शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
4
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
5
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
6
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
7
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
8
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
9
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
10
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
11
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
12
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
13
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
14
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
15
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
16
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
17
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
18
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
19
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
20
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?

८६२ कोटी रुपये वेतन! - मला नक्को!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 09:03 IST

अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत आणि येत्या काळात जो या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणार नाही, तो मागे पडणार हे चित्र आज तरी आहे...

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) उद्याचं भविष्य आहे आणि यापुढील बराच काळ ते जगावर राज्य करील, हे अनेकांना माहीत आहे. त्यामुळे प्रत्येक जण, प्रत्येक कंपनी आपलं एआय मॉडेल अधिकाधिक मजबूत करण्यावर भर देत आहे. एआयनं आज जगभरातील सारी समीकरणं बदलून टाकली आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत आणि येत्या काळात जो या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणार नाही, तो मागे पडणार हे चित्र आज तरी आहे.

‘एआय’ कंपन्या तरी यात मग मागे कशा राहतील? एआय क्षेत्रातील जगभरातील तज्ज्ञ, इंजिनिअर्सना अपाल्याकडे ओढण्यासाठी सगळ्याच एआय कंपन्यांमध्ये आता तीव्र चुरस निर्माण झाली आहे. मार्क झुकरबर्गच्या ‘मेटा’ कंपनीनं सध्या आपल्या महत्त्वाकांक्षा यासाठी पणाला लावल्या आहेत. या क्षेत्रात जिथे जिथे जे जे कोणी तज्ज्ञ आणि हुशार लोक असतील त्यांच्यासाठी मेटानं आक्रमक भरती अभियान सुरू केलं असून, त्यांच्यासाठी अक्षरश: पायघड्या घालायला सुरुवात केली आहे. आपली सुपरइंटेलिजन्स लॅब अधिकाधिक मजबूत करण्यासाठी त्यांनी कोणतेच प्रयत्न बाकी ठेवलेले नाहीत. त्यासाठी तज्ज्ञांना ‘मूंह मांगे दाम’ द्यायला त्यांनी सुरुवात केली आहे.किती असावं त्यांचं वेतन आणि पॅकेज? एआय इंजिनिअर्स आणि विशेषज्ञ यांच्यासाठी सुरुवातीचं वेतन तर आत्यंतिक आकर्षक असेलच; पण टप्प्याटप्यानं चार वर्षांत ते तब्बल दहा कोटी डॉलर्सपर्यंत (सुमारे ८६२ कोटी रुपये!) जाईल! 

कोणालाही वाटेल, इतकं वेतन आणि इतकी आकर्षक ऑफर कोण नाकारणार? पण असेही काही जण आहेत, त्यांनी ही ऑफर नाकारली आहे आणि आपल्या आहे त्या वेतनावर समाधान मानलं आहे.

एआयच्या क्षेत्रातील ॲन्थ्रोपिक ही अशीच एक प्रसिद्ध प्रयोगशाळा. त्याचे सहसंस्थापक आणि सीईओ आहेत डारियो अमोदेई. त्यांनी नुकतंच सांगितलं, आमचे इंजिनिअर्स, संशोधकांना आपल्याकडे ओढण्यासाठी मेटानं अशा अनेक ऑफर्स दिल्या, पण आमच्या टीमनं त्या नाकारल्या आहेत. ॲन्थ्रोपिकचे मुख्य विज्ञान अधिकारी आणि सह-संस्थापक जेरेड कापलान यांनी एका पॉडकास्टमध्ये नुकतंच सांगितलं, खरं म्हटलं तर व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहता दहा कोटी डॉलर्स ही वाटते तितकी मोठी रक्कम नाही. एआय मॉडेल्सचं प्रमाण आणि प्रभाव पाहता, हे आकडे ‘फायद्याचा सौदा’ वाटू शकतात; पण तसं नाहीए. या व्यवसायाचं मूल्य बघता चार वर्षांत दहा कोटी रुपये वेतन म्हणजे प्रत्यक्षात कंपन्यांसाठी फायद्याचा आणि स्वस्त सौदा ठरू शकतो.

परप्लेक्सिटी एआयचे सीईओ अरविंद श्रीनिवास यांनीही या दृष्टिकोनाचं समर्थन करताना म्हटलं आहे, जगातल्या प्रतिभावंतांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी केवळ वेतन ही गोष्ट पुरेशी नाही. उद्देश, प्रभाव आणि बौद्धिक आव्हानांकडेही ते अधिक आकर्षित होतात. तुम्ही नवीन आव्हानांना तोंड देत आहात. आपण आपल्या क्षेत्रात प्रगती करीत आहोत, याची जाणीव तुम्हाला होत आहे, त्या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी तुम्ही शिकत आहात आणि त्याच वेळी, तुम्ही श्रीमंतही होत आहात. अशा वेळी फक्त जास्त वेतन मिळतंय म्हणून आपली नोकरी कोण कशाला सोडेल?.. 

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सMark Zuckerbergमार्क झुकेरबर्गtechnologyतंत्रज्ञान