शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: ट्रोलिंगचा विखार जीव घेतो आहे, सावधान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 10:36 IST

Trolling: एखाद्यावर टीका केली की, सोशल मीडियावर विखारी बाणांचा वर्षाव सुरू होतो. व्हर्च्युअल जगात लोकप्रियतेसाठी धडपडणाऱ्यांच्या वाट्याला नैराश्य येते आहे!

- डॉ. रश्मी करंदीकर(पोलिस अधीक्षक, नागरी संरक्षण, मुंबई) 

उज्जैन येथे राहणाऱ्या १६ वर्षांच्या प्रांशू या मुलाने नैराश्यातून आत्महत्या केल्याचं पुढे आलं आहे. तो इन्स्टाग्रामवर मेकअप आणि फॅशनसंबंधित रिल्स बनवायचा. त्याच्या एका रीलवर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग झालं आणि ते सहन न झाल्याने त्याने मानसिक तणावातून आत्महत्या केली. या घटनेमुळे जीवघेण्या ट्रोलिंगचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.प्रांशू मेकअप आर्टिस्ट होता. इन्स्टाग्रामवर त्याचे सतरा हजार फॉलोअर्स होते. दिवाळीच्या दिवसांत प्रांशूने साडी नेसून मेकअप केलेले काही फोटो इन्स्टावर शेअर केले आणि चार हजारांपेक्षा जास्त हेट कमेंट्स आल्या. एवढा पराकोटीचा द्वेष सहन न होऊन तो नैराश्याच्या गर्तेत गेला आणि त्या भरात त्याने आत्महत्या केली. सोशल मीडियावर  एकाने विखारी टीका केली की, ते बघून दुसऱ्याला चेव येतो आणि मग एकापाठोपाठ एक विखारी बाणांचा वर्षाव सुरू होतो. हा विखार झेलणे नशिबी आलेल्या व्यक्तीवर  काय मानसिक परिणाम होत असेल, याचा यत्किंचितही विचार कुणी करीत नाही, हे आपल्यातल्या सहवेदना कमी झाल्याचे लक्षण आहे.  समाजमाध्यमांचा व्यापक प्रसार आणि वापरामुळे घराघरांत होणारे प्रत्यक्ष संवाद खुंटले आहेत. तरुण  मुला-मुलींना व्हॉट्सॲप स्टेटस, डीपी, इन्स्टा पोस्ट या माध्यमातून स्वतःला व्यक्त करण्याची सवय लागली आहे. व्हर्च्युअल जगच खरं मानून ते जगतात. व्हर्च्युअल जगात लोकप्रिय होणं हे त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं ठरत आहे. आपण इन्स्टावर नाही, टिंडर किंवा स्नॅपचॅट, बम्बलवर नाही, तर आपण मागासलेले आहोत, हा न्यूनगंडही वाढीस लागला आहे. किती लाइक्स आले, किती फॉलोअर्स आहेत, आपल्या पोस्टचा रिच काय आहे, या सगळ्यांकडे त्यांचं खूप लक्ष असतं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतचे सगळे तपशील समाजमाध्यमांवर शेअर केले जातात. कधीकधी लाइक्स वाढविण्यासाठी काहीतरी सनसनाटी शेअर केलं जातं.या पिढीचं जगणंच इंटरनेट आणि समाजमाध्यमांवर अवलंबून आहे. त्याचे फायदे जेवढे आहेत तेवढेच तोटेही आहेत. पूर्वी घरोघरी एकत्र बसून गप्पा व्हायच्या, सार्वजनिक ठिकाणी कसं वागायचं, याचं भान घरातल्या संवादातून मिळायचं,  एखाद्या नातेवाइकांकडून किंवा शेजाऱ्याकडून काही वेडंवाकडं कानावर आलं तरी मुलांचं सॉफ्टवेअर घरच्या घरी अपडेट केलं जायचं. आताच्या व्हायरल जगात आपली मुलं सायबर स्पेसमध्ये कोणत्या नावाने वावरतात, काय बोलतात, कोणाला उद्देशून अपशब्द वापरतात, याची घरी सुतराम कल्पना नसते.सायबर जगात मुखवटे आणि चेहरे घेऊन वावरता येतं. एका प्रोफाइलसाठी एवढं मास्किंग केलं जातं की, ते अनेकवेळा काढूनदेखील खऱ्या व्यक्तीची ओळख पटवणं आणि तिच्यापर्यंत पोहोचणं हे फार जिकिरीचं काम आहे. त्यामुळे खोट्या मास्कसह इंटरनेटवर वावरणं, अपशब्द वापरणं, धमक्या देणं, अश्लील बोलणं, आई-बहिणीवरून शिव्या देणं आणि त्यासह ट्रोल करणं हे सर्रास घडताना दिसून येतं. ‘डीसीपी सायबर’ म्हणून काम पाहाताना माझ्याकडे अशा अनेक केसेस आल्या. एका प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या सात महिन्यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याची धमकी दिली गेली होती.  त्यात त्या व्यक्तीने एवढं मास्किंग केलं होतं की, राहण्याचं ठिकाण पीओके म्हणजे पाकव्याप्त काश्मीर, फोटो मुलीचा, नाव मुस्लीम अशा रीतीने तपास यंत्रणांना ठावठिकाणा समजू नये, अशी खबरदारी घेतली गेली होती. खोटं नाव, खोटा फोटो, लपवलेली ओळख. जे अपशब्द अथवा धमक्या प्रत्यक्ष देता येत नाही त्या मास्किंग करून देणं अशा प्रवृत्तींना सोपं जातं. त्यामुळे वेगवेगळ्या अकाउंटवरून ट्रोलिंग केलं जातं. कित्येकदा एकच व्यक्ती अनेक अकाउंट वापरून ट्रोल करते. अल्पवयीन मुलांमध्ये अशा प्रकारचं ट्रोलिंग सहन करण्याची क्षमता नसते. आई-वडिलांकडे किंवा कुटुंबीयांकडे त्याबाबत बोलताही येत नाही.  मग मानसिक स्वास्थ्य बिघडतं. मुलं डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात. मुलांना कुणाचाच आधार नसतो. खरंतर  शाळा-महाविद्यालयांच्या स्तरावर सायबर सुरक्षेविषयी कार्यशाळा घेणं आवश्यक आहे. सायबर सायकॉलॉजी, बुलिंग, ट्रोलिंग, स्टॉकिंग या गोष्टींना कसं सामोरं जावं, याबाबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. मोबाइल वापरतानाचे धोके, ट्रोलिंग, बुलिंग, स्टॉकिंग झाल्यावर काय पावलं उचलावीत, त्याबद्दल शाळेला, पालकांना लगेच कसं अवगत करावं, हे शिकवणं गरजेचं आहे.ट्रोलिंग करणं कसं चुकीचं आहे आणि ती एक प्रकारे विकृत मानसिकता आहे, हेही मुलांच्या मनात ठसवणं आवश्यक आहे. अन्यथा पीअर प्रेशरमध्ये सायबर स्टॉकिंग, सायबर बुलिंग, सायबर ट्रेलिंग हे आजच्या ‘जेन झेड’च्या भाषेत ‘कूल’ समजतात. त्याने डोपामाइन लेव्हल वाढते असाही एक गैरसमज आहे.  अनेक देशांत समाजमाध्यमांनी अल्गोरिदम अशा पद्धतीने सेट केलं आहे की, अशा कॉमेंट्स लगेच डिलिट होतात. विशेषतः महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने ते अतिशय आवश्यक आहे; परंतु भारतात अजून तसं दिसून आलेलं नाही. अशा द्वेषमूलक कंमेंट्स/ धमक्या डिलिट केल्यावर ते अकाउंटही बंद केलं पाहिजे. तरच ट्रोलिंगला आळा बसेल.तक्रार कुठे करावी?सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल :- https://www.cybercrime.gov.in सायबर क्राइम हेल्पलाइन :- 1930महाराष्ट्र सायबर ई-मेल :-ccpwc.cyber-mh@gov.in

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाTrollट्रोलCrime Newsगुन्हेगारी