शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

मी काय घोडं मारलंय? - इच्छा माझी पुरी करा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 09:12 IST

टोपी घातलेले काक महाशय फुरंगटून म्हणाले,  ‘कधीतरी माझ्याही इच्छेचा विचार करावा. राजकीय नेत्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात, माझ्या का नाही?’

सचिन जवळकोटे, निवासी संपादक, लोकमत, सोलापूर

इंद्र दरबारात भलता सन्नाटा पसरलेला. काही जण गोंधळलेले तर काही जण दचकलेले. विचारमग्न इंद्र महाराजांनी चुटकी वाजवताच क्षणार्धात नारदमुनी दरबारात हजर झाले. 

एवढं गंभीर वातावरण पाहून तेही दचकले. ‘मुनी.. भूतलावर हे पंधरा दिवस कावळ्यांचे घाटावरच्या मिष्टान्न भोजनावर मनसोक्त ताव मारण्याचे असतात. तरीही एक कावळा म्हणे कशाला स्पर्श करायला तयार नाही. त्याचा नेमका काय प्रॉब्लेम आहे, ते तरी पहा.’ 

इंद्रांनी आदेश देताच मुनी भूतलावर थेट त्या कावळ्यासमोर प्रकटले. त्याच्या डोक्यावर चक्क नेत्याची टोपी होती. नजर एकीकडं असली तरी लक्ष दुसरीकडंच. राजकारणात यशस्वी होण्याचे सारे गुण-दुर्गुण याच्यात उतरलेत, हे मुनींनी अचूक ओळखलं. 

‘काय काक महाशय.. तुमच्या स्पर्शासाठी घाटावर बघा किती माणसं तिष्ठत उभारलीत. करून टाका ना इच्छा पूर्ण त्यांची,’ मुनींनी समजावून सांगण्याचा प्रयत्न करताच ‘मिस्टर क्रो’ जोरात कावकाव करू लागले, ‘कधीतरी माझ्याही इच्छेचा विचार व्हावा. राजकीय नेत्यांच्या साऱ्या इच्छा पूर्ण होतात, तसंच माझंही व्हावं.’

‘असं कुठं असतं का? कुठल्याच नेत्याची इच्छा कधी सफल होत नसते. वाटल्यास भेटू चला या मंडळींना...’  मुनींनी सुचवताच दोघेही निघाले. 

पुण्यात त्यांना चंदूदादा कोथरूडकर दिसले. एका टेलरला ते फडणविसांच्या जाकिटाचे माप समजावून सांगत होते, ‘डाव्या खिशात पन्नास अन् उजव्या खिशात पन्नास दादा मावले पाहिजेत.’

हे ऐकून दचकलेल्या मुनींनी विचारलं, ‘दादा.. तुम्ही पूर्वी मंत्री होता. आता प्रदेशाध्यक्षही आहात. सर्व इच्छा पूर्ण झाल्या असतील ना हो?’

कात्रज घाटातून पुढं सरकत दादा म्हणाले, ‘तेवढं कोल्हापूरला एकदा का होईना निवडून यायचं राहिलंच बघा.’एवढ्यात सातारा-कोल्हापूर रस्त्यावर सोमय्या भेटले. पत्रकार मंडळी जसं पोलीस ठाण्याला कॉल करून विचारतात, ‘आज काय विशेष?’ तसंच सीबीआयवाले यांना विचारत होते, ‘आज काय नवीन पुरावा?’.. मुनींनी विचारलं, ‘काय किरीटभाई.. केम छो?. कोल्हापूरच्या पिकनिकची हौस फिटली का नाही? आता कोणती इच्छा राहिली तुमची?’ 

कोल्हापुरातील कार्यकर्त्यांच्या जमावाकडं बारीक लक्ष ठेवत सोमय्या उत्तरले, ‘निम्म्या लोकांना गायब करणं अन् निम्म्या लोकांना हॉस्पिटलमध्ये पाठवणं.. ही नवी जादू शिकण्याची इच्छा तेवढी राहिलीय.’ मुनींनी ‘मिस्टर क्रो’कडं बघितलं. त्यानंही नकळत मान हलवली. मग ठरलं. दोघांनी थेट हॉस्पिटलमध्ये जाऊन मुश्रीफ यांची भेट घेतली. 

त्यांचा चेहरा खरंच साऱ्या इच्छा संपल्यागत झालेला, तरीही त्यांना हळूच विचारलं, तेव्हा ते पुटपुटले, ‘आयुष्यभर कीर्तनात-दानधर्मात इमेज जपली. आता नको  तो तमाशा मांडून विरोधक करतायत माझी इमेज क्रॅश. तरीही किरीटभाईंना कोल्हापुरात कुठं धक्का लागू नये, हीच माझी इच्छा.’ 

हे ऐकून मुनींचा ऊर भरून आला, ‘व्वाऽऽ काय हा सात्त्विकपणा. काय हा सोज्वळपणा.’ 

मात्र याच वेळी आजूबाजूचे कॅमेरे काकदृष्टीतून सुटले नाहीत. तो नारदांच्या कानात लागला, ‘पण कॅमेऱ्यामागची भाषाही कधीतरी ऐकायला हवी.’ 

मुंबईच्या रस्त्यावर गिते अन् आठवले यांच्यात वाद रंगला  होता. अनेक दशकांपूर्वीचा रक्ताळलेला खंजीर  नेमका कुणी वापरला, यावरून दोघांत पेटलं होतं. दिल्ली फिरून आलेल्या गितेंना बारामतीकरांचं नेतृत्व मान्य नाही, ही त्यांची इच्छा स्पष्टपणे दिसून आली. रामदासांची इच्छा मात्र समजतच नव्हती. शेवटी नेहमीप्रमाणे कवितेतून भावना प्रकट झाली, ‘कमळ मातोश्रीवर फुलावं किंवा बारामतीत झुलावं.. अंतिम इच्छा एकच,  आमचंच सरकार यावं.’ 

आता बारामतीकडं जाणं क्रमप्राप्त. वाटेत मिस्टर क्रोनं सहज विचारलं, ‘अजितदादांची इच्छा काय असावी?’  यावर मुनी गालातल्या गालात हसत हळूच उत्तरले, ‘कुठल्याही पार्टीसोबत गेले तरीही त्यांची सीएमपदाची इच्छा काही पूर्ण होण्याची शक्यता कमीच. पूर्वी ‘हात’वाल्यांबरोबर डीसीएम. फडणवीसांसोबतही डीसीएम.. अन् आता ‘धनुष्य’वाल्यांसोबतही डीसीएमच.’ 

हे ऐकताच चमकलेले काक महाशय पुन्हा आपल्या घाटाकडं उडाले, ‘जिथं भल्याभल्यांची इच्छा पूर्ण होत नाही तिथं मी किस झाड का पंछी?’  मुनी खुदकन हसले. नारायणऽऽ नारायणऽऽ sachin.javalkote@lokmat.com

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण