शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

पीळ काही सुटेना...!

By किरण अग्रवाल | Updated: April 26, 2018 08:23 IST

भाजपाकडून शिवसेनेबाबत सावध पावले टाकली गेल्याचे मध्यंतरी दिसून आले असले तरी; या दोघांतील आढ्यतेची दरी रुंदावतच चालल्याचे निदर्शनास येते आहे.

गेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल व त्या पाठोपाठच्या देशातील काही पोटनिवडणुकांमधील पराभवानंतर भाजपाकडून शिवसेनेबाबत सावध पावले टाकली गेल्याचे मध्यंतरी दिसून आले असले तरी; या दोघांतील आढ्यतेची दरी रुंदावतच चालल्याचे निदर्शनास येते आहे. ‘नाणार’ प्रकल्पावरून या दोघांत जी हमरीतुमरी सुरू आहे त्यावरून तर ते दिसून यावेच, शिवाय विधान परिषदेच्या काही जागांसाठी उमेदवार घोषित करतानाही उभयतांनी आपापल्या मनमर्जीचा जो प्रत्यय आणून दिला, त्यातूनही तेच स्पष्ट व्हावे.सत्तेच्या चालू पंचवार्षिक काळात भाजपा व शिवसेनेतील संबंध प्रारंभापासूनच ओढाताणीचे राहिले आहेत. या दोघा पक्षातील ‘युती’ तशी सर्वात जुनी व अखंडित राहिलेली असली तरी यंदा विधानसभा निवडणुकीत दोघांनी स्वबळ आजमावले आणि अखेरीस सत्तेसाठी पुन्हा निवडणुकोत्तर ‘युती’ केली. त्यामुळे त्यांच्यातील सांधा जुळू शकलेला नाही. अर्थात, शिवसेनेचा चिवटपणा असा की, बाहेर रस्त्यावर त्यांच्याकडून भाजपाविरोधी भूमिका प्रदर्षिली जात असली तरी, सत्तेला लाथ मारण्याची त्यांची तयारी नाही. त्यामुळे आता या दोघांतील बेबनावाकडे लुटुपुटुची लढाई म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. अशातही, आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेने ‘एकला चलो रे’चा निर्धार व्यक्त केल्याने शिवसैनिक कामाला लागले आहेत. भाजपाही ‘शत-प्रतिशत’च्या अपेक्षेत आहेच. त्यामुळे दोघांकडून आपापले बळ जोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र देशाचे नेतृत्व करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व सत्ताधारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या अमित शहा यांच्या गृहराज्यातील निवडणुकीत त्यांच्या पक्षाची सत्ता राखताना जी दमछाक झाली ती पाहता, हवेत उंच उडालेले त्यांच्या अपेक्षांचे फुगे काहीसे जमिनीकडे आले. उत्तर प्रदेश व बिहारच्या अलीकडील पोटनिवडणुकांच्या निकालांनी या फुग्यांमधील हवा आणखीनच कमी केली. त्यामुळे उद्धव ठाकरे एकीकडे स्वबळाच्या निर्धाराने तलवार परजत असताना, दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संयम व सामोपचारानेच निभावताना दिसत होते. परंतु कोकणात होऊ घातलेल्या नाणारच्या पेट्रोलियम रिफायनरी प्रकल्पावरून पुन्हा भडका उडून गेला आहे.महत्त्वाचे म्हणजे, गुजरात निवडणुकीमधील दमछाक, पोटनिवडणुकांतील पराभव व विरोधकांनी चालविलेली एकजूट पाहता पुन्हा शिवसेना-भाजपातील ‘युती’चे संकेत मध्यंतरी मिळू लागले होते. त्यामुळेच नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात शिवसेनेकडून उमेदवारी अपेक्षित असलेले इच्छुक शिवाजी सहाणे मुंबई मुक्कामी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून आले होते. पुढे त्यांची शिवसेनेतून गच्छंती झाली हा भाग वेगळा; परंतु उभय पक्षाच्या कार्यकर्त्यांत ‘युती’ची आशा बळावून गेली असताना पुन्हा फटाके फुटू व वाजू लागले आहेत. यातच विधान परिषदेच्या काही जागांची निवडणूक लागली असून, त्यात नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी शिवसेनेने नरेंद्र दराडे यांची एकतर्फी उमेदवारी घोषित केली, तर त्यापाठोपाठ दुसºयाच दिवशी शिक्षक मतदारसंघासाठी भाजपाने मुंबईमधून अनिलकुमार देशमुख व नाशिक विभागातून अनिकेत विजय पाटील यांची उमेदवारी घोषित केली. त्यामुळे संभाव्य ‘युती’च्या अपेक्षांवर आपसूकच पाणी फिरून जाणे स्वाभाविक ठरले.भाजपा व शिवसेनेतील संबंध असे वा इतके ताणले गेले आहेत की, त्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या मोजक्या जागांसाठी लागलीच ‘युती’ने सामोरे जाणे त्यांना कदाचित बरोबर वाटले नसावे, परंतु यानिमित्ताने केल्या जाणाºया प्रचारातून आणखी वितुष्टाच्या काठिण्याची पातळी गाठल्यावर व मतविभागणीचा फटका सहन करावा लागल्यावर विधानसभा निवडणुकीसाठी जर ‘युती’चीच अपरिहार्यता ओढवली तर ती मतदारांना कितपत स्वीकारार्ह ठरेल हा यासंदर्भातील खरा प्रश्न आहे. पण तसला विचार न करता भाजपा-शिवसेनेची पावले पडत आहेत, जणू ‘युती’ होणे नाही. गेल्या खेपेप्रमाणे स्वबळ सिद्ध न झाल्यास निवडणुकोत्तर ‘युती’चा मार्ग खुला ठेवून लढण्याचेच त्यांनी ठरविलेले त्यातून दिसून यावे. शिवाय त्यांना आपल्या आत्मविश्वासाचीच परीक्षाही यातून घ्यायची असावी. या दोहोंचा सांधा जुळेना व पीळ काही सुटेना, अशी जी स्थिती आज दृष्टिपथास पडते आहे ती त्यामुळेच.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा