शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

सदाप्रेरक पुण्यात्मा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 04:54 IST

‘सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट’चे संस्थापक इंजि.माधवराव भिडे यांचे गेल्या आठवड्यात निधन झाले.

- सुमेध वडावाला (रिसबूड)‘सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट’चे संस्थापक इंजि.माधवराव भिडे यांचे गेल्या आठवड्यात निधन झाले. मराठी उद्योजकांना एकत्र आणण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ते सदैव तत्पर असत. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा हा विशेष लेख.शिक्षकाच्या घरी जन्मलेला एक तैलबुद्धी मुलगा सिव्हिल इंजिनीअर बनला. रेल्वेत चिफ इंजिनीअर झाला. ५६व्या वर्षी स्वेच्छानिवृत्तीनंतर स्वत:चा कन्सल्टन्सी व्यवसाय सुरू केला. ३० वर्षे अखंड भरभराट अनुभवताना मराठी तरुणांनी उद्योजक व्हावे, या उद्देशाने ‘सॅटर्डे क्लब’ची स्थापना केली. अखेरपर्यंत कार्यमग्न राहिलेल्या या कर्तबगार आयुष्यप्रासादाला लागलेलं रसिकतेचं तोरणही अम्लान होते, अशा साररूपाने माधवराव भिडे यांची आत्मकथा सांगता येईल. ती मी प्रत्यक्षात लिहिली, तेव्हा त्यांनी वयाची ब्याऐंशी पार केलेली होती. त्यांच्या कल्पकतेचे कित्येक प्रसंग ऐकताना मी चकित होत होतो. भिड्यांना काव्य रचण्याचा, ऐकण्याचा छंद होता. मुंबईबाहेरच्या एका श्रेष्ठ कवींशी दोस्ताना बहरला होता. मुंबईतील भिड्यांच्या घरी गाण्याची मैफल जमायची. कवीच्या रचनांतली तरलता, हळवेपणा कवीच्या आचरणात नावापुरताही नव्हता, खाणं, बोलणं सारचं आडदांड होतं. एकदा गाण्यांच्या वेळी पुढ्यात ठेवलेली काजू कतरीची अख्खी प्लेट कवीराजांनी फस्त केली होती. त्यांच्या घरी नेण्यासाठी दुसरा घसघशीत डबा दिला. तो मात्र, त्याच्यात एक चिठ्ठी घालून ठेवूनच! रात्रभरच्या रेल्वे प्रवासानंतर कविराज घरी पोहोचले, तेव्हा त्यांच्या पत्नीला डबा चिठ्ठीसह मिळाला. ‘काजूकतरी छानच होती. चिठ्ठीमुळेच आमच्यापर्यंत पोहोचू शकली,’ असा कविपत्नीचा भिड्यांना आभारदर्शी फोन आला. कवीनेही ‘अपराध मी करू पाहिला,’ अशी कबुली दिली. कारण खादाड कवीला वाटेतच मोह अनावर झाला, तेव्हा प्रवासात त्यांनी डबा उघडलाच होता, पण ‘ही काजूकतरी फक्त घरच्यांसाठी आहे,’ अशी चिठ्ठी वाचून खजिल होत डबा बंद केला होता... कविश्रेष्ठांची ही संयमशून्यता आत्मकथेत घ्यावी, लिहावी की वगळावी, असा प्रश्न पडला, पण भिडे म्हणाले, ‘घ्या पुढचेही घ्या.’ एका भेटीत कविश्रेष्ठांनी कुणी तरुण, गरजू मुलगा बरोबर आणला होता. दोन तासांच्या गप्पांच्या वेळी तो नि:शब्दपणे बसून होता. कुणा थोरामोठ्यांच्या ओळखीतून ते त्याला नोकरीला लावणार होते. निघण्यापूर्वी कविराजांनी त्या मुलाला आमच्या दारामागच्या मांडणीतल्या स्वत:च्या चपला आणून पायापुढे ठेवण्याची आज्ञा दिली. मुलाने ती पाळली. हळहळलो आम्ही. गरिबी, आगतिकता हे जीवनशत्रू आहेत. समाजात उद्योजकसंख्या वाढली, तरच नोकऱ्या वाढतील. म्हणून तर मी ‘अवघे होऊ श्रीमंत’ हे सॅटर्डे क्लबचं बोधवाक्य ठेवलं आहे.माधवरावांची कल्पकता आचरणसिद्ध होती. कित्येक सुस्थापित उद्योजकही सॅटर्डे क्लबचे सदस्य होते. त्यांपैकी कित्येक जण हे लहान-मोठे बांधकाम व्यावसायिक होते. सिमेंटसारख्या मूलभूत घटकांची अशा व्यावसायिकांची गरज एकत्रित करून खरेदीबळाच्या आधारे माधवरावांनी थेट उत्पादकांकडून कमी भावात खरेदी करण्याची घडी बसवून दिली. कल्पकता, कामाचा धडाका यांना कायद्याच्या ज्ञानाचं पाठबळ हवं, ही दूरदृष्टी त्यांच्यापाशी होती. म्हणून वयाच्या चाळीशीत, कॉलेजला जाऊन ते एल.एल.बी झाले. ही पदवी शोभामात्र नव्हती. भविष्यात ‘व्हॅल्युअर’ म्हणून आणि लवाद म्हणूून प्रतिष्ठा मिळविताना आणि तत्पूर्वीच्या रेल्वेतल्या नोकरीतही त्या ज्ञानाचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून घेतला. हार्बर मार्गाचे सारे प्रवासी भिड्यांचे ऋणी राहतील. हार्बर शाखा तोवर वांद्र्यापर्यंत पोहोचली होती. अंधेरीपर्यंत तो वाढविण्याचा रेल्वेचा फ्लॅन सिद्ध झालेला होता. एका थिएटर मालकाने कोर्टाकडून आणलेल्या स्टेमुळे ती योजना रेल्वेला खूप वर्षांपासून बासनात गुंडाळून ठेवावी लागली हाती. मार्ग विस्तारासाठी वांद्र्यापुढे एक फ्लायओव्हवर ब्रीज बांधायला हवा होता. ब्रिजच्या बांधकामावेळी खालचे रूळ तात्पुरते सरकवून रेल्वे हद्दीलगतच्या जागेतून टाकावे लागणार होते. ती जागा थिएटर मालकाची होती. रेल्वेच्या तात्पुरत्या जागावापराविरुद्ध मालकाने स्टे मिळविला. मध्य रेल्वेच्या चिफ इंजिनीअरपदी गेल्यावर भिड्यांनी बासनातल्या फाइलचा सर्र्वंकष अभ्यास केला. ‘स्टे’च्या पुनर्विचारार्थ कोर्टात अर्ज केला. सॉलिसिटर्सना युक्तिवादाचे ‘लीगल इनपुनट्स’ दिले ते भिड्यांनीच. थिएटर परिसरातल्या विपुल मोकळ्या जागेतली काही जागाच, तीही तात्पुरती वापरावी लागणार आहे, ज्यामुळे थिएटर व्यवसायावर कोणताही परिणाम होणार नाही. लाखो प्रवाशांच्या दैनंदिन सोयीसाठी मालकाने रेल्वेला जागा वापरू देणे हे सामाजिक हितार्थ आवश्यक आहे, असा युक्तिवाद ग्राह्य मानून कोर्टाने स्टे उठविला.मुंबई रेल्वेच्या इतिहासात पहिला फ्लायओव्हर बांधला गेला. ‘दादर सेंट्रलच्या टर्मिनसची उभारणीही आंतरराष्ट्रीय दर्जाची करण्यासाठीचा प्राथमिक आराखडा भिड्यांनी बनविला होता, पण बाहेरगावच्या गाड्या सोडण्यासाठीच्या नव्या भागापुरतीची मंजुरी मिळाली. निधी कमतरतेचं कारण सांगितलं गेलं.आपल्यातली कार्यक्षमता, नियोजन श्रीमंती यांना नोकरीत पडणाºया मर्यादा कित्येकदा अनुभवल्यामुळे आणि व्यवसायसृजना संकल्पित आविष्काराने झपाटले गेल्यामुळे भिड्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. भिडे असोसिएट्सचं बीजारोपण केलं. व्यवसाय आदर्शवत बहरला. डोंंबिवलीच्या प्राचीन गणेशमंदिराची पुनर्उभारणी करताना, त्याला सांस्कृतिक केंद्राचीही जोड देणे अथवा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरापुढच्या भाविकरांगेच्या मार्गाची अचूक आखणी करताना, मार्गाला छेदणाºया रस्त्यावरच्या वाहतूककोंडीचा वर्षानुवर्षांचा जटिल प्रश्न सोडविणं अशी कामं तंत्रज्ञानाच्या, अनुभवाच्या बळावर करून दाखविण्याइतकेच ते ‘धार्मिक’ होते. खरं आस्थाप्रेम होतं ते कर्मसिद्धतेवर. मात्र, त्या अखंड कर्मज्ञानाने त्याचं जगणं शुष्क केलं नाही ते कलासक्तीमुळेच!प्रथम पत्नीच्या हातांना चित्रकलेचं उपजात वरदान लाभलेलं होतं. त्यांच्या पेेंटिग्जची दोन वेळा प्रदर्शन भरवून, विक्रीतून आलेली लक्ष्मी गृहलक्ष्मीच्या स्वाधीन करणारा तो दक्ष नवरा होता आणि द्वितीय पत्नी डॉ. इरावती यांच्या अखंड वैद्यकीय सेवाभावाविषयी मनात आदर बाळगणारा कदरदान कुटुंबप्रमुख होता. ज्याचं श्रेय त्याला देण्याची आतुरता ठेवणारा समंजस कंपनीओनर होता. अंतिम आजारपणात ज्या हॉस्पिटलमध्ये मुक्काम झाला, तिथल्या आयादायांना, नर्सेसना ‘एवढी दक्ष सेवा केलीत, करता, तर सर्वांनी मिळून नर्सिंग सेवा पुरविणारा व्यवसाय सुरू करा. आम्ही ‘सॅटर्डे क्लब’ आहोत मार्गदर्शनाला...’ असं सांगणारा ‘सदाप्रेरक’ पुण्यात्मा होता.