शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

दप्तराचे ओझे हलके होईना.!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 22:18 IST

न्यायालय आणि केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे हलके करणारे नियम ठरवून दिले आहेत. त्याची तपासणी महाराष्ट्र सरकारने शाळांमधून केली आणि सर्वकाही नियमानुसार आहे, असा निर्वाळाही दिला.

- धर्मराज हल्लाळे

न्यायालय आणि केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे हलके करणारे नियम ठरवून दिले आहेत. त्याची तपासणी महाराष्ट्र सरकारने शाळांमधून केली आणि सर्वकाही नियमानुसार आहे, असा निर्वाळाही दिला. प्रत्यक्षात दप्तराचे ओझे हलके होताना दिसत नाही. त्याला काही शासन, प्रशासन आणि शाळाच जबाबदार आहेत असे नाही तर पालकांचेही तितकेच उत्तरदायित्व आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार इयत्ता पहिली ते दहावी या वर्गातील विद्यार्थ्यांचे दप्तर ओझे किती किलो असावे, याचा आलेख सर्वांसमोर आला आहे. त्याच निकषानुसार शाळांतील मुलांच्या पाठीवरचे ओझे आहे का, याची तपासणी राज्यात शिक्षण विभागाने केली. काही निवडक शाळांची तपासणी करून दप्तराचे ओझे कसे समजणार, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आणि त्यात तथ्य आहे. खरे तर पाठीवरच्या ओझ्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या मनावरचे ओझे कमी करण्याची आवश्यकता आहे. शासनाने नापास न करण्याचे धोरण आणि गुणवत्ता यादी जाहीर न करण्याची भूमिका घेतली असली तरी प्रत्यक्षात शाळांमध्ये वर्गवारी असतेच. पहिला, दुसरा, तिसरा आणि शेवटचाही विद्यार्थी असतो. स्वाभाविकच मुलांच्या मनावरील ताण शासनाच्या निर्णयाने कमी होत नाही. पालकांची मानसिकता बदलली पाहिजे. मुलांकडून केल्या जाणा-या अवास्तव अपेक्षा हे त्यांचे बालपण खुंटविणाºया आहेत. आज पालक वर्ग सजग आहे. मुलांच्या भविष्याची त्यांना चिंता आहे. अपवाद काही जण आपल्या मुलाने खेळात प्रावीण्य मिळवावे, सांस्कृतिक क्षेत्रात नाव कमवावे, असे वाटणारेही आहेत. परंतु बहुतेकांना स्पर्धा लावण्यातच रस आहे. मुलांची दिनचर्या सकाळी उठल्यापासून ते निद्राधीन होईपर्यंत शाळा-अभ्यास-शिकवणी या भोवतीच फिरत आहे. मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाकडे, त्याच्या एकंदर जडणघडणीकडे डोळसपणे पाहिले जात नाही. एखाद्या महोत्सवात, एखाद्या उत्सवात, शिबिरात मुलांना सहभागी करणे म्हणजे त्याचा अभ्यास बुडविणे अशी धारणा सर्वात आधी पालकांची आहे. मुलगा वेगळे काही शिकू शकेल असे का वाटत नाही हा प्रश्न आहे. सर्वच मुलांनी मोठ्या पदांवर जावे, डॉक्टर, इंजीनियर व्हावे या अपेक्षा चूक नाहीत, परंतु त्या पलीकडेही मुले आपले भविष्य घडवू शकतात, याकडे पालकांनी डोळसपणे पाहिले पाहिजे.एकंदर पाठीवरच्या ओझ्याबरोबरच मनावरच्या ओझ्याकडे सर्वांचे लक्ष गेले पाहिजे. तूर्त शासनाने घेतलेली भूमिका व दिलेले निर्देश स्वागतार्ह आहेत. ९९ टक्के शाळांमध्ये नियमातच दप्तर ओझे आहे, असे अहवाल म्हणत असला तरी हे पूर्णसत्य नाही. पहिलीत जाण्याआधीपासून पाठीवर दप्तर आले आहे. कितीही मुक्त शिक्षण, ज्ञानरचनावाद, मनोरंजनातून शिक्षण बोलले आणि लिहिले जात असले तरी विद्यार्थ्यांना परीक्षार्थी बनविण्यातच शाळांची ऊर्जा खर्ची जाते. त्याला पालकांचा दृष्टिकोन कारणीभूत आहे. निकालाची परंपरा आणि सर्वाधिक गुणांचे विद्यार्थी यावरच शाळेचा पट अवलंबून असतो. त्याला जोडून घ्यायचेच असेल तर आणखी एखाद्या परीक्षेलाच बसविले जाते. त्यासाठी जगभरातील विद्यापीठेही तयारच आहेत. नाही म्हणायला जिल्हा आणि तालुक्यांच्या ठिकाणी टॅलेंट शोधणारी प्रतिष्ठानेही आहेत. त्यामुळे शाळेतील पुस्तकांबरोबरच अशा परीक्षांचेही ओझे दप्तरात आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा