शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ गाझातून पळाली, तुर्कीयेत ‘निकाह’ केला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 08:39 IST

याह्या सिनवार हा ‘हमास’चा सर्वांत खतरनाक नेता. त्याची बायको समर मोहम्मद अबू जमरही तितकीच फेमस होती.

याह्या सिनवार हा ‘हमास’चा सर्वांत खतरनाक नेता. त्याच्या नुसत्या नावानंही केवळ त्यांच्या संघटनेतच नाही, तर इतर लोकही थरथर कापत. कारण थंड डोक्याचा हा माणूस केव्हा काय करेल याचा काहीच नेम नव्हता. त्यामुळे इतर देशांमध्येही त्याचा धाक होता. अगदी तरुण वयापासूनच ताे अतिरेकी कारवायांमध्ये अग्रेसर होता. त्याच्या या धाकामुळे त्याची बायको समर मोहम्मद अबू जमरही तितकीच फेमस होती आणि तिच्या ‘शब्दा’लाही संघटनेत बरीच किंमत होती. तिलाही लोक चळाचळा कापत.

इस्रायलनं १९८२मध्ये पहिल्यांदा याह्या सिनवारला अटक केली त्यावेळी तो केवळ १९ वर्षांचा होता. त्याचे ‘कारनामे’ वाढल्यानंतर १९८५मध्ये त्याला पुन्हा अटक करण्यात आली. १९८८ ते २०११पर्यंत सुमारे २२ वर्षं त्यानं इस्रायलच्या तुरुंगांत काढली. इतका काळ एकांतवासात काढल्यानंतर तो आणखीच ‘उग्र’ बनला. गेल्या सुमारे दोन वर्षांपासून इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. त्याला कारण ठरला तोही याह्या सिनवारच. कारण ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर जो अतिरेकी हल्ला झाला, आणि ज्यात इस्रायलचे सुमारे १२०० नागरिक मारले गेले, त्या हल्ल्याचा मास्टरमाइंड याह्या सिनवारच होता! 

या घटनेमुळे जगभरात इस्रायलचं नाक अक्षरश: कापलं गेलं. त्यामुळे इस्रायलला याह्या सिनवार ‘जिंदा या मुर्दा’ कुठल्याही परिस्थितीत हवाच होता. नंतर एका ड्रोन हल्ल्यात इस्त्रायलनं सिनवारला टिपलंच आणि एका अर्थानं आपल्यावरील हल्ल्याचा बदला घेतला.. पण सध्या याह्या सिनवारपेक्षाही त्याच्या पत्नीची समर मोहम्मद अबू जमरची जगभरात जास्त चर्चा सुरू आहे. याह्या सिनवार हयात असेपर्यंत त्याची इतकी दहशत होती की त्याच्या नजरेला नजर देण्याची आणि त्याच्या ‘शब्दा’बाहेर जाण्याची कोणाची टाप नव्हती. त्याची विधवा पत्नी समर आता गाझातून ‘गायब’ झाल्याची खबर आहे. 

इस्रायली न्यूज चॅनल ‘यनेट’च्या माहितीनुसार नकली पासपोर्टच्या माध्यमातून आपल्या मुलांसह समर गाझातून बाहेर पडली. तिथून ती इजिप्तला गेली आणि तिथून तुर्कीयेला. एवढंच नाही, तुर्कीत गेल्यावर दुसऱ्या एकाशी तिनं निकाहदेखील केला. या घटनेमुळे ‘हमास’ आणि जनतेत मोठी खळबळ उडाली आहे. मुळात गाझातून सुरक्षितपणे बाहेर पडणं ही इतकी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी अनेक वरिष्ठ लोकांच्या वशिल्यासह पैसाही पाण्यासारखा वाहावा लागला असणार, असं तज्ज्ञांचं मत आहे. सर्वसामान्यांच्या कुवतीतली ही गोष्ट नाही. 

हमासचा माजी प्रमुख याह्या सिनवार आणि समर यांचा २०११मध्ये निकाह झाला होता. गेल्यावर्षी १६ ऑक्टोबर २०२४ रोजी वयाच्या ६१व्या वर्षी इस्रायलनं एका ड्रोन हल्ल्यात त्याला ठार मारलं. हा क्रूरकर्मा मारला गेल्यानंतर वर्षभराच्या आत त्याच्या बायकोनं दुसरा निकाह करावा याचंच अनेकांना आश्चर्य वाटतं आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध सुरू झाल्यानंतर आणि इस्त्रायलनं आपले हल्ले अधिक तीव्र केल्यानंतर हमासच्या प्रमुख नेत्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना गाझाबाहेर काढण्याचे प्रयत्न कधीचेच सुरू केले होते. त्यानुसार खोटी कागदपत्रे, नकली पासपोर्ट, लाचखोरी आणि शक्य त्या सर्व मार्गांनी अनेकांना गाझाच्या बाहेर काढण्यात आलं. त्यातच समरही होती. तिच्या नव्या लग्नानंतर तिच्यासमोरच्या नव्या आव्हानांची चर्चा आता सुरू आहे. 

टॅग्स :World Trendingजगातील घडामोडी