटीतील विजय नाही. ट्रम्प यांचे व्यक्तिकेंद्रित राजकारण, त्यांचा विषारी विभाजनवाद आणि तथाकथित ट्रम्पीय अर्थकारण यांचे हे निर्मम उच्चाटन  होय. हुकूमशाही व्यक्तिवादाबद्दलचे अमेरिकी आकर्षण आटत आहे आणि  ढासळती लोकप्रियता ट्रम्प यांच्या अपरिहार्य पतनाचा संकेत देत आहे, ही गोष्ट स्पष्ट झाली.

२०१६ सालचा ट्रम्पोदय म्हणजे अनागोंदी. त्यांनी धोरण म्हणून भय भरवले आणि शस्त्र म्हणून अस्मिता वापरली. आता दुसऱ्या कार्यकाळाला एक  वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच त्यांच्या धोरणातल्या फटी रुंदावत त्यातून समस्यांची भली मोठी भगदाडे निर्माण होत आहेत. ममदानींचा विजय आणि त्याबरोबरच इतर काही महत्त्वाच्या निवडणुकींत डेमोक्रॅटिक पक्षाने मारलेली मुसंडी यातून ट्रम्प यांची पकड कमकुवत झाल्याचे दिसून येते. अमेरिकेच्या विविधतेची छोटी प्रतिकृती असलेल्या न्यू यॉर्कमधील मतदारांनी ट्रम्प यांचे बहिष्करणसूत्र अत्यंत  ठामपणे नाकारले आहे. कुरापतखोर ट्रम्पनी ममदानी यांच्या अस्मितेवरच घणाघात केला. उघड धमक्या दिल्या. त्यांनी केलेले वैयक्तिक पातळीवरचे हल्ले, तर दुष्ट आणि अपेक्षित स्वरूपाचे होते. ममदानींनी त्यावर वक्तृत्वसंपन्न आणि संस्कृतीसमृद्ध  प्रतिहल्ला चढवून  ट्रम्प यांचा किल्ला  जमीनदोस्त केला. 

सभेमागून सभेत ते आपले द्विवंशीय आणि आंतरधर्मीय मूळ आवर्जून सांगत  राहिले.  ट्रम्प यांच्या संकुचित राष्ट्रवादाच्या चिंधड्या उडवण्यासाठी  भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या ‘नियतीशी करार’ या सुप्रसिद्ध भाषणातील वाक्ये त्यांनी आपल्या विजयसभेत उद्धृत केली. अमेरिकन संदर्भात ती वाक्ये उचलत ममदानी गरजले, ‘जिथे हिंदू, मुस्लीम, ज्यू, ख्रिश्चन आणि नास्तिक हे सारे एकोप्याने राहतील, असे शहर आम्ही उभारू.’  ‘अमेरिका फर्स्ट’ म्हणत  ट्रम्प आणू पाहत असलेल्या अलगाववादाला दिलेला हा थेट तडाखा होता.   

ममदानी यांच्याबरोबरच मिशिगन राज्यातील  डिअरबॉर्नमध्ये अब्दुल्ला हमूद हे  लेबॅनिज-अमेरिकन मुस्लीम नेते महापौर म्हणून प्रचंड बहुमताने पुन्हा निवडून आले. न्यू यॉर्क राज्यातील बफेलो शहरात डेमोक्रॅटिक पक्षाच्या इंडिया वॉल्टन महापौर बनल्या. तीन डेमोक्रॅटिक महापौरांचा - त्यातले दोन तर मुस्लीम - हा विजय म्हणजे या नागरी पट्ट्यात ट्रम्पवादाला मिळालेली सणसणीत चपराकच म्हणावी लागेल. या पराभवांमुळे स्वदेशात, ट्रम्प यांची रिपब्लिकन पक्षावरची पकड ढिली होईल. २०२६ च्या मध्यावधी निवडणुका जवळ आल्या आहेत. महत्त्वाची शहरे डेमोक्रॅट्सच्या ताब्यात आली आहेत. व्हर्जिनियात अबिगेल स्पॅनबर्गर आणि न्यू जर्सीत मिकी शेरील, अशी गव्हर्नरपदेही त्यांना मिळाली आहेत. या विजयांमुळे ट्रम्पना आक्रमकपणे तोंड द्यायला डेमोक्रॅट्स सज्ज झालेत. प्रत्येक धोरणात्मक झुंज ही आता ट्रम्पच्या एकाधिकारशाही व्यक्तिवादाविरुद्धची लढाई बनवली  जात आहे. 

