शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना सहा हजार; हा तर चुनावी जुमला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2019 01:25 IST

पाच राज्यांतील निवडणुकीत लोकांनी भाजपला जमिनीवर आपटल्याने मोदी सरकारला आता शेतक-यांची आठवण झाली आहे. गेल्या निवडणुकीच्या आधी त्यांनी इतरांना दाखविली तशी शेतकºयांनाही मोठमोठी स्वप्ने दाखविली.

- राजू शेट्टी(स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते)पाच राज्यांतील निवडणुकीत लोकांनी भाजपला जमिनीवर आपटल्याने मोदी सरकारला आता शेतक-यांची आठवण झाली आहे. गेल्या निवडणुकीच्या आधी त्यांनी इतरांना दाखविली तशी शेतक-यांनाही मोठमोठी स्वप्ने दाखविली. आम्हीही त्याला भुललो; परंतु अनेक चांगल्या गोष्टी करता येणे शक्य असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेती व शेतकºयांसाठी काही केले नाही.आता हा वर्ग खवळला आहे व तो येत्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला गाडल्याशिवाय राहणार नाही, असे वाटल्यानेच केंद्र सरकारने शेतकºयाला सहा हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु हा निर्णयही चुनावी जुमला आहे. गेल्या निवडणुकीत प्रचारादरम्यान प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख रुपये देतो, असे आश्वासन याच सरकारने दिले होते व नंतर त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांनी व ज्येष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी ‘तो एक चुनावी जुमला होता,’ असे जाहीर केले. त्यामुळे या सहा हजारांचाही ‘चुनावी जुमला’च होणार अशी भीती वाटत आहे. हा अर्थसंकल्प मतदारांना लालूच दाखविणारा व भाजपला मतदान करणाºया मध्यमवर्गीय जनतेचे हित साधणारा आहे.शेतमालाच्या दरावरच नियंत्रण का?सरकारने अर्थसंकल्प मांडताना महागाई नियंत्रणात आणली म्हणून स्वत:ची पाठ थोपटून घेतली; परंतु त्यांनी महागाई नियंत्रणात आणताना इंधनाचे दर, साबण-सोडा, कपडालत्ता यांचे दर नियंत्रणात आणले नाहीत; तर आणले ते फक्त शेतमालाचे दर. गेल्या निवडणुकीत याच मोदी सरकारने आम्ही शेतकºयांना दीडपट हमीभाव देतो, असे गाजर दाखविले व नंतर न्यायालयात तसे देता येणार नाही, असे लिहून दिले. साखर, वस्त्रोद्योग व प्रक्रिया यांबद्दल या अर्थसंकल्पात एक रुपयाचीही तरतूद नाही. दीडपट हमीभाव द्यायचा राहू दे, जो हमीभाव सरकारनेच निश्चित केला आहे, तोदेखील शेतकºयांना मिळालेला नाही. शेतकºयांच्या आत्महत्या सुरूच आहेत व त्याबद्दल या पंतप्रधानांना काहीच वाटत नाही.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टी