शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

2016 मधिल बॉलिवूड स्टार्सचे स्कोरकार्ड

By admin | Updated: December 31, 2016 03:33 IST

‘धोक्याचं वरिस’ समजले जाणारे २०१६ हे वर्ष बॉलिवूडसाठी ‘कभी खुशी गभी गम’ असे ठरले आहे. कारण या वर्षात काही स्टार्सना यशाच्या शिखरावर पोहोचता आले, तर काहींना अपयशाची

- Satish Dongare

‘धोक्याचं वरिस’ समजले जाणारे २०१६ हे वर्ष बॉलिवूडसाठी ‘कभी खुशी गभी गम’ असे ठरले आहे. कारण या वर्षात काही स्टार्सना यशाच्या शिखरावर पोहोचता आले, तर काहींना अपयशाची चव चाखावी लागली. जर या सेलिब्रेटींच्या स्कोरकार्डवर लक्ष वेधल्यास धक्कादायक निर्णय बघावयास मिळतील. विशेष म्हणजे खान त्रिकुटांच्या डिक्शनरीमधून ‘अपयश’ हा शब्द केव्हाच गहाळ झाल्याचे म्हटले जात असले तरी किंग खानला अपयशाचा सामना करावा लागला, तर दोन स्टार्सनी आपल्याच चित्रपटांचे रेकॉर्ड मोडून काढत नवा कीर्तिमान स्थापन केला. या सेलिब्रेटींच्या २०१६ मधील स्कोरकार्डवर टाकलेला हा दृष्टिक्षेप...सलमान खानसद्यस्थितीत निर्विवादपणे दबंग स्टार अर्थात सलमान खान बॉलिवूडचा नंबर वन स्टार आहे. कारण त्याचा चित्रपट येणार आणि कोट्यवधी रुपयांची लयलूट करून जाणार हेच सत्य आहे. चित्रपटाच्या शुटिंगपासून फॅन्स त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. यावर्षी त्याच्या ‘सुल्तान’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर कमाईचे अनेक रेकॉर्ड तोडत इंडस्ट्रीमध्ये आपणच टॉपवर असल्याचे दाखवून दिले. २०१६ मध्ये एकमेव चित्रपट केलेल्या सलमानच्या ‘सुल्तान’ने ३००.४५ कोटी रुपयांची लयलूट केली. अर्थात नेहमीप्रमाणे या चित्रपटामुळेदेखील तो विवादात सापडला होता. प्रमोशनप्रसंगी त्याने केलेले वादग्रस्त वक्तव्य त्याच्या चांगलेच अंगलट आले होते. ब्लॉकबस्टर :0१सुपरहिट :00हिट :00सरासरी :00फ्लॉप :00शाहरूख खानशाहरूखसाठी २०१६ हे वर्ष फारसे चांगले गेले नाही. कारण त्याच्या ‘फॅन’ या चित्रपटाने अपेक्षेप्रमाणे कमाई केली नसल्याने त्याला चांगलाच झटका बसला. ‘फॅन’च्या फ्लॉपमुळे त्याचा आत्मविश्वास एवढा खालावला की, त्याने सलमानच्या ‘सुल्तान’बरोबर ‘रईस’चा सामना करण्यास सपशेल नकार देत ‘रईस’ची तारीख पुढे ढकलली. त्यामुळे त्याच्या स्टारडमलादेखील धक्का बसला. या वर्षात रिलीज झालेल्या त्याच्या दुसऱ्या ‘डियर जिंदगी’ या चित्रपटात त्याने काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्या नावाला साजेशी कमाई हा चित्रपट करू शकला नाही. करण जोहर याच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात तो एका सीनमध्ये झळकला.ब्लॉकबस्टर :00सुपरहिट :00हिट :0१सरासरी :00फ्लॉप :0१हृतिक रोशनहृतिक २०१६ या वर्षाला कदाचित कधीच स्मरणात ठेवणार नाही. कारण कंगना राणौतबरोबरच्या वादामुळे त्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यातच यावर्षी रिलीज झालेल्या ‘मोहेंजोदडो’ या चित्रपटाच्या फ्लॉपमुळे त्याला जबरदस्त धक्का सोसावा लागला. या चित्रपटासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली होती. मात्र बॉक्स आॅफिसवर चित्रपट असा काही आपटला की, हृतिक आणि चित्रपटाचा दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्यात मतभेद निर्माण झाले. आता हृतिकला नव्या वर्षात काही तरी करिष्मा करावा लागेल. कारण रणवीर आणि वरुण धवनसारखे स्टार त्याच्या रांगेत येण्यासाठी काही पावलेच मागे आहेत.ब्लॉकबस्टर :00सुपरहिट :00हिट :00सरासरी :00फ्लॉप :0१अजय देवगणगेल्या चार-पाच वर्षांपासून अजय देवगण हिट चित्रपटाच्या शोधात आहे. ‘सिंघम’ आणि ‘सिंघम रिर्टन्स’ या दोन चित्रपटांव्यतिरिक्त त्याला एकही सुपरहिट चित्रपट देता आला नाही. यावर्षी त्याचा ‘शिवाय’ हा चित्रपट रिलीज झाला. मात्र बॉक्स आॅफिसवर हिटचा दर्जा मिळवण्यासाठी त्याला चांगलीच धडपड करावी लागली. दिवाळीत रिलीज झालेल्या या चित्रपटाला करण जोहर याच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाशी सामना करावा लागला. मात्र त्यात तो अपयशी ठरला. रिलीजपूर्वीच करण आणि त्याच्यात कोल्डवॉर रंगले होते. ‘फितूर’मध्ये तो एक छोटीशी भूमिका साकारताना आपल्याला बघावयास मिळाला.ब्लॉकबस्टर :00सुपरहिट :00हिट :00सरासरी :0१फ्लॉप :0१अक्षयकुमारअक्षयकुमार याच्याकरिता २०१६ हे वर्ष यशस्वी राहिले आहे. यावर्षी त्याचे तीन चित्रपट रिलीज झाले अन् तिन्ही चित्रपट हिट ठरल्याने त्याला तीनशे कोटी रुपयांच्या क्लबमध्ये स्थान मिळाले. मात्र त्याचा बॉलिवूडमधील प्रवास पाहता ही कमाई त्याच्या प्रतिष्ठेला शोभत नाही. कारण त्याचा हिट चित्रपट सवाशे कोटी रुपयांच्या पुढे जात नाही. त्याचे ‘रुस्तम’ व ‘एअरलिफ्ट’ सुपरहिट ठरले, तर ‘हाउसफुल’ने सरासरी कमाई केली.ब्लॉकबस्टर :00सुपरहिट :0२हिट :00सरासरी :0१फ्लॉप :00

आमिर खानमिस्टर परफेक्टनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानचा वर्षातून एकच चित्रपट रिलीज होत असतो अन् तोही शक्यतो वर्षाअखेरीसच रिलीज केला जातो. २०१६ मध्ये ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर रिलीज करण्यात आलेला त्याचा ‘दंगल’ या चित्रपट बॉक्स आॅफिसवर धूम उडवित आहे. ब्लॉकबस्टर :0१सुपरहिट :00हिट :00सरासरी :00फ्लॉप :00दीपिका पादुकोण बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री असलेल्या दीपिका पादुकोणचा यावर्षी केवळ एकच चित्रपट आला. ‘पिकू’मध्ये ती महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकली. हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर हिट ठरला. तसेच अनेक पुरस्कारही चित्रपटाने नावावर करून घेतले. या वर्षात दीपिका तिचा पहिला हॉलिवूडपट ‘ट्रिपल एक्स- द रिटर्न आॅफ जेंडर केज’ या चित्रपटामुळेच अधिक चर्चेत राहिली. जानेवारी २०१७ मध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. ब्लॉकबस्टर :00सुपरहिट :00हिट :0१सरासरी :00फ्लॉप :00प्रियंका चोपडा बॉलिवूडमध्ये २०१६ हे वर्ष प्रियंकासाठी चांगले ठरले नसले तरी हॉलिवूडमध्ये ती यावर्षात यशाचा टप्पा सर करताना बघावयास मिळाली. या वर्षात फक्त एक चित्रपट रिलीज झाला. हॉलिवूडमध्ये ‘बेवॉच’ व अमेरिकन सिरियल ‘क्वांटिको’मुळे ती चर्चेत राहिली. ब्लॉकबस्टर :00सुपरहिट :00हिट :00सरासरी :00फ्लॉप :0१कॅटरिना कैफ २०१६ हे वर्ष कॅटरिनासाठी खूपच दु:खदायक ठरले. बॉयफ्रेंड रणबीर कपूरबरोबरचे संबंध संपुष्टात आले. वर्षाच्या सुरुवातीलाच रिलीज झालेला ‘फितूर’ हा चित्रपट फारसा करिष्मा दाखवू शकला नाही. त्याचबरोबर सिद्धार्थ मल्होत्रासोबतचा ‘बार बार देखो’ ही प्रेक्षकांनी नाकारला.ब्लॉकबस्टर :00सुपरहिट :00हिट :00सरासरी :00फ्लॉप :0२अनुष्का शर्मा तिन्ही खानसोबत काम करण्याची संधी मिळालेल्या अनुष्का शर्मा हिच्यासाठी २०१६ हे वर्ष खूपच लकी ठरले. सलमानसोबतच्या ‘सुल्तान या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर धूम उडवून दिली, तर ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाने सरासरी यश मिळवले.ब्लॉकबस्टर :0१सुपरहिट :00हिट :00सरासरी :0१फ्लॉप :00अमिताभ बच्चन सत्तर प्लस एवढे वय असतानाही महानायक अमिताभ बच्चन नेहमीच बॉलिवूडच्या रेसमध्ये असतात. केवळ अभिनयाच्या जोरावर ते प्रेक्षकांच्या मनात घर करून असल्याने आजही त्यांचे चित्रपट कोटीच्या क्लबमध्ये स्थान मिळवत आहेत. मात्र २०१६ हे वर्ष त्यांच्यासाठी ‘कभी खुशी कभी गम’ असेच राहिले आहे. कारण ‘वजीर’ आणि ‘तीन’ या चित्रपटातून त्यांना फ्लॉपचा सामना केला, तर ‘पिंक’ बॉक्स आॅफिसवर हिट ठरला. पिंकमधील अभिनयाचे कौतुक झाले़ब्लॉकबस्टर :00सुपरहिट :00हिट :0१सरासरी :00फ्लॉप : 0२