शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सुखनिद्रा : तरुण मुलींच्या झोपेची रहस्यं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:43 IST

Sleep: लहानपणी मुलांच्या आणि मुलींच्या झोपेत फारसा फरक नसतो परंतु पाळी येण्याच्या आसपासच्या वेळापासून मुली आणि मुलांच्या झोपेत फरक पडू लागतो.

यशस्वी जीवनासाठी सम्यक आहार, सम्यक विहार आणि सम्यक निद्रा यांची गरज असते. यात आहार आणि विहार यांच्याबद्दल आजकालच्या तरुण मुलींमध्ये सजगता  आहे. परंतु स्वत:च्या झोपेबाबत मात्र नाही.  पौगंडावस्थेत पदार्पण करणाऱ्या तरुण मुलींच्या झोपेबाबत आज जाणून घेऊया.

लहानपणी मुलांच्या आणि मुलींच्या झोपेत फारसा फरक नसतो परंतु पाळी येण्याच्या आसपासच्या वेळापासून मुली आणि मुलांच्या झोपेत फरक पडू लागतो. झोपेचे प्रमाण कमी होणे, झोपेमध्ये सारखे व्यत्यय येणे, झोप जास्त सावध होणे आणि दिवसा झोप येणे असे प्रकार तरुण मुलींमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात. निद्रानाशाचे (इनसोम्नीया) प्रमाण मुलींमध्ये अधिक  दिसते.

पौगंडावस्थेत येत असताना  शरीरात विशेषत: संप्ररेकातील (हार्मोन्स) बदल हे यामागचे मुख्य कारण! यातील ल्यूटीनाइझिंग हार्मोन आणि मेलाटोनीन ही दोन संप्रेरके रात्री उशिरा स्त्रवली जातात. यामुळे झोप यायला उशीर होऊ शकतो. यामुळेच जाग यायला उशीर होऊ लागतो. काही कारणामुळे लवकर उठायलाच लागत असेल तर त्याचा परिणाम म्हणजे सततचा थकवा.

जितक्या लहान वयात मासिक पाळी सुरु होते तितक्या प्रमाणात दिवसा थकवा येणे, जांभया येणे हे जास्त आढळते. “डिप्रेशन” चे प्रमाण तरुण मुलींमध्ये जास्त असते. बोस्टन विद्यापीठात एक अभ्यास करण्यात आला. झोप आणि वाटणारा ताण (परसिव्हड स्ट्रेस) यांचा संबंध विशेषत: अभ्यासला गेला. त्यात  आढळलेल्या काही महत्वाच्या बाबी :

१) बऱ्याचशा तरुणी किमान वेळेपेक्षा (८ तास) सरासरी दोन तास कमीच झोपत होत्या.  शैक्षणिक वर्ष सरत गेले, तसतशी झोप कमी होत गेली. २) ऑक्टोबर आणि मार्च या महिन्यात ताण सर्वात जास्त होता, तर झोप कमी होती. ३) जशी झोप जास्त झाली तसा ताण कमी वाटला.  ४) मानसिक ताणाचा परिणाम जास्त काळ टिकणारा दिसला.

कमी झोप आणि मानसिक ताणाची वाढ याचे दुष्टचक्र असते. वयात येताना आणखी एक घटना होत असते. ती म्हणजे मुलांच्या झोपेचे घड्याळ आणि सर्वसामान्य समाजाच्या घड्याळात तफावत येऊ लागते. हे झोपेचे घड्याळ म्हणजे काय? त्याबद्दल पुढच्या लेखात.

- डॉ. अभिजित देशपांडे, (इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्लीप सायन्सेस)iissreports@gmail.com

टॅग्स :Healthआरोग्य