शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: चिनी जुळ्या पांडांना निरोप देताना जपान भावूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 11:10 IST

जपानमधील पांडाप्रेमींसाठी गेले काही दिवस अतिशय भावनाप्रधान ठरले.. टोक्योच्या उएनो प्राणिसंग्रहालयात असलेले शेवटचे दोन जुळे पांडा शाओ शाओ आणि लेई लेई नुकतेच चीनला परत पाठविण्यात आले. कारण या पांडांवर चीनचा मालकी हक्क आहे. जपानच्या प्राणिसंग्रहालयात त्यांना शेवटचं सार्वजनिक दर्शन देण्यात आलं. पांडाच्या या जोडीला अखेरचं पाहण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती. प्रचंड गर्दी झाल्यानं प्राणिसंग्रहालयानं तिथे भेट देणाऱ्या प्रत्येकाला फक्त एक मिनिटाचा वेळ दिला होता!

जपानमधील पांडाप्रेमींसाठी गेले काही दिवस अतिशय भावनाप्रधान ठरले.. टोक्योच्या उएनो प्राणिसंग्रहालयात असलेले शेवटचे दोन जुळे पांडा शाओ शाओ आणि लेई लेई नुकतेच चीनला परत पाठविण्यात आले. कारण या पांडांवर चीनचा मालकी हक्क आहे. जपानच्या प्राणिसंग्रहालयात त्यांना शेवटचं सार्वजनिक दर्शन देण्यात आलं. पांडाच्या या जोडीला अखेरचं पाहण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती. प्रचंड गर्दी झाल्यानं प्राणिसंग्रहालयानं तिथे भेट देणाऱ्या प्रत्येकाला फक्त एक मिनिटाचा वेळ दिला होता!

तरीही लोक पांडा-थीमची खेळणी घेऊन तिथे आले होते, त्यांच्या नावानं ते हाका मारत होते आणि मोबाईलवर फोटो-व्हिडीओ काढत होते. अनेक लोकांना तिकीट मिळालं नव्हतं, तरीही ते प्राणिसंग्रहालयात आले होते. कारण फक्त एकच.. हे पांडा आपल्याला आता पुन्हा पाहायला मिळणार नाहीत आणि त्यांच्या या निरोपाचे साक्षीदार व्हायचं म्हणून.. हे पांडा गेल्यानंतर जवळपास ५०वर्षांत पहिल्यांदाच जपान पांडाविना राहणार आहे. त्यांच्या निरोपामागे जपान आणि चीनमधील बिघडलेले संबंध कारणीभूत मानले जात आहेत.

अलीकडच्या महिन्यांत टोक्यो आणि बीजिंगमधील संबंधांमध्ये तणाव वाढलाय. ‘तैवानवर चीननं काही कारवाई केल्यास जपान हस्तक्षेप करू शकतो’, असं वक्तव्य जपानचे पंतप्रधान साने ताकाइची यांनी नुकतंच केलं होतं. यांच्या त्या वक्तव्यामुळे चीन जपानवर नाराज आहे. 

टोक्यो महानगर प्रशासनानं नवीन पांडा पाठविण्याची विनंती करूनही चीननं स्पष्ट केलं होतं की, सध्या उएनो प्राणिसंग्रहालयात पांडा पाठविण्याची कोणतीही योजना नाही. चीनच्या सरकारी वृत्तपत्र ‘बीजिंग डेली’मध्ये एका तज्ज्ञाच्या हवाल्यानं म्हटलं आहे की, तणाव कायम राहिला तर भविष्यात जपानमध्ये पांडा दिसणारच नाहीत! शाओ शाओ आणि लेई लेईचा जन्म २०२१ मध्ये उएनो प्राणिसंग्रहालयात झाला आहे. चीन इतर देशांना पांडा भाड्यानं देतो, पण त्यांचा मालकी हक्क स्वतःकडेच ठेवतो, परदेशात जन्मलेल्या पिल्लांवरही त्यांचाच हक्क असतो.

चीननं १९७२ मध्ये पहिल्यांदा जपानला पांडा पाठवले होते. दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध सामान्य करण्यासाठीचं ते प्रतीक होतं. हे पांडा लवकरच जपानमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले. पांडा दीर्घकाळापासून चीनच्या कूटनीतीचा भाग राहिले आहेत. १९७०च्या दशकात चीननं अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन आणि जर्मनीसारख्या देशांनाही पांडा भेट म्हणून दिले होते. १९८०नंतर चीननं गिफ्टऐवजी ‘लीज प्रणाली’ सुरू केली. जंगलात राहणारे जायंट पांडा चीनबाहेर जगातील कुठल्याही देशात सापडत नाहीत. पांडा दिवसाला १० ते १४ किलोपर्यंत बांबू खातात. त्यामुळे जिथं वर्षभर बांबू उपलब्ध असतो, तिथंच पांडा राहू शकतात.

पांडा जपानसाठी फक्त भावनिक प्रश्न नाही, त्यांच्यासाठी ती आर्थिक संपत्तीही आहे. उएनो प्राणिसंग्रहालयात पांडा नसतील तर जपानला दरवर्षी किमान ८,५०० कोटी रुपयांचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, कॅफे आणि स्मरणिका दुकानांनाही याची झळ पोहोचेल. ही परिस्थिती कायम राहिली, तर एकूण नुकसान २० ते ५० हजार कोटींपर्यंत जाऊ शकतं.

English
हिंदी सारांश
Web Title : Japan bids emotional farewell to Chinese twin pandas; ties strained.

Web Summary : Japan mourns as twin pandas, property of China, return home amid strained relations. Public farewell draws huge crowds. Japan faces economic loss and panda-less future.
टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJapanजपानchinaचीन