शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

जीएसटी ऑडिटमध्ये विक्रीसंबंधी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 4:20 AM

जीएसटीआर-९ सी हा पार्ट अ आणि पार्ट इ अशाप्रकारे दोन भागांत विभागलेला आहे.

- उमेश शर्मा, सीएअर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, जीएसटीआर-९ सी अंतर्गत कोणती माहिती द्यावयाची आहे?कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, जीएसटीआर-९ सी हा पार्ट अ आणि पार्ट इ अशाप्रकारे दोन भागांत विभागलेला आहे. पार्ट अ अंतर्गत करदात्याला वार्षिक रिटर्न व वहीखात्यानुसार विक्री व खरेदी यांचा रीकन्सीलीएशन द्यावयाचा आहे, व पार्ट इ अंतर्गत जीएसटी ऑडिट रिपोर्ट प्रमाणित करून घ्यावयाचे आहे.अर्जुन : कृष्णा, करदात्याला जीएसटीआर-९ सी मध्ये विक्रीसंबंधीची माहिती कशाप्रकारे द्यावयाची आहे?कृष्ण: अर्जुना, विक्रीसंबंधीची माहिती ही टेबल ५ ते टेबल ११ पर्यंत द्यावयाची आहे. टेबल ५ आणि ७ मध्ये करदात्याला विक्रीबद्दल माहिती द्यावयाची आहे व टेबल ९ मध्ये कराच्या दरानुसार कर दायित्वाची माहिती टेबल ११ मध्ये द्यावी लागेल. रिकन्साईल न झालेल्या पुरवठ्याची व कराची कारणे ही टेबल ६, ८ आणि १0 अंतर्गत द्यावयाची आहे.अर्जुन : कृष्णा, टेबल ५ आणि ७ अंतर्गत कोणती माहिती द्यावी लागेल?कृष्ण : अर्जुना, टेबल ५ मध्ये करदात्याला एकूण उलाढालीचे रिकन्सीलेशन द्यावयाचे आहे. ती माहिती खालीलप्रमाणे द्यावी लागेल.टेबल ५अ अंतर्गत करदात्याला प्रत्येक जीएसटी नंबर प्रमाणे आर्थिक वर्ष २0१७-१८ मधील वही खात्यानुसार असलेल्या उलाढालीची माहिती द्यावी लागेल.टेबल ५ इ मध्ये मागील आर्थिक वर्षात जे अनबील्ड रेव्हेन्यु संचय प्रमाणीनुसार नमूद केले गेल आहे व ते चालू आर्थिक वर्षात बिलिंग करण्यात आले आहे त्याबद्दल माहिती द्यावी लागेल.आर्थिक वर्ष २0१७-१८ मध्ये मिळालेले अडव्हान्स जीएसटी भरलेला असून जर ते वहीखात्यात उत्पन्न म्हणून दाखवलेले नसल्यास ते टेबल ५उमध्ये द्यावे लागेल.सीजीएसटी कायदा २0१७ मधील शेड्युलनुसार असलेल्या सप्लाय (पुरवठा) एकूण मूल्य हे टेबल क्रं ५ (ऊ) मध्ये द्यावे लागेल. (जसे सर्व्हिसची आयात, गिफ्ट इ.)ट्रेड डिस्काउंट जे वहीखात्यात नमूद केले असून ते कपात करण्यास पात्र नाही असे टेबल क्रमांक ५ ऋ मध्ये दाखवावे लागेल. तसेच एप्रिल २0१७ ते जून २0१७ मधील एकूण उलाढाल ही टेबल क्रमांक ५ ॠ द्यावी लागेल.क्रेडिट नोट जी मान्य आहे, ती टेबल ५ख मध्ये दाखवावी लागेल, व तसेच विदशी व्यापारापासून असलेला नफा किंवा तोटा टेबल क्रमांक ५ठ मध्ये दर्शवावा लागेल.जीएसटीआर - ९ तसेच वही खात्यामध्ये दाखवलेल्या तफावतीची अन्य कारणे ही टेबल क्रमांक ५ड मध्ये द्यावी लागतील. उदा:- स्थायी मालमत्तेची विक्रीनिल रेटेड, झीरो रेटेड, एक्झाम्पटेड, नॉन-जीएसटी पुरवठा इत्यादीबद्दलची माहिती टेबल ७ मध्ये करपात्र उलाढाल मिळविण्यासाठी द्यावी लागेल. वरीलप्रमाणे मिळालेल्या करपात्र उलाढालीचा तपशील हा वार्षिक रिटर्ननुसार असलेल्या करपात्र उलाढालीशी तपासावा लागेल. त्यात काही आढळल्यास ते टेबल क्रमांक ८ मध्ये कारणांसहित दाखवावे लागेल.अर्जुन : कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा?कृष्ण : अर्जुना, जीएसटी लागू झाल्यापासूनची ऑडिटची ही पहिलीच वेळ आहे. त्यानुसार करदात्याला व ऑडिटरला योग्य अशाप्रकारे झालेल्या व्यवहारांची माहिती देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ऑडिटरला जीएसटी ऑडिट करतांना निर्णायक भुमिका निभवावी लागणार आहे. सर्व नियम नीट पाहून टेबल तपशीलवार भरले की करदात्याला काहीच समस्या उद्भवणार नाही, हे नक्कीच.

टॅग्स :GSTजीएसटी