शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Ayodhya Ram Mandir: आम्हाला विद्वेषाच्या मशाली नकोत, हवीय विकासाची ज्योत!

By अतुल कुलकर्णी | Updated: November 24, 2018 18:07 IST

उद्धव ठाकरे यांनी २४ व २५ नोव्हेंबरचा मुहूर्त काढला तर तिकडे विश्व हिंदू परिषदेने २५ नोव्हेंबरला राम मंदिरावरुन धर्मसभेचे आयोजन केले. हे सगळे ठरवून केले जावे एवढे स्पष्टपणे घडत आहे.

- अतुल कुलकर्णी

‘सबका साथ, सबका विकास’ असे म्हणत भाजपाशिवसेना राज्यात आणि देशात सत्तेवर आली. लोकांना विकासाची गंगा आता आपल्या दारी येणार अशी स्वप्न पडू लागली. चांगल्या योजना येतील, जनतेसाठी अच्छे दिन येतील या आनंदात जनता असताना केंद्र सरकारचा कालावधी कधी पूर्ण होत आला हे कळाले देखील नाही. पहाता पहाता लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आणि अचानक विकासाची भाषा बदलली. ‘सबका साथ, सबका विकास’ हे विधान मागे पडले, ‘अच्छे दिन’ गले में अटकी हड्डी निकली...! (हे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेच आहे) आणि अचानक राम मंदिराचा मुद्दा पुढे आला. आधी हा मुद्दा सरसंघचालक मोहन भागवत यांनी काढला. त्यानंतर गडकरी यांच्या मुलाच्या लग्नासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे नागपूरला गेले तेव्हा ते मोहन भागवत यांना भेटले. दोघांमध्ये बंद दाराआड काय गुफ्तगु झाले माहिती नाही, पण त्यानंतर उध्दव यांनी राम मंदिराचा मुद्दा हळूच जनतेत सोडून दिला...

काही दिवस गेले. त्यानंतर पुन्हा सरसंघचालकांनी जो कोणी राम मंदिराची भूमिका ठामपणे मांडेल ते आमचे असतील, अशा आशयाचे विधान केले. नंतर दसऱ्याच्या मुहूर्तावर नागपूरला संघाच्या कार्यक्रमात मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा सकाळीच राम मंदिराचा मुद्दा काढला आणि त्याच दिवशी संध्याकाळी मुंबईत शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उध्दव ठाकरे यांनीही राम मंदिरासाठी अयोध्येला जाण्याची घोषणा केली.

ठाकरे यांनी २४ व २५ नोव्हेंबरचा मुहूर्त काढला तर तिकडे विश्व हिंदू परिषदेने २५ नोव्हेंबरला राम मंदिरावरुन धर्मसभेचे आयोजन केले. हे सगळे ठरवून केले जावे एवढे स्पष्टपणे घडत आहे. त्याची कारणमिंमासा वेगवेगळ्या पध्दतीने केली जात आहे. हे सगळे आताच का? असे प्रश्न सामान्य जनतेच्या मनात पडत आहेत. एका नेत्याने याचे केलेले विश्लेषण योग्य की अयोग्य माहिती नाही पण त्याचा तर्क पटणारा आहे. तो नेता म्हणाला, भाजपाला आणि संघाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे वागणे आता पटेनासे झाले आहे. उद्या हे दोघे पुन्हा सत्तेत आले तर संघही दुबळा करतील की काय? अशी भीती संघाच्या वरिष्ठांमध्ये आहे. त्यामुळेच जो कोणी हिंदुत्वाची पताका जाहीरपणे खांद्यावर घेईल तो आपला, असा मुद्दा संघाने पुढे केला आणि तो शिवसेनेने उचलला. महाराष्ट्रात मोदी विरोधाची ठिणगी चेतवायची आणि पुढे त्याचे स्वरुप वाढवत न्यायचे अशी व्यूव्हरचना यामागे असल्याचेही भाजपाचा एक नेता म्हणाला. एकदा का स्पष्ट बहूमत भाजपाला मिळाले नाही आणि जोडतोड करुन केंद्रात सरकार बनवायचे झाले की आपोआपच मोदींचा पर्याय दूर होऊन संघाला हव्या असलेल्या नितीन गडकरींचे नाव पुढे येईल असा दावा त्या नेत्याने केला आहे. त्यामुळेच मंदिरप्रेमाचे सगळ्यांना अचानक भरते आले आहे.

यामुळे विकासाविषयीचे बोलणेच बंद झाले आहे. महाराष्ट्रात पडलेल्या तीव्र दुष्काळावर नेत्यांचे बाईट बंद झाले आहेत आणि माध्यमांपासून सगळ्यांना राममंदिराचा विषय टीआरपी वाढवून देण्यासाठी योग्य वाटू लागला आहे. एकदा या देशाने या विषयावरुन विद्वेशाचा पेटलेला वणवा कसातरी विझवलेला असताना पुन्हा एकदा हा वणवा पेटवण्याचे काम सुरु होईल की काय? याची चिंता देशातील विचारी जनतेपुढे आ वासून उभी राहीली आहे. 

गरज आता संयमाची आहे. हे सगळे रामासाठी नाही तर त्याचे नाव वापरुन सत्तेची खूर्ची हस्तगत करण्यासाठी चालू आहे हे एव्हाना जनतेला कळत असले तरी वळताना दिसत नाही. त्यातच जर धार्मिक व जातीय विद्वेशाचा वणवा भडकलाच तर मग विवेक, संयम, विचारीपणा त्यात जळून खाक होतो, उरते ती फक्त ‘स्व’ ची अस्मिता...! या अशा अस्मितेला आपण कवटाळून धरायचे की ‘सबका साथ , सबका विकास’ या घोषणेचे या पाच वर्षात काय झाले याचा जाब विचारायचा? अच्छे दिन कधी आणि कसे येणार हे विचारायचे की गावोगावी बेकारीत फिरणाºया तरुणांच्या हाताला काम कधी मिळणार हे विचारायचे? 

राज्यात भाजपाने सत्ता स्थापन केल्यानंतर काही काळ विरोधी बाकावर बसणाºया शिवसेनेने त्यावेळी राज्यभर शेतकºयांच्या हितासाठी म्हणून मोर्चे काढले होते, राज्यपालांना निवेदने दिली होती, मात्र काही महिन्यातच शिवसेना सत्तेवर आली, तेव्हापासून आत्तापर्यंत राज्यपालांना दिलेल्या त्या निवेदनातील मागण्यांचे काय झाले हे शिवसेना विचारायचे की त्यांनी राम मंदिरासाठी अयोध्या गाठली याचे कौतुक करायचे? 

हे प्रश्न प्रत्येक विवेकी माणसाने आपल्या मनाला विचारायचे आहेत. पटले तर ते सत्तेवर बसलेल्यांना विचारायचे आहेत. काँग्रेस, राष्टÑवादीने असंख्य चुका केल्या, त्याची शिक्षा त्यांना सत्तेबाहेर बसवून जनतेने दिली मात्र काही चांगले व वेगळे करावे या अपेक्षेने ज्यांच्या हाती याच जनतेने सत्ता सोपवली त्यांनी या काळात काय केले हे कोणी विचारायचे? पाच वर्षात कधी ज्यांना अटलविहारी बाजपेयी यांची आठवण झाली नाही ते सरकार अचानक प्रत्येक व्यासपीठावर अटलजींचे फोटो का लावू लागले? हा प्रश्नही जाता जाता विचारता आला तर नक्की विचारा....

(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीचे वरिष्ठ सहायक संपादक आहेत)

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा