शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शोध सुखाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 23:49 IST

जीवन म्हणजे प्रभूदर्शनाचा अखंड वाहणारा प्रवाह आहे. त्यामध्ये सुख-दुख, चांगले-वाईट, खरे-खोटे, सत्य- असत्य अशा निरनिराळ्या लाटा येत असतात. सर्वच लाटा सुखाच्या नसतात आणि सर्वच लाटा दु:खाच्याही नसतात.

- ह. भ. प. बाबामहाराज सातारकरजीवन म्हणजे प्रभूदर्शनाचा अखंड वाहणारा प्रवाह आहे. त्यामध्ये सुख-दुख, चांगले-वाईट, खरे-खोटे, सत्य- असत्य अशा निरनिराळ्या लाटा येत असतात. सर्वच लाटा सुखाच्या नसतात आणि सर्वच लाटा दु:खाच्याही नसतात. कोणतीही लाट आली तरी ती समुद्राचीच आहे, हे लक्षात आल्यानंतर ती मोठी लाट आहे की लहान आहे, हा विचार बाजूला पडतो आणि समुद्रावर लक्ष केंद्रित होते. तसे माणसाचे जीवन सुखमय, पावनमय, आनंदमयच आहे. आपल्यापुरता आपण जर विचार केला तर आपण खऱ्या अर्थाने सुखी आहोत. पण आपण जेव्हा दुसºयाकडे पाहतो तेव्हा आपण दु:खी होतो. आपली सायकल चांगली आहे, पण दुसरा मोटारसायकलवरून गेलेला पाहिल्यानंतर आपल्याला दु:ख होते. म्हणजे आपल्याकडे दु:ख नाही तर अ‍ॅक्शन-रिअ‍ॅक्शन आहे. दुसºयाचा चांगला संसार पाहिला की आपल्याला बरे वाटेनासे होते. अर्थात आपला वाईट आहे, असे नव्हे. काही माणसे देवमाणसे आहेत. आहे त्या परिस्थितीत सुखी असतात. कारण ती दुसºयाकडे पाहत नाहीत. मला एकदा झोपडीत राहणारे एक कुटुंब भेटले. त्यांना विचारले कसे आहात? त्यावर ते म्हणाले, आहे त्यापेक्षा छान आहे. म्हटले बरे झाले. त्यानंतर ते म्हणाले, आम्ही दोघेही काम करतो. कष्ट करतो. लोकांना घास मिळत नाही. आम्हाला मिळतो.’ प्रभूने सुंदर जीवन दिले, असा दृष्टिकोन हवा. खरे तर, विचार केला तर जीवनात आनंद लहरीच आहेत. पण दुसºयाकडे पाहून जीवन जगायचे म्हटल्यास मात्र दु:ख होते. त्याच्याकडे जे आहे, माझ्याकडे नाही हे खरे दु:ख आहे. लंडनला थंडीचे दिवस होते. बर्फ पडत होता. खूप बर्फ साचला होता. एकाच्या पायात बुट नव्हते. तो गाडीमध्ये जाणाºया माणसांना शिव्या देत होता. हे त्याचे मोठ्याने बोलणे रस्त्याच्या कडेला असणाºया एका माणसाने ऐकले. त्याने त्यास बोलावून घेतले. काय झाले, असा प्रश्न केला. त्यावर तो त्रागा करणारा माणूस म्हणाला, हे लोक सगळे पैशावाले चाललेत आणि माझ्याकडे साधे बुटही नाहीत. त्यावर रस्त्यावरील त्या माणसाने आपली पँट वर केली तर त्यास गुडघ्यापासून पाय नव्हते. तो म्हणाला, ‘राजा तुला बुट नाही म्हणून रडतोस, मला तर पायच नाहीत. तरीही मी सुखात आणि आनंदात आहे.’ जीवनात प्रभूने जे दिलेय त्यात सुख मानावे. आनंद मानला तरच जीवन सुखी होणार आहे. माणूस दुसºयाकडे पाहून जगला तर मला नाही वाटत शेवटच्या श्वासापर्यंत सुखी होईल.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकnewsबातम्या