शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
3
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
4
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
5
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
6
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
7
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
8
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
9
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
10
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
11
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
12
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
13
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
14
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
15
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
16
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
17
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
18
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
19
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत

शिंदेंची सुपारी’ देण्या-घेण्यासाठी अनेकांचे हात सळसळू लागलेत !

By सचिन जवळकोटे | Updated: March 31, 2019 07:26 IST

लगाव बत्ती

- सचिन जवळकोटे

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातली ‘शिंदेशाही’ सध्या अवघ्या महाराष्टÑाचं लक्ष वेधून घेऊ लागलीय. एक शिंदे सोलापूरचे. दुसरे शिंदे माढ्याचे. पहिले ‘जनवात्सल्य’वाले. दुसरे ‘धनवात्सल्य’वाले. ‘धन’ हा शब्द त्यांच्या समूहाच्या नावातच आहे, म्हणून बरं का...उगाच गैरसमज नसावा. असो. या दोन्ही ‘शिंदें’च्या विरोधातले स्थानिक दुश्मन कमी पडले की काय; म्हणून आता राज्यभरातले नेतेही इथं येऊन तळ ठोकू लागलेत. ‘शिंदेंची सुपारी’ देण्या-घेण्यासाठी अनेकांचे हात सळसळू लागलेत. बार्शीच्या रौतांपासून सोलापूरच्या चंदनशिवेंपर्यंत..लगाव बत्ती.

मैदान बारामतीकरांचं......काठी देवेंद्रपंतांची !

‘संजयमामा’ तसे खूप भाग्यवान म्हणायचे. माढ्यात ‘दादा’ अन् करमाळ्यात ‘दीदी’ त्यांच्यासाठी मन लावून काम करू लागलेत. यालाच म्हणतात परमार्थात स्वार्थ. हेतू काहीही असो, मात्र माढ्याचा निकाल या दोन तालुक्यांवरच अवलंबून; कारण बाकी ठिकाणी ‘संजयमामां’ची सुपारी घेण्याची अहमहमिकाच लागलीय जणू.अकलूजकरांना भलेही दहा वर्षांपूर्वी पंढरपूरची आमदारकी जिंकता आली नसली तरी दुसºयांना पाडण्यात त्यांचा हात कुणीही नाही धरू शकत. ‘पाडापाडी’त ते भलतेच माहीर अन् हौशीही; त्यापायी तर माढ्याची निवडणूक त्यांच्यासाठी अत्यंत एंटरटेनमेंटची गोष्ट बनलीय.. कारण मैदान बारामतीकरांचं, काठी देवेंद्रपंतांची. त्यामुळं ‘सापऽऽ सापऽऽ’ म्हणत माढ्याची अख्खी भुई थोपटायला थोरले दादा अकलूजकर मोकळे. पाच वर्षांपूर्वीचा हिसाब-किताब चक्रवाढ व्याजासह करायला म्हणे उत्सुक.धाकटे दादा अकलूजकर तर फलटणकरांची उमेदवारी जाहीर होईपर्यंत पुण्या-मुंबईतच तळ ठोकून. ‘संजयमामां’नी आजपावेतो जेवढे काही कळत-नकळत दुश्मन तयार केले, त्या साºयांंना तिकडंच बोलावून घेऊन जोरदार ‘फिल्डिंग’ लावली. अगदी करमाळ्याच्या खुपसेंपासून अरणच्या कांबळेंपर्यंत साºयांनीच देवेंद्रपंत अन् दादांसोबत ‘गुगली’चा सराव केला. इकडं थोरल्या दादांनीही सांगोल्याचा पट्टा दोनवेळा पिंजून काढला. स्वत:साठीही कधी केलं नसेल एवढा उपद्व्याप अकलूजकर पिता-पुत्र सध्या लाडक्या ‘मामां’साठी करताहेत. खरंतर, वीस वर्षांचं ‘अ‍ॅन्टीक’ पीस ‘घड्याळ’ सोडून अकलूजकरांनी नवं कोरं ‘कमळ’ हातात धरलं, तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटलं आता धाकट्या दादांचं माढ्यात तिकीट फिक्स; पण कुठलं काय ? धाकट्यांचे धाकटे दादा वेगळंच ‘धैर्य’ दाखवत फलटणच्या ‘रणजितदादां’ना घेऊन माढा-करमाळाभर फिरले. हे पाहून त्यांच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. अपेक्षाभंगानं कैक मोबाईलचे स्क्रिनही निपचित पडले; मात्र त्यांना कुठं अंदर की बात ठावूक की.. थोरल्या दादांना ‘राज्यपाल भवन’ अन् धाकट्या दादांना ‘राज्यसभा’ देण्याचा शब्द दिला गेलाय. म्हणजे कट्टर शत्रूला संपविण्याच्या मोबदल्यात दोन गिफ्ट. वॉऽ वऽऽ याला म्हणतात बाय वन - गेट थ्री ! लगाव बत्ती...ताजा कलम : माढ्यात ‘संजयमामां’साठी स्वत: थोरले काका बारामतीकर, थोरले राजे फलटणकर, धाकटे दादा बारामतीकर अन् जयंतराव इस्लामपूरकर यांच्यासह भलीमोठी फौज उतरण्याच्या तयारीत. थोरल्या काकांनी म्हणे ‘माढाऽऽ काहीही करून गुलाल काढाऽऽ’ अशी स्पष्ट ताकीदच दिलीय. बहुधा ‘माढाऽऽ काकांना पाडा’ या पोस्टचं उट्टं काढण्यासाठी.

निंबाळकर सुखावले....निंबाळकर भांबावले !

देवेंद्रपंतांच्या कार्यालयाशी गेली काही वर्षे ‘संजयमामां’ची हॉटलाईन होती; मात्र ‘घड्याळ्याचा गजर’ होताच ती डिस-कनेक्ट झाली. दोन्ही देशमुखांना बाजूला ठेवून जिल्ह््यात स्वत:चा स्वतंत्र गट निर्माण करू पाहणाºया देवेंद्रपंतांच्या गोटात पोकळी निर्माण झाल्याचं बार्शीच्या रौतांनी अचूक ओळखलं. ‘राजाभाऊं’नी पंतांकडं आपला ‘टीआरपी’ वाढविला. माढ्यात कितीचा लीड द्यायचा, याचं गणितही त्यांनी मुंबईच्या गुप्त बैठकीत मांडलं. विशेष म्हणजे त्यावेळी कमळाचा उमेदवारही फिक्स नव्हता अन् बार्शीचाही माढ्याशी काहीच संबंध नव्हता. नंतर, ‘राजाभाऊं’चा हा उत्साह पाहून फलटणचे निंबाळकर सुखावले; परंतु उस्मानाबादचे निंबाळकर भांबावले की होऽऽ कारण बार्शीच्या भरोशावरच ओमराजेंची पुढची समीकरणं.. अन् हे ‘राजाभाऊ’ स्वत:चा मतदारसंघ सोडून शेजारच्या ‘दोस्ती-दुश्मनी’च्या सुपारीत रमलेले. लगाव बत्ती...

आधी बोटाला शाई सोलापूरची..नंतर स्टेज अकलूजचं..

गेल्या पाच-दहा वर्षांत आपल्यापासून दुरावलेल्या जुन्या सहकाºयांना एकत्र आणून सुशीलकुमारांनी सोलापुरात चांगलं वातावरण तयार केलेलं; मात्र अकोल्याच्या बाळासाहेबांची अकस्मात एंट्री होताच आकडे बदलू लागले. गणितं वर-खाली होऊ लागली. त्यात पुन्हा ‘बारामतीकरांची माघार अन् अकलूजकरांचा वार’ पंढरपूर, मंगळवेढा अन् मोहोळसाठी नव्या समीकरणांचा निमित्तमात्र ठरला. अशावेळी समोरच्या दुश्मनाची आक्रमकता जोखण्यापेक्षा शेजारच्या सहकाºयांची अस्वस्थता ओळखण्यावर सुशीलकुमारांचं अधिक लक्ष केंद्रीत. उगाच नाही त्यांना इतक्या वर्षांचा तजुर्बा... 

रणजितदादा अकलूजकरांचा ‘प्रवेश सोहळा’ झाल्यानंतर थोरल्या दादांच्याही आगमनाचे चौघडे वाजू लागले. या काळात विजयदादांनी सोलापूर पट्ट्यातील कैक सहकाºयांशी संपर्कही साधला. अनेकांनी म्हणे त्यांच्यासोबत येण्याचा शब्दही दिला. वळसंग सूतगिरणीच्या ‘राजूअण्णां’नीही हळूच सावधपणे सांगितलं, ‘एवढे पंचवीस दिवस थांबा दादाऽऽ आम्ही साहेबांना त्यांच्यासाठी शब्द दिलाय. त्यानंतर आहोतच तयार तुमच्यासोबत स्टेजवर यायचं की नाही ठरवायला.’ आता खरं-खोटं बाजार समिती जाणे. लगाव बत्ती...

जाता-जाता..

कैक निवडणुका पाहिलेल्या सुशीलकुमारांना हीही निवडणूक तशी नवी नाही; मात्र यंदा कोणतीच रिस्क घेण्याची त्यांची मानसिकता नाही.. म्हणूनच सध्या प्रत्येक कार्यकर्त्यांशी स्वत: ‘थेट संवाद’ साधण्यावरच त्यांचा अन् मोठ्या तार्इंचा भर. त्यामुळं ‘मधली फळी’ थोडीशी गडबडली असली तरी तळातल्या कार्यकर्त्यांना मात्र हा ‘थेट’ प्रकार ‘लयऽऽ भारी फायद्या’चा वाटू लागलाय.

- सचिन जवळकोटे( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेSharad Pawarशरद पवारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरmadha-pcमाधा