शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
2
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
3
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
4
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
5
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
6
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 
7
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
8
मारुतीच्या 'या' SUV नं स्पर्धकांचं टेन्शन वाढवलं, मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग; ASEAN NCAP क्रॅश टेस्टमध्ये केली कमाल
9
जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...
10
दोस्तीतच कुस्ती! ६ महिन्यांपूर्वी लग्न झाले, ५ मिनिटांत घरी पोहोचणार होता; पण रस्त्यातच मित्रांनी संपवले
11
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
12
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या
13
Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
14
प्रबोधिनी एकादशी २०२५: देवउठनी एकादशीला विष्णू खरोखरच ४ महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात का?
15
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
16
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
17
BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
18
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
19
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
20
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट

विशेष लेख: इंदिरा गांधींच्या पावलांवर मोदींचे पाऊल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 10:20 IST

Narendra Modi: ‘मी गरिबी हटवू इच्छिते आणि विरोधक मला हटवू इच्छितात’, असे इंदिराजी म्हणाल्या होत्या; मोदीही त्याच मार्गाने विरोधकांशी लढण्यास निघाले आहेत!

- हरीष गुप्ता(नॅशनल एडिटर, लोकमत,नवी दिल्ली)आपल्याला कोंडीत पकडणाऱ्या विरोधी पक्षांशी वागताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हल्ली दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घालून दिलेल्या मार्गावरून जाताना दिसतात. मोदींना विरोध करणाऱ्यांपैकी बहुसंख्य राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या कडव्या विरोधात असले तरी  लोकसभा निवडणुकीपूर्वी ऐक्य घडविण्याचा प्रयत्न कसोशीने करत आहेत. इंदिरा गांधी यांच्याविरुद्ध कामराज, अतुल्य घोष, नीलम संजीव रेड्डी, स. का. पाटील आणि इतरांनी सिंडिकेट केली होती, याची आठवण व्हावी असे काहीतरी सध्या घडते आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्यांच्या घेराबंदीतून इंदिराजींनी आपली सुटका करून घेतली. याच मंडळींनी त्याना १९६६ मध्ये इंदिराजींना पंतप्रधानपदावर बसवले होते. नंतर त्यांना त्या ‘गुंगी गुडिया’ वाटू लागल्या. ही सिंडिकेट आणि त्याबरोबरच  भारतीय जनसंघ, स्वतंत्र पार्टी आणि इतर विरोधी पक्षांना जेरीस आणण्यासाठी इंदिरा गांधी यांनी गरिबांसाठी अनेक लोकप्रिय योजना जाहीर केल्या आणि लोकसभा निवडणूक वर्षभरासाठी अलीकडे ओढली. ‘मी गरीबी हटवू इच्छिते आणि हे (म्हणजे विरोधक) मात्र मला हटवू इच्छितात’ अशी त्यांची घोषणा होती. लोकसभा निवडणुकीत या घोषणेने जादू केली. ५२१ पैकी ३५२ जागा इंदिराजींनी जिंकल्या.

पंतप्रधान मोदी  इंदिरा गांधी यांचाच कित्ता गिरवताना दिसतात. ‘मी देशातला भ्रष्टाचार हटवू पाहतो, तर विरोधी पक्ष मला हटवण्यासाठी एकत्र येत आहेत’, असे म्हणून मोदी विरोधकांसमोर दोन हात करायला उभे ठाकले आहेत. २०२४ ची लोकसभा निवडणूक भ्रष्टाचाराच्या मुद्यावर लढण्याची त्यांची इच्छा आहे. भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत थोडीसुद्धा कसर राहता कामा नये, असे त्यांनी सीबीआय, ईडी आणि इतर संस्थांना सांगितले आहे. एक गमतीची गोष्ट इथे मुद्दाम नोंदवली पाहिजे. आपल्या निवडणूक प्रचारसभांमध्ये मोदी यांनी कधीही इंदिरा गांधी यांचे नाव घेतलेले नाही. नेहरू, राजीव आणि इतरांवर मात्र ते सातत्याने कडवे हल्ले चढवत आले आहेत.

पोलिस चकमकीची कहाणीउत्तर प्रदेशमध्ये पोलिस चकमकीत ठार झालेल्यांच्या संख्येने एक नवा विक्रम प्रस्थापित केल्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रकाशझोतात आले आहेत. मार्च २०१७ मध्ये ते सत्तेवर आल्यानंतर राज्यात १०,९०० हून अधिक पोलिस चकमकी झडल्या. २३,३०० संशयित गुन्हेगारांना अटक झाली. ५०४६ जखमी झाले आणि १८५ मारले गेले. योगी अजूनही स्वस्थ बसलेले नाहीत. किंबहुना त्यांनी विधानसभेत गर्जना केली, ‘माफियांना आम्ही धूळ चारणारच’ परंतु अतीक अहमद आणि त्याच्या भावाला इस्पितळाच्या आवारात टीव्ही वाहिन्यांचे कॅमेरे रोखलेले असताना गोळ्या घालून ठार करण्यात आले; यावरून येणारा काळ किती कठीण आहे याची झलक पाहायला मिळते. भाजप श्रेष्ठी या घडामोडींकडे बारकाईने लक्ष देत आहेत. या चकमकीवरून कोर्टबाजी होऊ शकते, हे लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्रालय मात्र गप्प आहे. माफियांना संपवण्यासाठी या मार्गाने जाणारे योगी हे काही पहिले मुख्यमंत्री नाहीत: १९९० नंतरच्या भारतीय इतिहासात बनावट चकमकींची भरपूर उदाहरणे सापडतात. १९९३ ते २००९ या काळात राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने खोट्या चकमकींची २५६० प्रकरणे नोंदवून घेतली. २००० ते २०१७ या काळात ही संख्या १७८२ इतकी कमी झाली होती. त्यापैकी १२२४ खोट्या चकमकी होत्या. १९९० च्या दशकात  गुन्हेगारी जगताचे बस्तान उखडून टाकण्यासाठी मुंबई पोलिसांनी चकमकींचा धडाका लावला होता. थोड्याच अवधीत हे लोण पंजाबसह इतर राज्यांत पोहोचले. ९० च्या दशकात पंजाबमधील दहशतवाद मोडून काढण्यासाठी सुपरकॉप केपीएस गिल यांनीही याच मार्गाचा अवलंब केला.त्यावेळी मुंबईचे वरिष्ठ पोलिस अधिकारी जे. एफ. रिबेरो यांना पंजाबात मुद्दाम पाठवण्यात आले. त्यांनी ‘बंदुकीच्या गोळीला उत्तर गोळीनेच’ देण्याचे धोरण अवलंबिले. त्यानंतर गिल यांनी ऑपरेशन ब्लॅक थंडर यशस्वी केले. राजस्थान , आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, दिल्ली, उत्तराखंड, आसाम आणि पश्चिम बंगाल सर्वच राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अशा चकमकी झाल्या, असे मानवी हक्क आयोगाच्या अहवालात म्हटले आहे. खुर्शीद विजनवासातून बाहेर? मागच्या लोकसभा निवडणुकीत सलमान खुर्शीद पराभूत झाले आणि राजकीय विजनवासातच गेले.  अचानक एका भल्या सकाळी ते काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत बसलेले दिसले. राहुल गांधी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि इतर काही नेतेही उपस्थित होते. विरोधी पक्षांमध्ये ऐक्य घडवण्यासाठी नितीशकुमार आणि काँग्रेस पक्षातील ती पहिली औपचारिक बैठक होती; परंतु या बैठकीला खुर्शीद यांना का बोलावण्यात आले? - असे म्हणतात की खरगे यांनी खुर्शीद यांना बैठकीला बोलावले. एके काळी खुर्शीद आणि नितीश कुमार यांच्यात सलोख्याचे संबंध असल्याचे समजते. कदाचित खरगे यांना त्याचा उपयोग बिहारच्या संदर्भात करून घ्यावयाचा असेल. गमतीची गोष्ट म्हणजे नितीशकुमार यांनीही उपस्थित नेत्यांना सांगितले की, २०१७ मध्ये सोनिया गांधींची भेट झाल्यानंतर जवळपास महिनाभर राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस आपल्याबरोबर काम करण्याची तयारी दाखवील याची वाट आपण पाहिली; परंतु कोणताही प्रतिसाद न आल्याने पुन्हा भाजपच्या गोटात जाण्यावाचून  गत्यंतर उरले नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndira Gandhiइंदिरा गांधीIndiaभारत