शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

दुष्काळाच्या छायेत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 01:36 IST

एकीकडे पाऊस मुंबईत धो-धो बरसतो. मुंबईकरांना कंबरभर पाण्यातून घराचा मार्ग शोधावा लागतो. तर दुसरीकडे शेतात लावलेली पºहाटी जगविण्यासाठी तिला गडवाभर पाणी टाकून टाकून विदर्भातील शेतक-यांची कंबर लागली आहे.

एकीकडे पाऊस मुंबईत धो-धो बरसतो. मुंबईकरांना कंबरभर पाण्यातून घराचा मार्ग शोधावा लागतो. तर दुसरीकडे शेतात लावलेली प-हाटी जगविण्यासाठी तिला गडवाभर पाणी टाकून टाकून विदर्भातील शेतक-यांची कंबर लागली आहे. मुंबईकरांनी असा पाऊस न येण्यासाठी तर विदर्भवासींनी पाऊस बरसण्यासाठी गणरायाला निरोप देताना साकडे घातले आहे.गेल्यावर्षी पश्चिम महाराष्ट्र- मराठवाड्याने दुष्काळ अनुभवला. शासनही मदतीला धावले. जनावरांसाठी चारा छावण्या उभारण्यापासून ते लातूरला रेल्वेने पाणी पोहोचविण्यापर्यंतचे उपाय योजले गेले. मात्र, तीच परिस्थिती येत्या उन्हाळ्यात नागपूरकरांवर येते की काय, याची चिन्हे दिसू लागली आहेत. नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प आहेत. त्यांची एकूण पाणीसाठ्याची क्षमता २९६४.४ दलघमी इतकी आहे. जलसंपदा विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार या मोठ्या प्रकल्पांमध्ये आतापर्यंत एकूण ९२० दलघमी इतका म्हणजे केवळ ३१ टक्के पाणीसाठा आहे. मध्यम प्रकल्प हे खºया अर्थाने लोकवस्ती व शेतीसाठी संजीवनी असतात. मात्र, मध्यम प्रकल्पातही फक्त ३७ टक्के जलसाठा आहे.एक गोसेखुर्द सोडले तर एकही धरण भरलेले नाही. तोतलाडोह प्रकल्पात केवळ १२ टक्के, रामटेक (खिंडसी) २३ टक्के, इटियाडोह ३४ टक्के, बोर ३४ टक्के, धाम ५४ टक्के, लोवर वर्धा टप्पा-१ (२८ टक्के) अशी धरणांची बिकट अवस्था आहे. आॅगस्ट संपला. सप्टेंबरचाही पहिला आठवडा संपत आला आहे. गणेश स्थापनेला दोन-तीन दिवस हजेरी लावलेल्या पावसाने आता विसर्जनाला मात्र दडी मारली आहे. गणरायासोबत पाऊसही निघून गेला तर शेतीसह पिण्याचे पाणीही मिळणे कठीण होईल, अशा भयावह परिस्थितीला विदर्भवासीयांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.गेल्यावर्षी याच काळात जलसाठा ६० टक्क्यांपर्यंत होता. आता परतीचा मान्सून विदर्भात किती बरसेल यात शंका आहे. परततानाही वरुण राजाने कृपादृष्टी केली नाही तर विदर्भातील शेतकºयांना पुन्हा एकदा ‘देवेंद्रांवरच’ अवलंबून राहावे लागणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी