शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

शूर्पणखेचे बंड...

By राजा माने | Updated: December 11, 2017 00:57 IST

आज वेगळ्याच विषयामुळे इंद्रदरबार तापला होता. मराठी भूमीतील स्टार रिपोर्टर यमके (म्हणजे आपला एम.के. अर्थात मनकवडे हो!) यालाही दरबारात हजर करण्याचे फर्मान इंद्रदेवांनी जारी केले होते.

आज वेगळ्याच विषयामुळे इंद्रदरबार तापला होता. मराठी भूमीतील स्टार रिपोर्टर यमके (म्हणजे आपला एम.के. अर्थात मनकवडे हो!) यालाही दरबारात हजर करण्याचे फर्मान इंद्रदेवांनी जारी केले होते. ‘स्टार’ असला तरी यमकेची रिपोर्टरपदाची नियुक्ती कन्फर्म नसल्याने त्याला त्याचे महागुरू नारद यांच्याकडून व्हीव्हीआयपी पास घेऊनच इंद्र दरबारात प्रवेश मिळवावा लागला होता. अखेर शूर्पणखा व यमकेला इंद्रदेवांपुढे हजर करण्याचा पुकारा झाला. शूर्पणखा पाय आपटत तर यमके घाम पुसत हजर झाले. इंद्रदेवांच्या इशाºयाने दरबार सुरू झाला.शूर्पणखा : इंद्रदेवा, त्रिलोकी असलेले माझे विद्रूप नाकाचे ‘पेटंट’ धोक्यात आले आहे. कोकण नरेश नारायण दादांनी उद्धवराजांना नाक नसल्याचा दावा करून माझा अवमान केला आहे.इंद्रदेव : उद्धवराजांचे नाक, नारायण दादा आणि तुझा काय संबंध?शूर्पणखा : देवा संबंध कसा नाही, घासून घासून नाक विद्रूप झाल्यास माझ्या विद्रूप नाकाचे ‘पेटंट’ धोक्यात येणार नाही का? पण प्रश्न आता उद्धवराजांच्या विद्रूप नाकापुरता मर्यादित राहिलेला नाही. नारायण दादांच्या त्या घोषणेमुळे आता मराठी भूमीतील जिल्ह्या-जिल्ह्यातील नाक घासणाºयांची नाके धोक्यात आली आहेत...इंद्रदेव : शूर्पणखे, अगं, नारायण दादांना कधी महाराष्टÑानं सिरियसली घेतले आहे का, तू कशाला सिरियसली घेते.शूर्पणखा : देवा ‘पेटंट’ धोक्यात आल्यावर आमच्यासारख्या विद्रूपींनी काय करायचे?इंद्रदेव : यमके, शूर्पणखा म्हणते ते खरे आहे का?यमके : देवा शूर्पणखाताई म्हणतात ते खरं आहे.इंद्रदेव : शूर्पणखे तुझ्या ‘पेटंट’ला कोणताही धोका नाही. यमकेने आम्हाला मराठी भूमीतील नाकघासे रोगाची माहिती दिलीच होती. आम्ही विठ्ठलनामक लहाने या सर्जरीदूतास खास विमान देऊन ‘नाक’ सुरक्षेची मोहीम बहाल केली आहे.शूर्पणखा : बघा देवा, राम-लक्ष्मणांनी माझे नाक कापले अन् रावणामुळे रामायण घडले. आता नारायण दादांच्या कृतीमुळे ‘भाजपायन’ घडू नये. इंद्रदेवांनी घासलेल्या नाकासाठी घेतलेल्या काळजीमुळे दरबार खूश झाला आणि यमकेही नागपूर आॅरेंज सिटी असाईनमेंटच्या तयारीला लागला.- राजा माने

टॅग्स :Mediaमाध्यमेMaharashtraमहाराष्ट्र