शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

शरद बनसोडे भाजपचेच खासदार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:23 IST

सोलापूर महापालिकेत भाजपची सत्ता असताना मनपाच्या कामकाजावर जनता नाराज असल्याची टीका करणारे भाजपचेच खासदार अ‍ॅड. शरद बनसोडे यांनी आपल्याही मतदारसंघातील विकास कामाचे मूल्यमापन करावे. पालकमंत्री- सहकारमंत्री यांची गटबाजी चर्चेत असताना आता बनसोडे यांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे.

- बाळासाहेब बोचरेसोलापूरचे अ‍ॅड. शरद बनसोडे हे मराठी चित्रपटातील एक नायक म्हणून अवघ्या महाराष्टÑाला माहीत आहेत. शिवाय ते वकील आहेत आणि मनी मार्केटचे त्यांना उत्तम ज्ञान आहे. मोदी लाटेत भाजपच्या तिकिटावर सोलापुरातून निवडून आले म्हणून नव्हे तर माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना पराभूत केल्यामुळे नावारूपाला आलेले खासदार शरद बनसोडे यांनी भाजपच्याच कार्यशैलीवर तोंडसुख घेतल्याने भाजपला तोंड लपवायला आणि सारवासारव करण्याला जागा उरली नाही. लोकसभेची सोलापूरची जागा जिंकण्याबरोबरच भाजप-सेना युतीने सोलापूर महापालिकेतही सत्ता मिळवली. मात्र महापालिकेत दोन मंत्र्यांचे दोन गट कार्यरत असल्याने निवडणुका होऊन दीड वर्षे उलटले तरी जनतेच्या अपेक्षांची पूर्ती होत नाही.निधी न मिळाल्याने नगरसेवकांचा थयथयाट सुरू आहे. स्थायी समिती सभापतीची निवड न्यायालयीन प्रक्रियेत अडकली आहे. खासदार बनसोडे हे चार महिन्यांपूर्वी महापालिकेत एका कार्यक्रमास आले तेव्हा त्यांनी गट तट विसरून जनतेसाठी काम करण्याचा सल्ला दिला होता. आता तर त्यांनी मनपातील भाजपच्या कार्यपध्दतीवर जनता वैतागली आहे, अशी टीका केली. काँग्रेससारख्या विरोधी पक्षाने भाजपवर टीका केली तर ती राजकीय समजली जाईल पण बनसोडे हे भाजपचेच खासदार असल्याने आणि त्यांनी मनपातील कामाबद्दल नाराजी व्यक्त करणे म्हणजे आश्चर्यकारक आहे. वास्तविक बनसोडे बोलले त्यात चुकीचे काहीच नाही. मनपा आयुक्त ढाकणे हे सक्षम अधिकारी आहेतच. मात्र त्यांना काम करण्यासाठी लोकप्रतिनिधींचा जो एकोपा लागतो तो सोलापुरात दिसत नाही.विरोधी पक्षाचे सोडा पण सत्तारूढ पक्षातही एकोपा नाही. मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेशी कुणाचा दोस्ताना नाही. सगळी डोकी नुसती मोजण्यासाठीच आहेत. जनतेने देशात सत्तांतर केले, राज्यात केले आणि मनपातही केले. जिल्हा परिषदेतही भाजपच्या पाठबळावर संजय शिंदे अध्यक्ष झाले. खासदार म्हणून बनसोडे यांनी सोलापूरच्या विमानतळाचा प्रश्न धसास लावावा, रेल्वे दुहेरीकरण, इलेक्ट्रिफिकेशन, लोणंद -पंढरपूर लोहमार्ग या विषयाचा पाठपुरावा करणे अपेक्षित आहे. सोलापूर-मुंबई रेल्वे कर्नाटकला दिली. पण बनसोडे यांनी मनपाच्या कामकाजावर उघडपणे पत्रकारांशी बोलून नाराजी व्यक्त केली.आपल्या मतदारसंघातील जनतेने आपल्याला लक्षात ठेवावे असे कोणते काम बनसोडे यांनी केले आहे. शिवाय ते सार्वजनिक कार्यक्रमातही फारसे दिसत नाहीत. रेल्वे, विमान, महामार्ग खात्याच्या कार्यक्रमातही दिसत नाहीत. त्यांना मनपाच्या कामकाजाची आताच आठवण का यावी? आणि आयुक्त ढाकणे यांची बदली होईल अशी शंका तरी मनात का यावी? पालकमंत्री व सहकारमंत्री यांच्या गटबाजीत सोलापूर महापालिकेच्या कामकाजाला जनता वैतागली असल्याची टीका करणारे खासदार बनसोडे स्वत:च्या मतदार संघातील कामाचे मूल्यमापन कसे करणार ?

टॅग्स :Sharad Bansodeशरद बनसोडेSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाBJPभाजपा