शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

डायऱ्यांच्या प्रेमातील जिल्हाधिकारी...

By राजा माने | Updated: April 6, 2018 00:23 IST

अनेक आघाड्यांवर पहिल्या क्रमांकावर असलेल्या सोलापूरच्या जिल्हाधिकाºयांचे ‘डायºया प्रेम’ अनेकांच्या हेव्याचा विषय...

प्रशासनात अधिका-यांची कार्यपद्धती हा विषय जसा त्या यंत्रणेत गुंतलेल्या प्रत्येक घटकाशी निगडित असतो तसाच तो जनतेच्याही औत्सुक्याचा विषय असतो. त्यातूनच पुढा-यांशी जमणारा किंवा न जमणारा अधिकारी, आपल्या टीममधील सहका-यांना संरक्षण देणारा अधिकारी, लोकाभिमुख अधिकारी तसेच कुठलीही आकडेवारी तोंडपाठ असलेला अधिकारी, अशी अधिका-यांची वर्गवारी तुम्ही-आम्ही नेहमीच करीत असतो. अशाच वेगळ्या वर्गवारीत मोडणारे अधिकारी म्हणून सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.हातात डाय-या, सोबत असलेल्या सुटकेसमध्ये डायºया आणि रंगीबेरंगी विविध डाय-यांमध्ये लिहिण्यासाठी सोबत टोकदार पेन्सिल! या प्रमुख लवाजम्यासह जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचा कारभार गतीने चाललेला असतो. दिवसाची सुरुवात झाल्यापासून समोर येणारा विषय असो वा व्यक्ती असो, ते त्या अनुषंगाने डायरी काढतात आणि पुढील सोपस्कार सुरू होतात. स्वत:च्या सुवाच्च हस्ताक्षरात काळ्या पेन्सिलने केलेल्या नोंदी आणि नव्या नोंदी यांची लीलया रेलचेल करीत त्यांचे काम सुरू असते. कुठलाही माणूस हा सर्व प्रकार पाहून सुरुवातीला अचंबित होणे स्वाभाविक आहे. कारण, आज ‘पेनलेस आणि पेपरलेस’ बरोबरच डिजिटल कारभाराचे वारे जगभर वाहत असताना डायºयांच्या विश्वात का बरे रमावे? असा प्रश्न कुणाच्याही मनात निर्माण होऊ शकतो. पण जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे काम पाहिल्यानंतर ते डिजिटल युगाचे फक्त समर्थकच नाहीत तर कृतिशील भोक्तेही असल्याची प्रचिती येते. प्रत्येक बाबीचे विश्लेषणात्मक संदर्भ आणि काळ यांच्या डायरीतील नोंदीमुळे त्यांचे काम गतिमान होते व आॅनलाईन प्रशासन व्यवस्थेला पूरक असे सकस खाद्यच या डायºया पुरवितात.या कार्यपद्धतीचा सोलापूर जिल्ह्याला फायदाच झाल्याचे दिसून येते. ग्रामपंचायत निवडणूकसंदर्भातील वाद असोत अथवा भूसंपादनाची प्रकरणे, त्याची तड गतीने लागल्याचा अनुभव जिल्हा घेतो आहे.जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या पतपुरवठ्याचा नऊ हजार कोटींहून अधिक रकमेचा वार्षिक आराखडा त्यांच्याच कल्पकतेतून साकार झाला. शेती आणि शेतीवर आधारित उद्योगांसाठी तब्बल ७० टक्के तरतूद असलेला तो आराखडा आहे. मुद्रा योजनेत जिल्हा पहिल्या क्रमांकावर आला. ३६२ कोटींचे उद्दिष्ट असताना जिल्ह्याने ८६६ कोटी रुपयांच्या कर्जाचा पल्ला गाठला, अशी अनेक उदाहरणे देता येतील. आषाढीवारीचे आणि ६५ एकर क्षेत्रातील वारकरी तळाचे नियोजन असो, जलयुक्त शिवाराची कामे तांत्रिक निकषावरच व्हावीत, यासाठी कसोशीने चाललेले प्रयत्न असोत वा सोसायट्यांच्या शर्तभंग प्रकरणांचा निपटारा असो त्यात लोकाभिमुख कामांची झलकच सर्वांना अनुभवायला येते. साखर उद्योग, गारमेंट उद्योग आणि कृषिक्षेत्रात फळबाग उत्पादनात क्रांतिकारी दिशा घेऊ पाहणाºया सोलापूर जिल्ह्याला डॉ. राजेंद्र भोसले यांच्या कार्यक्षम कारभाराबरोबरच त्यांच्या डायºया प्रेमाचा हेवा वाटल्यास आश्चर्य नको!

टॅग्स :Solapurसोलापूरcollectorतहसीलदार