शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
3
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
4
"आधी पैसे दे मग बायको घे", EMI न भरल्याने थेट महिलेला उचलून घेऊन गेले बँकवाले, नवरा म्हणतो...
5
Stock Market Today: ट्रम्प टॅरिफ बॉम्बनंतर शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ५३० अंकांनी आपटला; ऑटो-रियल्टीमध्ये विक्री
6
Viral Video : सलाम तुझ्या जिद्दीला! हात नसतानाही तो करतोय बांधकाम; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
7
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
8
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
9
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
10
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
11
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
12
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
13
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
14
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
15
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
16
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
17
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
18
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
19
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
20
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार

कामं आणि काळजी करणाऱ्या स्मार्ट इमारती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 08:37 IST

या ‘स्मार्ट’ इमारती स्वत:ची काळजी स्वत:च घेतील, घरात हरवलेल्या वस्तू शोधून देतील, तुमच्याकडे कोण जातं-येतं यावरही ‘लक्ष’ ठेवतील !

- अच्युत गोडबोले, ख्यातनाम लेखकसहलेखिका-आसावरी निफाडकर

साधारण १९८०च्या दशकातच ‘स्मार्ट/इंटेलिजंट बिल्डिंग्ज’ची स्वप्नं बघायला सुरूवात झाली होती. गेल्या काही वर्षांपूर्वीपासून हे स्वप्न पूर्ण होईल, अशी अशा निर्माण झाली ती एम्बेडेड सेन्सर्स, इन्फर्मेशन ॲण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी (ICT) आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा अनेक तंत्रज्ञानांच्या जन्मामुळे ! सुरूवातीच्या काळात ‘दोनपेक्षा जास्त तंत्रज्ञानं इंटरनेटच्या मदतीनं एकत्र जोडून सेन्सर्सकडून इंटरनेटमार्फत मिळणाऱ्या डेटाचा वापर करून ती स्वत:ला आपोआप नियंत्रित करतील’ इतकीच या इमारतींकडून अपेक्षा होती. १९८८ साली मात्र ‘पर्यावरणाची काळजी घेणारी तसंच खर्चही कमी करणारी इमारत ‘इंटेलिजंट बिल्डिंग (IB)’ म्हणवली जाईल, असं ‘इंटेलिजंट बिल्डिंग इन्स्टिट्यूट (IBS)’नं जाहीर केलं होतं. त्यानंतर आत्तापर्यंत या व्याख्येत थोडेफार बदल होत गेले असले तरी ‘अशा इमारती टिकाऊ, खर्चाची मर्यादा जपणाऱ्या, ऑटोमेटेड आणि इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या तसंच पर्यावरणप्रेमी असायला हव्यात’ हे वारंवार अधोरेखित होत गेलं.

इमारतींच्या बाबतीत वापरल्या जाणाऱ्या या तंत्रज्ञानाला ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज इन बिल्डिंग (BIoT)’ असं म्हटलं जातं. उद्याच्या इमारतींमध्ये ‘स्मार्ट’ उपकरणांची संख्या कोट्यवधींच्या आणि सेन्सर्सची संख्या अब्जावधींच्या घरात असेल, असं म्हटलं जातं.या इमारती ‘फंक्शनॅलिटी चेक्स’ ठेवण्याचं काम करतील; म्हणजेच इमारतीमधल्या विविध उपकरणांमध्ये बसवलेले सेन्सर्स नीट काम करताहेत की नाही ते बघणं; पाण्याचे पंप्स/लिफ्ट्स/गॅस पाइपलाइन्स अशा गोष्टींकडे लक्ष ठेवणं अशा गोष्टी करतीलच; याशिवाय दुरुस्त्या करणं वगैरे कामात मदतही करतील. उदा.  कुठे गळत असेल किंवा इमारतीमधला एखादा भाग दुरुस्ती करण्यायोग्य झाला असेल, तर त्याबद्दल इमारतीकडून व्यवस्थापनाकडे सूचना दिली जाईल किंवा काही विशिष्ट बाबतीत त्या इमारती स्वत:च तो भाग दुरुस्तही करतील. त्यासाठी प्रत्येक इमारतीत त्यातल्या प्रत्येक भागाची ‘डिजिटल ट्विन्स’ म्हणजेच त्याची डिजिटल मॉडेल्स असतील.

बिघाडाचा शोध घेताना आणि त्या दुरुस्त्या करताना डिजिटल ट्विन्सची बरीच मदत होऊ शकेल. बिल्डिंगच्या कार पार्किंग लॉटमध्ये किती गाड्यांसाठी जागा शिल्लक राहिली आहे, हे तपासून त्या लॉटमध्ये येणाऱ्या गाड्यांना तशा वेळीच सूचना देणं वगैरे कामंही या इमारती करतील.

