शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राज की उद्धव? शरद पवारांनी त्यावेळीच दिलं होतं उत्तर; व्हिडीओ पुन्हा होतोय व्हायरल
2
डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, मोठा खुलासा
3
काँग्रेसची राजकीय ताकद राहिली नाही, त्यासाठी काय करणार ? हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलं उत्तर
4
तोंड दाखवायला जागा...! मुलीच्या सासऱ्याबरोबरच मुलीची आई पळून गेली; मुलगा म्हणतो... 
5
अपघातात मृत्यू झालेल्या महिलेसोबत वॉर्ड बॉयचं संतापजनक कृत्य, संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद
6
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; हॉस्पिटलमधील महिला प्रशासन अधिकाऱ्यास केली अटक
7
"मुळावरच घाव घालायचं काम चालू आहे", महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरुन मराठी अभिनेता स्पष्टच बोलला
8
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
9
तनिषा भिसे प्रकरण: पोलिसांच्या दबावापुढे ससून प्रशासन झुकले; पोलिसांनी 'या' ४ मुद्द्यांवर मागितला होता, 'अभिप्राय'
10
पुस्तकाच्या जन्माची गोष्ट : ‘ग्रेस’ यांचे पहिले पुस्तक असे आले
11
‘एआय’ ऐक ना रे माझं, तूच मला समजू शकतोस... खरंच एआय समजून घेतं का?
12
लेख : चिंब पावसानं रान औंदा होणार आबादानी!
13
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
14
अवघ्या ०.०१३ रनरेटमुळे वेस्टइंडीजचा संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून बाहेर
15
स्क्रीनच्या पलीकडची सुट्टी; पालक म्हणून मुलांसाठी तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी करू शकता
16
इलॉन मस्क यांच्या आईने जिंकली भारतीयांचे मने; पंतप्रधान मोदींच्या ट्विटला दिलं होतं उत्तर
17
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
18
लेख: वेळप्रसंगी आम्ही ‘भ’ची बाराखडी जाहीरपणे म्हणून दाखवतो...
19
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,

दुबईच्या वाळवंटात महापूर कसा आला?; १९४९ नंतर पडलेला हा सर्वाधिक पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 06:09 IST

वाळवंटात मुसळधार पाऊस पडतो तेव्हा काय होते, याचा प्रत्यय नुकताच दुबईत आला. वाळवंटी प्रदेशात अचानक महापूर उद्भवण्याचे कारण काय?

भवताल रिसर्च टीम

दुबईमध्ये नुकताच, १५ एप्रिल रोजी तब्बल १४२ मिलिमीटर इतका पाऊस कोसळला. त्या ठिकाणची पावसाची आकडेवारी असे सांगते की, तिथे वर्षाला सरासरी सुमारे ९५ मिलिमीटर इतका पाऊस पडतो. याचाच अर्थ दीड वर्षांत सरासरी जितका पाऊस होतो, तितका पाऊस तिथे काही तासांमध्ये पडला. ‘यूएई’ची सरकारी वृत्तसंस्था WAM ने या पावसाला ऐतिहासिक घटना म्हटले आहे. तिथे १९४९ नंतर पडलेला हा सर्वाधिक पाऊस असल्याचे म्हटले आहे. दुबईप्रमाणेच यूएईच्या अनेक प्रदेशात आणि मध्य-पूर्वेत त्या काळात अतिवृष्टीने हजेरी लावली.वाळवंटी प्रदेशात इतका पाऊस पडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र, या प्रदेशात पाऊस का पडतो हे समजून घ्यावे लागेल.

भारत, भारतीय उपखंड आणि आसपासच्या प्रदेशात पाऊस पडण्यासाठी उष्ण कटिबंधीय प्रदेशात निर्माण होणाऱ्या हवामानाच्या प्रणाली (weather systems) कारणीभूत असतात. त्याचप्रमाणे दुबई व आखाती प्रदेशाच्या भौगोलिक ठिकाणाचा विचार करता, तेथे मध्य कटिबंधीय प्रदेशातील हवामानाच्या प्रणाली तयार झाल्या तर पाऊस पडण्याची शक्यता असते. कृत्रिम पाऊस अर्थात क्लाउड सीडिंग हे या पावसामागचे कारण असल्याची बरीच चर्चा झाली, पण असे प्रयोग करण्यासाठी मुळात हवेत बाष्प असावे लागते. त्याशिवाय कृत्रिम पाऊस पाडताच येत नाही. हे बाष्प मध्य कटिबंधीय प्रदेशातील हवामानाच्या प्रणालीमुळे निर्माण झाले. त्यामुळे या घटनेचा संबंध कृत्रिम पावसाशी जोडणे अतिशयोक्तीचे आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

महापूर येण्याची कारणेया घटनेच्या निमित्ताने वाळवंटात पूर येण्याची कारणे समजून घेणे सयुक्तिक ठरेल. वाळवंटात पडणारा पाऊस अनेकदा हंगामी हवामान बदल किंवा इतर हवामान प्रणालींमुळेदेखील उद्भवू शकतो. परंतु, वाळवंटात कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस पडून पूर परिस्थिती उद्भवते.

