शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

अग्रलेख - मुख्यमंत्र्यांची मास्क काढून फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2020 07:23 IST

बिहारच्या निवडणुकीत मोफत लस देण्याच्या आश्वासनावरून ठाकरे यांनी मोदी यांना लक्ष्य केले.  केले. अवघ्या सहा वर्षांत विकासाच्या मुद्द्यावरून भाजप लोकानुनयी  राजकारणाकडे वळल्याबद्दल ठाकरे यांनी वाभाडे काढले. आर्थिक दुरवस्थेकडे लक्ष देण्याची सूचनाही त्यांनी केली.

दसरा हा सण विचाराचे सोने लुटण्याचा दिवस. या दिवशी सकाळी नागपुरात सरसंघचालक तर सायंकाळी शिवसेनाप्रमुख आपापल्या स्वयंसेवकांना अथवा  सैनिकांना विचारांचे खाद्य पुरवतात. आतापर्यत अनेक सरसंघचालक व  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असेपर्यंत त्यांच्या विचारांचा सूरमिळता-जुळता असायचा. सरसंघचालक काहीशा बोजड पण नेमस्त शैलीत, तर ठाकरे ठाकरी शैलीत प्रहार करायटे. गतवर्षी विधानसभा निवडणकीच्यानिकालांनंतर संघाच्या छत्रछायेतील भाजप आणि शिवसेना यांच्या भाषेत बदल झाला. हिेदुत्व या धाग्याने बांधले गेलेले हे दोन पक्ष  वेगळे झाले. त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्यात आता सरसंघचालक आणि शिवसेना पक्षप्रमुख परस्परविरोधी सूर लावतील, अशी शक्यता वाटत होती. मुख्यमंत्रिपदाचा  मास्क बाजूला काढून भाषणण करीत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या अंगावर सत्तेचे  पीपीई किट्स  असल्याने त्यांच्यातील आत्मविश्वास सतत जाणवत होता.उद्धव यांनी भाषणात काही शेलक्या शब्दांचाही वापर केला हे विशेष. मंदिरे  खुली करीत नाहीत म्हणून  भाजपसह अनेक हिंदुत्ववादी करीत असलेल्या आंदोलनांचा समाचार घेताना  ठाकरे यांनी सकाळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदुत्व पूजापद्धतीशी जोडून संकुचित करू नका, या केलेल्या विधानााचा आधार घेतला. भागवत  यांच्या संघटनेची काळी टोपी घालत असाल  व त्या टोपीखाली डोके   मेंदू असेल तर भागवत यांचे  विचार समजून घ्या, असा टोला ठाकरे यांनी राजभवनातील  खाष्ट श्वसूर कोश्यारी यांना लगावला. ठाकरे यांनी भागवत यांच्या विधानाचा दाखला देणे स्वाभाविक आहे.  मात्र भागवत यांनी आपल्या परिवारातील लोक मंदिर उघडण्याकरिता आटापिटा करीत असताना त्यांना हिंदूंत्वाच्या व्यापक  पायाची आठवण करून देणे  हे बुचकाळ्यात टाकणारे  आह. राजभवनात बसून सुरू असलेल्या वावदुकीने कदाचित  भागवतही नाराज असावेत . किंंबहुना मंदिस सुरू करण्यावरून सुरू असलेले राजकारण संघालाही मान्य नाही, असाच याचा अर्थ आहे.  आतापर्यत सत्ता  नसल्याने ठाकरे हे मेळाव्यात सत्ताधाऱ्यांवर खापर फोडत व सरकारवर नाराज जनता टाळ्या-शिट्या पिटत असे. यावेळी राज्यातील सत्ता  शिवसेनेकडे असल्याने विरोधकानी उठवलेल्या टीकेच्या राळेचा समाचार घेणे  ही ठाकरे यांची गरज होती. भाजप हा मित्रपक्षांसोबत दगाबाजी करतो हे ठासून  सांगण्याचा प्रयत्न ठाकरे यांनी केला. ज्या नितीशकुमार यांनी मोदी यांना पंतप्रधाननपदी बसण्यास एकेकाळी विरोध केला त्यांच्या पक्षाच्या विरोधात पासवान यांचा पक्ष रिंगणाच उतरवून कुटील राजकारण खेळले जात आहे .शिवसेना  ही तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपा आणि मोदी यांची नेहमीच पाठराखण करत आली असताना. आमच्याशीही असेच पाठीत खंजीर खुपसण्याचे राजकारण खेळले गेले. मात्र शिवसेनेने ते राजकारण उलथवून टाकले, ही बाब ठाकरे यांनी आत्मविश्वासाने नमूद केली. काँग्रेससोबत सत्तास्थापन करूनही सावरकर स्मारकात मेळावा घेऊन आणिं हिंदुत्वाबाबत प्रौढी सांगुन ठाकरे यांनी आपली सत्ता ही भाजपच्या दगाबाजीविरुद्धची प्रतिक्रिया असली तरी हिंदुत्वाच्या व्यापक भूमिकेत आपले संघाशी मतैक्य  असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.  ठाकरे यांचा हा संदेश भाजपबरोबर दोन्ही काँग्रेसलाही आहे. जम्मू- काश्मीरमधील ध्वज पुर्नस्थापित होत नाही तोपर्यंत तिरंगागा हाती धरणार नाही, असे वक्यत्व्य करणाऱा मेबबूूबा मुफ्ती  यांच्यासोबत जर भाजपा कालपरवापर्यंत सत्ता स्थापन करूनही आपले हिंदुत्व भ्रष्ट न दावा करू शकतो. तर काँग्रेसोबत सत्तेत राहुनही शिवसेना तोच दावा करू पाहत आहे. किंबहुन भाजपा असो किेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेे शिवसेना दोन्ही पक्षांनी आपली विचारधारा आणि सत्तेची गणिते यांची गफलत करण्याचे टाळले आहे.  महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याऐजवी देशाच्या आर्थिक संकटावर उपाय शोधण्याचा ठाकरे यांनी दिला.  मोदी या जीएसटीमुळे राज्ये कंगाल झाली असल्यास जुन्या करआकारणीकडे  वळण्याचा सल्लाही दिला आहे. ठाकरे यांनी भाषणात बाळासाहेबांसारखे काही कठोर शब्दही वापरले. आतापर्यंतच्या उद्धव ठाकरेंच्या स्वभाव प्रकृतीला ते साजेसे नाहीत. त्यामुळे भविष्यात उद्धव हे देखील आपल्या वडिलांच्या ठाकरी शैलीचे वरचेवर अनुसरण करतील. दसऱ्याला भागवत ठाकरे यांच्या विचारांची पक्वान्ने ताटात वाढलेली असताना मन कि बातच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचारांचे मिष्टान्नही भारतीयांना प्राप्त झाले. सणासुदीच्या काळात सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या स्मरणार्थ घराघरात दिवा पेटवावा हा संदेशरूपी कार्यक्रम त्यांनी नेहमीप्रमाणे दिला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना