शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

मनाचिये गुंथी - आनंदी जीवनाचं सूत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:12 IST

जगणं ... जगवणं, घडणं ... घडवणं यावर आयुष्याचा स्तर अवलंबून असतो. स्वत: आयुष्य कशा पद्धतीने जगला, त्यासमवेत अनेकांना कसे उभे केले ... जगवले हे महत्त्वपूर्ण ठरते. दुसºयांना सहकार्य केले का? यावरून माणसाचे गुण ... अवगुण लक्षात येतात. काळ कोणताही असला तरी माणसाचे माणुसकीशी असलेले नाते कायम असावे! हा जणू काही अलिखित नियम आहे. वयाच्या आणि वर्तनाच्या संबंधापेक्षा वृत्तीचा व वर्तनाचा जवळचा संबंध आहे.

- कौमुदी गोडबोलेजगणं ... जगवणं, घडणं ... घडवणं यावर आयुष्याचा स्तर अवलंबून असतो. स्वत: आयुष्य कशा पद्धतीने जगला, त्यासमवेत अनेकांना कसे उभे केले ... जगवले हे महत्त्वपूर्ण ठरते. दुसºयांना सहकार्य केले का? यावरून माणसाचे गुण ... अवगुण लक्षात येतात. काळ कोणताही असला तरी माणसाचे माणुसकीशी असलेले नाते कायम असावे! हा जणू काही अलिखित नियम आहे. वयाच्या आणि वर्तनाच्या संबंधापेक्षा वृत्तीचा व वर्तनाचा जवळचा संबंध आहे.स्वत: आनंदात जीवन जगावे! लोकांनाही आनंदी जीवन जगू द्यावे. जगा आणि जगू द्या हे सूत्र आहे. या सूत्रानुसार जो जगतो आणि अनेकांना प्रोत्साहन देतो तो लोकप्रिय होतो. प्रत्येकाने उत्तम ... उदात्त वर्तन करून आदर्श निर्माण करणं आवश्यक आहे. प्रत्येकाला दुसºयांनी आपल्याशी चांगले वर्तन करावे अशी अपेक्षा असते. आपल्याकडून ती अपेक्षा पूर्ण होते का याचा विचार करणे गरजेचे आहे. आपण कसे घडलो हे समाज न्याहाळत असतो. निराधार, दु:खी लोकांना सर्व प्रकरचा आधार देऊन, प्रेमाने जवळ करून उभं करून चांगलं जीवन जगण्यास प्रवृत्त करणे अगत्याचे आहे. आपण प्रेम दिले की आपल्यावर प्रेमाची पखरण होणार! जसे पेराल तसे उगवते! प्रेम पेरले तर प्रेमाचे अमाप पीक येते.नि:स्पृह, नि:स्वार्थी प्रेमावर अवघे जग उभे राहते! छोट्या छोट्या बिंदूचा मिळून सिंधू होतो. अपेक्षारहित सहकार्याचा हात व त्यामधून साकारते सहकाराची साथ! सुसंस्कारामधून माणूस घडत जातो आणि त्यामध्ये घडविण्याची क्षमता निर्माण होते. संस्कार परिस्थिती... मन:स्थितीनुसार झिरपत जातात. एकदा झिरपले की सुकून जाण्याचे भय उरत नाही. अनेक अंगांनी माणूस घडत असतो. त्याला सुयोग्य आकार देणारा सुरेख हात मिळाला की झाले! दोन हाताचे चार आणि पुढे चारशे झाले की सुसंस्कृत, सालस समाज तयार होतो. त्यागाचा स्वीकार करून सर्वार्थाने आदर्श प्रस्थापित करणाºयांचे जीवन एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरते.माणूस घडणं आणि घडवणे यासाठी अनेक पिढ्या कष्ट सोसतात. अपमान, अवहेलना पचवतात. आपल्या जगण्याला चंदनाच्या खोडाप्रमाणे झिजवतात. तेव्हा पुढील पिढ्यांना सुगंधाचा लाभ होतो. अशा आदर्शाचा सहवास लाभणे याला भाग्य लागते! जो त्यांच्या सहवासात येईल ना त्याच्या आयुष्याचे सोने होते. सुवर्णाची झळाळी अवघ्या समाजमनाला आकर्षित करते. सहवास, संगतीमधून उन्नतीचे ... प्रगतीचे सुंदर कमळ फुलते. यामधून आनंदाचा अलौकिक सुगंध सर्वत्र दरवळतो. प्रेम, त्याग आणि आनंद ही त्रिसूत्री भारतीय संस्कृतीने सकल विश्वाला स्वत: अंगीकार करून प्रदान केलेले मौलिक मोती आहेत. विश्वाच्या अंतापर्यंत हे ‘अमूल्य मोती’ तयार होत राहतील व त्याच्या सुंदर माळा तयार होत जातील यात शंका नाही.