शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षणातील साप; ‘हनी ट्रॅप’ म्हणजे काय? किती धोकादायक? जाणून घ्या

By विवेक भुसे | Updated: May 14, 2023 11:58 IST

संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात, डीआरडीओच्या पुणे शाखेचा संचालक शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केल्याने संपूर्ण भारतातील संरक्षण दलात एकच खळबळ माजली आहे. देशातील एवढ्या मोठ्या पदावरील शास्त्रज्ञ, संचालक कसा काय ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकला, 6 महिन्यांहून अधिक काळ पाकिस्तानी हेरांच्या संपर्कात असतानाही कोणाच्या कसे लक्षात आले नाही? त्यांनी संरक्षणाच्या दृष्टीने कोणती माहिती पुरविली, त्याचा आपल्या संरक्षण सिद्धतेवर काय परिणाम होऊ शकतो?, अशा अनेक बाबींचा ऊहापोह सध्या सुरू आहे.

विवेक भुसे, उपवृत्तसंपादक -डॉ. प्रदीप कुरुलकर हे ४ जानेवारी १९८७ मध्ये डीआरडीओमध्ये रुजू झाले. डीआरडीओच्या पृथ्वी, आकाश यासारख्या क्षेपणास्त्र विकास, क्षेपणास्त्र प्रक्षेपक, लष्करी अभियांत्रिकी उपकरणे, प्रगत रोबोटिक्स आणि लष्कर अनुप्रयोगांसाठी मोबाईल मानवरहित प्रणालींचे डिझाईन आणि विकास तसेच मिशन शक्तीसारख्या प्रकल्पात त्यांनी कार्य केले आहे. डीआरडीओच्या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या सुरुवातीपासून ते यशस्वी होईपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यात ते सहभागी होते. त्यामुळे या महत्त्वाच्या प्रकल्पातील सर्व बारकावे त्यांना माहिती होते, असे नाही, तर अत्यंत संवेदनशील माहिती त्यांच्याकडे होती. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केले होते, असा अधिकारी  जेव्हा शस्त्रू राष्ट्राच्या जाळ्यात अडकतो, तेव्हा ते प्रकरण आणखी गंभीर बनते.

पाकला संवेदनशील माहिती दिली?पाकिस्तान कायमच भारतीय लष्करातील तसेच त्यांच्याशी संबंधित असलेल्यांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांच्यापेक्षा कुरूलकर हे अतिशय मोठे अधिकारी आणि अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये नेतृत्व केलेले शास्त्रज्ञ असल्याने त्यांच्याकडून अतिशय संवेदनशील आणि गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरविली गेली असू शकते. 

प्रक्षेपकाच्या रचनेपासून विकासापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. त्यामुळे या संबंधिचे डिझाईन, इतर बारीकसारीक माहिती, या प्रक्षेपकांचा टप्पा, अंतर, त्यातील बारकावे, अशी माहिती शत्रू राष्ट्रापर्यंत पोहोचणे मोठे धोकादायक असते.

अनेकदा अशा प्रक्षेपकांविषयी जुजबी माहिती समोर आणली जाते. कुरुलकरसारख्या शास्त्रज्ञांकडून ही माहिती बाहेर गेली तर, त्यातून पाकिस्तान त्यांची यंत्रणा विकसित करू शकते.

आता त्यांनी किती आणि कोणती माहिती हेरांना पुरविली, हे समोर आल्यानंतरच ती किती धोकादायक आहे, हे ठरू शकते. कुरुलकर सहा महिन्यांपासून हेरांच्या संपर्कात असल्याने त्यांच्याकडून बरीच गोपनीय माहिती शत्रू राष्ट्रापर्यंत पोहोचली असल्याची शक्यता आहे. 

कुरुलकर यांनी पुरविलेली माहिती संबंधित यंत्रणांना समजल्यानंतर या फुटलेल्या माहितीचा शत्रू राष्ट्र कसा वापर करू शकते, याचा विचार करून आपल्या संरक्षण सिद्धतेत बदल करावा लागणार आहे.

‘हनी ट्रॅप’ म्हणजे काय? किती धोकादायक? -डॉ. प्रदीप कुरुलकर हे सप्टेंबर २०२२ पासून पाकिस्तानी गुप्तचरांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. स्मार्ट फोन, ई-मेल, व्हॉट्स-ॲपसारख्या इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे ते हेरांच्या संपर्कात होते.

परदेश प्रवासादरम्यान ते हेरांना भेटल्याची माहिती मिळते आहे. एटीएसने केवळ पोलिस कोठडी मिळविण्यासाठी आवश्यक तेवढीच जुजबी माहिती समोर आणली आहे. 

मात्र, प्रत्यक्षात एटीएस आणि रिसर्च ॲण्ड अनॉलिसिस विंग (रॉ) या गुप्तचर संस्थेकडे आणखी भरपूर माहिती असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच याचे गांभीर्य वाढले आहे.

१ - हेरगिरी आणि गोपनीय माहिती मिळविण्यासाठी ‘हनी ट्रॅप’ हा पूर्वापार वापरला जाणारा मार्ग आहे. साधारणत: सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या व्यक्तीशी ओळख निर्माण करून ती घट्ट करण्याचा प्रयत्न यात केला जातो. 

२ - बहुतेकदा यात एखाद्या रूपवान महिलेमार्फत संरक्षण क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी यांना जाळ्यात ओढले जाते. ते त्यांच्या जाळ्यात फसले की त्यांच्याकडून कळत नकळत माहिती काढून घेतली जाते. 

३ - माहिती काढून झाल्यावर आपले खरे रूप उघड करून त्यांना ब्लॅकमेल करून जबरदस्तीने माहिती काढून घेण्याचा प्रयत्न होतो.

४ - आपली बदनामी होऊ नये, म्हणून अनेकदा यात अडकलेले अधिकारी, कर्मचारी माहिती देत राहतात. असे आजवरच्या प्रकरणातून समोर आले आहे.

५ - सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या हनी ट्रॅपचे अनेक प्रकार होत असल्याचे उघड होत आहे. अशा अनेक प्रकरणांत काहीजणांना शिक्षाही झालेल्या आहेत. 

टॅग्स :DRDOडीआरडीओDefenceसंरक्षण विभागCrime Newsगुन्हेगारीPakistanपाकिस्तान