१. जमिनीखालील ‘जिप्सम’चा थर येथे उष्ण आणि कोरड्या परिस्थितीमुळे पाण्याचे बाष्पीभवन जास्त होते. परिणामी जमिनीच्या खाली काही अंतरावर जिप्समचा (कॅल्शियम सल्फेट) कडक थर  तयार होतो. त्यामुळे पृष्ठभागावरील पाणी त्वरित जमिनीत मुरत नाही. ते साठून पृष्ठभागावर वाहते आणि पूर परिस्थिती उद्भवते.

२. नैसर्गिक प्रवाहांच्या देखभालीचा अभाववाळवंटी भागात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे या भागांमधील नैसर्गिक प्रवाह (नद्या, नाले) हंगामी स्वरूपाचे असतात. पाऊस पडेल तेव्हाच नद्या प्रवाही होतात. परिणामी या भागातील पाणी वाहून नेणाऱ्या यंत्रणांची (उदा. नद्या, नाले, पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या) देखभाल दुरुस्ती वेळच्या वेळी होत नाही. किंबहुना त्यांच्यावर अतिक्रमणे होतात. त्यामुळे पूर येण्याचा धोका वाढतो.३. वृक्षावरण कमी असणेवाळवंटात पूर येण्याचे आणखी एक कारण म्हणजे या प्रदेशात वनस्पती आवरण खूपच विरळ असते. परिणामी, वाळवंटात पाण्याचा निचरा होण्याची क्षमता तुलनेने कमी आहे. यामुळे पावसाळी पाणी साठून पृष्ठभागावर वाहते आणि त्याचे रूपांतर पूर परिस्थितीमध्ये होते. याशिवाय वाळवंटी भागात पडणारा पाऊस हा वादळी स्वरूपाचा असतो. तिथे कमी वेळात जास्त पाऊस पडतो. याशिवाय त्याला इतरही काही कारणे जबाबदार असतात.

वाळवंटी प्रदेशात यापूर्वीही महापुराच्या घटना घडल्या आहेत. २०१७ मध्ये जुलै महिन्यात गुजरात, राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थिती निर्माण झाली होती. कच्छचे रण आणि जैसलमेरसारख्या कोरड्या भागावरही या पुराचा परिणाम झाला होता. कच्छमध्ये वार्षिक सरासरीच्या ११९ टक्के पाऊस झाल्याची नोंद झाली होती. 

वाळंवटात पूर येण्याच्या घटना नवीन नाहीत. सौदी अरेबियामध्ये २०१९ मध्ये आलेल्या पुरामध्ये अनेक उंट वाहून गेले होते. तुफान पावसामुळे तेथील नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले, याची सर्वाधिक झळ प्राणिमात्रांना बसली.  २०२३ मध्ये ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाच्या प्रभावाखाली दक्षिण राजस्थानच्या पाच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. राजस्थानमधील अनेक भागांना मुसळधार पावसाने झोडपल्याची नोंद आहे. 

यासंदर्भात हवामानशास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. कृष्णानंद घोसाळीकर म्हणाले, ज्या दिवशी (१५ एप्रिल) दुबईमध्ये अतिवृष्टी झाली, त्या दिवशी या प्रदेशात मोठ्या प्रमाणात बाष्प निर्माण करणारी हवामान प्रणाली निर्माण झाली होती. त्याचा परिणाम म्हणून दुबई व परिसरात अतिवृष्टी झाल्याचे म्हणता येईल. दुबईमध्ये या हवामान व्यवस्थेमुळे पाऊस पडणे अपेक्षित होते. पण तो इतक्या मोठ्या प्रमाणात होणे ही अपवादात्मक घटना आहे.

दुबई हा वाळवंटी प्रदेश असला तरी समुद्रकिनारी प्रदेशसुद्धा आहे. इथे अचानक अशी परिस्थिती उद्भवली आणि प्रचंड महापूर आला. त्यामुळे भारतासह इतर समुद्रकिनारी प्रदेशातसुद्धा भविष्यात असे काही घडू शकेल का, याचा विचार होणे आणि नियोजनात त्याची दखल घेणे आवश्यक आहे.

bhavatal@gmail.com

 

टॅग्स :DubaiदुबईRainपाऊसfloodपूर