शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

पुन्हा एकदा सामाजिक अभियांत्रिकी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 02:37 IST

विजयादशमीच्या दुस-या दिवशी अकोल्यात साजरा होणारा समांतर धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा म्हणजे आंबेडकरी जनतेसाठी विचारांचे सोने लुटायची सुवर्णसंधीच असते.

- रवी टालेविजयादशमीच्या दुस-या दिवशी अकोल्यात साजरा होणारा समांतर धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा म्हणजे आंबेडकरी जनतेसाठी विचारांचे सोने लुटायची सुवर्णसंधीच असते. नागपुरात विजयादशमीच्या दिवशी दीक्षाभूमीवर पार पडणारा सोहळा आटोपला, की आंबेडकरी जनतेचे पाय वळतात ते अकोल्याच्या दिशेने! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि भारिप-बहुजन महासंघाचे संस्थापक अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचे विचार ऐकायला त्यांचे कान आतूर झालेले असतात. आंबेडकरही त्यांना कधी निराश करीत नाहीत. आपल्या अनुयायांमध्ये नवी उमेद जागविण्याचे, प्रेरणा देण्याचे, विचारांचे पंख देण्याचे काम ते चोख पार पाडतात. ती शिदोरी अनुयायांना वर्षभर पुरते.गत काही वर्षात, भारिप-बहुजन महासंघाच्या अकोल्यातील सामाजिक अभियांत्रिकीच्या प्रयोगास थोडे अपयशाचे डाग लागले. स्वत: आंबेडकरांना १९९९ नंतर सलग तीनदा अकोला लोकसभा मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला आहे. अकोला जिल्हा परिषद त्यांच्याच ताब्यात असली तरी, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत, त्यांच्या पक्षाचा एकच आमदार निवडून येऊ शकला. आता पुन्हा एकदा लोकसभा व विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आंबेडकर यावेळी अनुयायांना कोणती दिशा देतात, कोणती राजकीय भूमिका घेतात, याकडे केवळ त्यांच्या अनुयायांचेच नव्हे, तर राजकीय विरोधक व प्रसारमाध्यमांचेही लक्ष होते.आंबेडकरांनी त्यांच्या भाषणात निवडणुकांबाबत थेट भाष्य केले नाही; परंतु पुरेसे संकेत मात्र दिले. नरेंद्र मोदी सरकार हे हिंदूंचे नव्हे, तर मनुवाद्यांचे सरकार असल्याचे त्यांचे वक्तव्य, सामाजिक अभियांत्रिकीच्या प्रयोगास पुढे नेण्याचेच सूतोवाच म्हणता येईल. हक्काच्या नवबौद्ध मतांना अठरापगड जातींच्या मतांची जोड देऊन, प्रस्थापितांना धोबीपछाड देण्याच्या आंबेडकरांच्या प्रयोगास १९८४ नंतर अकोल्यात चांगले यश लाभले. पुढे राम जन्मभूमी आंदोलनाच्या पाठीवर स्वार होऊन भारतीय जनता पक्षाने हिंदुत्वाचे राजकारण सुरू केले आणि बहुजन समाज भाजपाकडे वळत गेला. गत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तर हिंदुत्वाला विकासाच्या मुद्याची जोड देऊन भाजपाने बहुजन मतपेढीसोबतच, अल्प प्रमाणात का होईना दलित मतपेढीवरही डल्ला मारला. भारिप-बहुजन महासंघाची झालेली पिछेहाट हा त्याचाच परिपाक होता. गत काही दिवसांपासून मात्र विकासाच्या मुद्यावर भाजपाकडे वळलेल्या मतदारांचा भ्रमनिरास होऊ लागल्याचे चित्र समोर येत आहे. या मतदारांना पुन्हा आपल्याकडे वळविण्याची हीच योग्य वेळ असल्याचे आंबेडकरांमधील निपुण राजनीतिज्ञाने जाणले आणि तुम्ही ज्याला हिंदुत्ववादी सरकार समजता ते प्रत्यक्षात मनुवादी सरकार असल्याचा संदेश बहुजन समाजाला देण्याचा प्रयत्न केला. ते करताना माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची भलामण करून काँग्रेसलाही संदेश दिला. अकोल्यात आंबेडकर व काँग्रेस एकत्र आल्यास भाजपाचा विजय दुष्कर होतो हा इतिहास आहे; पण सामाजिक अभियांत्रिकीच्या आंबेडकरांच्या प्रयत्नास कितपत यश लाभते, हे कळण्यासाठी आगामी निवडणुकांपर्यंत प्रतीक्षाच करावी लागेल.

ravi.tale@lokmat.com