२०१५-१६ साली ॲम्स्टरडॅममध्ये ‘दि एज’ नावाची इमारत ‘स्मार्ट’ म्हणून प्रसिद्ध झाली होती. जगातली पहिली ‘स्मार्ट आणि सस्टेनेबल’ बिल्डिंग म्हणून तिची नोंद आहे. या इमारतीत अनेक अत्याधुनिक उपकरणं आहेत, तरीही या इमारतीतून उत्पन्न होणाऱ्या कार्बन फूटप्रिंट्सचं प्रमाण अत्यल्प-खरंतर जवळपास शून्य टक्केच आहे. ही संपूर्ण इमारत एका कन्सल्टिंग फर्मची आहे. तिथल्या कर्मचाऱ्यांकडे दिलेल्या एका मोबाईल ॲपला कर्मचाऱ्यांना कॉफीत किती प्रमाणात साखर लागते इथंपासून ते त्यांना कितपत प्रखर प्रकाशात काम करायला आवडतं, त्यांचा दिवसभराचा दिनक्रम काय आहे, हे सगळं माहीत असतं. त्यानुसार तापमान आणि प्रकाश योजना नियंत्रित करणं, पार्किंग लॉटपर्यंत कर्मचाऱ्याच्या कारला दिशा दाखवणं अशा बऱ्याच गोष्टी या इमारतीमध्ये होतात. विशेष म्हणजे या इमारतीची रचना करताना या संपूर्ण इमारतीत नैसर्गिक प्रकाश आणि हवा कशी खेळती राहील, याची काळजी घेतली गेली आहे.सिंगापूरमधली बॉश (Bosch) कंपनीची इमारतही ‘स्मार्ट बिल्डिंग’ आहे. या इमारतीत सगळीकडे सेन्सर्स बसविलेले आहेत. सूर्यप्रकाशाच्या प्रखर उजेडानुसार ऑफिसमधले दिवे किती प्रमाणात प्रखर किंवा मंद करायचे, हे ते सेन्सर्स ठरवतात. संध्याकाळी आणि वीकेंड्सना ऑफिसमध्ये किती कर्मचारी आहेत, याचा अंदाज घेऊन किती दिवे चालू ठेवायचे, याचा निर्णयही ऑफिसमधले सेन्सर्स घेतात. त्यामुळे या कंपनीत काम करणाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जातेच; शिवाय कामाचा दर्जाही सुधारतो. ऑफिसमधल्या वस्तू गहाळ होणं ही जवळपास नित्याचीच बाब असते. बॉश कंपनीत ट्रॅकिंग तंत्रज्ञानांच्या मदतीनं वस्तू ट्रॅक करता येतात. तिथल्या लिफ्ट्सही स्मार्ट आहेत. दररोज कोणत्या वेळी लिफ्ट जास्त व्यस्त असते, लिफ्टची परिस्थिती काय आहे, वगैरे अनेक गोष्टी सेन्सर्स सतत तपासत असतात. इतकंच नाही, तर त्यांची देखभाल करण्याची वेळ जवळ आली असेल तर ती किती काळात करायला हवी, याच्याही सूचना व्यवस्थापनाला वेळोवेळी दिल्या जातात. 

ऑफिसमधला वावर ट्रॅक करणं, ऑफिसमध्ये कुठल्या (कार, माणसं, लॅपटॉप्स...) आणि किती वस्तू येताहेत, या सगळ्याची नोंद ठेवणं, कार पार्किंगला मदत करणं (जागा शोधणं), एखादी कार ‘नो पार्किंग’ झोनमध्ये जास्त काळ उभी असेल तर सुरक्षा कर्मचाऱ्यांना तशी सूचना देणं, इमर्जन्सीच्या वेळी इमारतीतल्या लोकांना सुरक्षित बाहेर पडण्यासाठी मदत करणं अशा अनेक गोष्टी ही ‘स्मार्ट बिल्डिंग’ करते. या सगळ्यासाठी कर्मचाऱ्यांकडे फक्त एक मोबाईल ॲप आवश्यक असतं. त्याच्या मदतीनं ते इमारतीतल्या कुठल्याही जागेची माहिती सहजपणे मिळवू शकतात. उदा. समजा ऑफिसचं कॅन्टीन पहिल्या मजल्यावर असेल आणि १० व्या मजल्यावरच्या एखाद्या कर्मचाऱ्याला कॅन्टीनमध्ये जायचं असेल, तर त्या कॅन्टीनमध्ये आता किती गर्दी आहे, आज तिथे कोणकोणते पदार्थ आहेत, हे तो बसल्या जागेवरून मोबाईल ॲपच्या मदतीनं बघू शकतो.                                         (क्रमशः)godbole.nifadkar@gmail.com