तथापि या सांस्कृतिक विजयाआड काही संभाव्य अडचणीही दडलेल्या आहेत. कागदपत्रे नसलेल्या स्थलांतरितांनाही जोरदार पाठिंबा देणे, कल्याणकारी योजनांचा महत्त्वाकांक्षी विस्तार करणे यांसह ममदानींचा व्यापक सामाजिक कार्यक्रम बेकायदेशीर प्रवेशाला  प्रतिबंध करणाऱ्या उपाययोजनात अडथळे आणू शकेल.  त्यामुळे डेमोक्रॅट्स हे सुरक्षिततेबाबत दक्ष नसल्याचे ट्रम्प यांचे तथ्य  बळकट होईल. स्थलांतर कायद्याच्या अंमलबजावणीबाबतच्या  ममदानींच्या नरम भूमिकेमुळे लोकांचा सीमा सुरक्षेवरचा विश्वास उडू शकेल. आपली गमावलेली लोकप्रियता परत मिळवण्यासाठी  ट्रम्प यांच्या हाती एक भक्कम  हत्यार मिळेल. 

स्थानिक नेते ट्रम्प यांना विरोध करू लागले आहेत. ममदानी यांनी, तर अवाजवी संघराज्यीय हस्तक्षेपातून न्यू यॉर्कला मुक्त करण्याचा विडाच उचलला आहे. ही लाट सर्वत्र पसरू शकते. त्यातून जागतिक अर्थकारण आणि राजकारणावरील ट्रम्प यांचे नियंत्रण सैल पडू शकते. अमेरिकेतली प्रमुख शहरे त्यांच्याविरोधात जात असल्याने चीन किंवा युरोपबरोबरच्या वाटाघाटीत त्यांचा प्रभाव फिका  पडेल. जागतिक पातळीवर  धाकदपटशा दाखवणे किंवा सौदेगिरी करणे ट्रम्प यांना कठीण होत जाईल.

कोणत्याही सशक्त लोकशाहीत, “म्हणेन ते धोरण, बांधेन ते तोरण” वृत्तीने एकाधिकार गाजवणारा व्यक्तिवाद  सामुदायिक इच्छाशक्तीच्या  ओझ्याखाली चिरडून चूर चूर होतो, हेच यातून सिद्ध होते. परंतु, विजेत्यांनाही आत्मसंतुष्ट राहून परवडणार नाही. ममदानींच्या डाव्या दृष्टिकोनाचा तोल सुटल्यास, ते डोक्यावर घेतात ती विविधताच धोक्यात येईल. विधायक ऐक्याऐवजी ध्रुवीकृत समूहच देशाच्या वाट्याला येतील. पण, नकारात्मक बाजू नीट हाताळू  शकले, तर ममदानींसारखे नेते नव्या पिढीला प्रेरणा देऊ शकतील. डेमोक्रॅट्सनी आपली विचारसरणी आणि आर्थिक व सुरक्षाविषयक विवेक यांच्यात योग्य समतोल राखला,  तर मध्यावधी निवडणुकात काँग्रेसमध्ये ते बाजी उलटवू शकतील. त्यामुळे ट्रम्प  झपाट्याने निष्प्रभ ठरत जातील.

English
हिंदी सारांश
Web Title : Unilateralism won't work: Collective will triumphs over individualistic dictatorship.

Web Summary : Mamadani's New York mayoral win signals a shift away from Trump's divisive policies. Democrats gain ground, but face challenges balancing progressive ideals with security concerns. The victory inspires a new generation.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUnited Statesअमेरिका