शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
3
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
4
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
5
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
6
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
7
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
8
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
9
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
10
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
11
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
12
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
13
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
14
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
15
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
16
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
17
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
18
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
19
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
20
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची साथ रोखण्यात रोबो, ड्रोनसह तंत्रज्ञानाचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 03:48 IST

चीनने या विषाणूच्या मानवी संक्रमणाची पुष्टी केली आहे आणि म्हणूनच त्याचा वेगवान प्रसार जागतिक स्तरावर होत आहे.

कोरोना विषाणूने सध्या जगभर हाहाकार माजवला आहे. याचे दूरगामी परिणाम अनेक देशांच्या (विशेषत: चीनच्या) अर्थव्यवस्थेवर होत आहेत. आपल्या देशातही केरळमध्ये तीन रुग्ण आढळल्याने पर्यटक तिथे जायचे टाळत आहेत. प्रथम वुहान शहरात पहिला रुग्ण आढळला, म्हणून त्याचे नाव वुहान व्हायरस आहे. हा विषाणू कोरोना व्हायरसच्या कुटुंबाचा एक सदस्य आहे, ज्यामुळे सामान्य सर्दीसारख्या सौम्य परिस्थितीने सुरुवात होऊन त्याचे रूपांतर गंभीर व तीव्र श्वसन सिंड्रोमसारख्या प्राणघातक रोगात होऊ शकते.

चीनने या विषाणूच्या मानवी संक्रमणाची पुष्टी केली आहे आणि म्हणूनच त्याचा वेगवान प्रसार जागतिक स्तरावर होत आहे. किमान दहा हजार व्यक्तींना त्याची लागण झाली आहे. तीनशेहून अधिक व्यक्ती मृत्युमुखी पडल्या आहेत व अनेक गंभीर आहेत. या रोगाच्यानिराकरणासाठी अनेक तंत्रज्ञान उद्योग आर्थिक, तांत्रिक व मनुष्यबळाचे योगदान देत आहेत.

चीनमधील पहिल्या क्रमांकाचे उद्योजक जॅक मा (अलिबाबाचे प्रमुख) यांनी आर्थिक तशीच तांत्रिक मदत मोठ्या प्रमाणात दिली आहे. अलिबाबा क्लाऊड वैज्ञानिक संशोधन संस्थांना एआय संगणकीय क्षमता विनामूल्य उपलब्ध करून देत आहेत. यावर प्रतिबंधक लस लवकरात लवकर उपलब्ध करण्यासाठी अनेक संशोधक अथक काम करत आहेत. प्राणघातक कोरोना व्हायरस थांबविण्याचे रहस्य त्याच्या जीनोममध्ये लपलेले आहे. चीनमधील क्रमांक एकचे सर्च इंजिन असलेले बायडू आपले जनुक अनुक्रम अल्गोरिदम वैज्ञानिकांना मोफत उपलब्ध करून देत आहे.

२००३ मध्ये जेव्हा सार्स विषाणूचा प्रादुर्भाव झाला तेव्हा अशी लस विकसित व्हायला सुमारे वर्ष उजाडले होते. आता काही महिन्यांत कोरोनाची प्रतिबंधक लस विकसित होईल. सध्या जगभर सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे आहेत व ते सतत व्यक्तींच्या प्रतिमा साठवत असतात. या प्रतिमेचे त्वरित विश्लेषण करून त्यातील कुठल्या व्यक्तीमध्ये तापाची लक्षणे आहेत ते त्वरित समजण्यासाठी बिग डेटा अ‍ॅएनालिटिक तंत्र अनेक सरकारी कार्यालये वापरत आहेत. कारण बाधित व्यक्ती ओळखणे व त्वरित तिला वेगळे ठेवणे हे अतिमहत्त्वाचे आहे. अनेक देशांत हॉस्पिटले गजबजली आहेत. त्यामुळे निदान वेग वाढला पाहिजे व त्यासाठी सिंगापूरस्थित व्हेरड्स लॅबोरेटरीजने पोर्टेबल लॅब-आॅन-चिप डिटेक्शन किट विकसित केली आहेत. ज्यायोगे आपण स्वत:च ठरवू शकू, की आपण बाधित आहोत का? ही स्वचिकित्सा करणे आणि त्यासाठी जगभरातील नागरिकांमध्ये जागृती असणे हेही नक्कीच अतिशय महत्त्वाचे आहे. कारण असे संसर्गजन्य आजार ही बाब आता केवळ एका देशापर्यंत मर्यादित राहू शकत नाही.

वैद्यकीय कर्मचाऱ्यांना याचा संसर्ग होण्याचा धोका असतो. जीवावरचा धोका पत्करून हे वैद्यकीय कर्मचारी संसर्गजन्य आजारातील रुग्णांची सेवा करीत असतात. ही सेवा करताना त्यांनाही बाधा होण्याचा धोका असतो. आतापर्यंत अनेक डॉक्टर आणि परिचारिका तसेच अन्य वैद्यकीय कर्मचारी अशा रुग्णांची सेवा करताना संसर्गजन्य आजारांना बळी पडले आहेत. म्हणूनच हे सारे टाळण्यासाठी मेडिकल यंत्रमानव विकसित केले आहेत. हे चिकित्सकांना स्क्रीनद्वारे रुग्णाशी संवाद साधू देते आणि स्टेथोस्कोपसह सुसज्जही आहे. यायोगे रुग्णाला स्पर्श करण्याची गरजच पडत नाही.

चीनमधील प्रमुख बाधित क्षेत्र वुहान इथे वैद्यकीय सामग्री-औषधे वितरित करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे. त्याचप्रमाणे वैद्यकीय कचरा विशेष रोबोजचा वापर करून वेगळा काढला जात आहे आणि मानवी हस्तक्षेप टाळून त्यावर प्रक्रिया होत आहे. चीन व इतर आशियाई देशात व्हीचॅट हे मेसेंजर अ‍ॅप स्मार्टफोनवर लोकप्रिय आहे. त्याचा वापर एक अब्जाहून अधिक व्यक्ती करतात. या अ‍ॅपने त्यांच्या सर्व सदस्यांना जवळचे रुग्णालय शोधण्यास मदत करण्यासाठी बाह्यरुग्ण क्लिनिकचा नकाशा प्रसिद्ध केला आहे.

कोरोनाच्या उद्रेकानंतर, जगभरात सोशल मीडियावर दहशत पसरली आहे. फेसबुक, ट्विटर व लिंक्ड इनने विकृत प्रतिमा प्रसार टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अल्गोरिथम विकसित करून त्याचा अवलंब सुरू केला आहे. ही आपत्ती म्हणजे एक जागतिक संकट मानून तंत्रज्ञान उद्योग व संगणक व्यावसायिक जगभर आपापल्या परीने आपला खारीचा वाटा उचलत आहेत. इंटरनेट, स्मार्टफोन आणि त्यामधील अ‍ॅप्स यामुळे चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा, वैद्यकीय सल्ला आणि इतर सुविधा रुग्णांपर्यंत अत्यंत तातडीने पोहोचवणे शक्य होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाchinaचीनIndiaभारत