शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

नदी स्वच्छता ‘मन की बात’पुरतीच राहू नये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 3:02 AM

मोर्णा असो की चंद्रभागा किंवा वर्धेतील धाम, या सर्व नद्यांचे प्राक्तन एकच ! नद्यांच्या स्वच्छतेसाठी अभियानांच्या घोषणा खूप होतात; पण प्रत्यक्षात सरकारकडून ठोस पावले उचलली जात नाहीत.

- राजेश शेगोकारमोर्णा असो की चंद्रभागा किंवा वर्धेतील धाम, या सर्व नद्यांचे प्राक्तन एकच ! नद्यांच्या स्वच्छतेसाठी अभियानांच्या घोषणा खूप होतात; पण प्रत्यक्षात सरकारकडून ठोस पावले उचलली जात नाहीत. केवळ लोकसहभागाच्या भरवशावर नद्यांची स्वच्छता होणार नाही. सरकारच्या पातळीवर प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. केवळ आराखड्यांनी काही होणार नाही.अकोल्यात सुरू झालेल्या मोर्णा नदी स्वच्छता अभियानाची नोंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’मध्ये घेतली. अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या अभियानाला प्रशासनासोबतच स्वयंसेवी संस्था व लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पंतप्रधानांनी दखल घेतल्यानंतर, या अभियानाला आणखी उंची मिळाली आहे. मोर्णा स्वच्छतेचा हा ‘पॅटर्न’ राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये आता सुरू झाला आहे. पुण्यातील पवनाई व वर्धा शहरातील धाम या नद्यांच्या स्वच्छतेसाठी प्रशासनासोबत लोकांचा सहभाग वाढत आहे. हे चांगले संकेत आहेत; मात्र केवळ लोकसहभागातून नदी स्वच्छता अन् सौंदर्यीकरणाचा प्रश्न मिटणार नाही, तर शासनानेही पुढाकार घेऊन निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.नद्यांच्या स्वच्छतेसाठी यापूर्वी अनेकदा प्रयत्न झाले आहेत. गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी १९९३ मध्ये कृती आराखडा तयार करण्यात आला होता. त्यावर अंदाजे २० हजार कोटी रुपये खर्च झाले होते. त्यानंतर २००९ मध्ये राष्ट्रीय गंगा खोरे प्राधिकरण स्थापन झाले व सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून ‘नमामि गंगे’ अभियान सुरू आहे. दुर्दैवाने कृती आराखडा, प्राधिकरणाची स्थापना आणि ‘नमामि गंगे’ अभियानानंतरही गंगेची अवस्था ‘जैसे थे’ आहे. वारकरी संप्रदायात पंढरपुरातून वाहणाºया चंद्रभागेला विठ्ठलाएवढेच महत्त्व आहे, ते लक्षात घेऊन मध्यंतरी महाराष्ट्र शासनाने ‘नमामि गंगे’च्या धर्तीवर ‘नमामि चंद्रभागा’ अभियानाची घोषणा केली. त्यावेळी राज्यातील नद्यांच्या स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर आला होता.पर्यावरणाच्या दृष्टीनेच नव्हे, तर भावनिक, धार्मिक, सामाजिकदृष्ट्याही मानवी संस्कृतीत नदीचे स्थान खूप वरचे आहे. नदी केवळ पाण्याचा प्रवाहच वाहून नेत नाही, तर त्या प्रदेशाची अर्थव्यवस्थाही प्रवाही करीत असते. नदीच्या काठाने वसणारे विश्व हे नदीवरच अवलंबून असणारे असते. त्यामुळेच नदी काठावरची लोकसंख्येची घनता जास्त असते. कदाचित त्यामुळेच नदी प्रदूषित होण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होत असावी. नद्यांवर पाण्यासाठी उभे केलेले बंधारे, गावे व शहरांमधील संपूर्ण सांडपाण्याचा नदीत होणारा निचरा, रेतीसाठी होणारी नदी पात्रांची प्रचंड खोदाई, थेट नदी पात्रातील अतिक्रमण यामुळे नद्यांचे अस्तित्व जवळजवळ संपुष्टात येऊन तिचा नाला झालेला असतो. मोर्णा असो की चंद्रभागा किंवा वर्धेतील धाम या सर्वांचे प्राक्तन एकच! त्यामुळे सरकारने नद्यांच्या स्वच्छता अभियानांची घोषणा करून त्याला ‘नमामि’ हा ‘टॅग’ चिटकवित थेट पंतप्रधानांशी नाते सांगितले. प्रत्यक्षात मात्र सरकारकडून ठोस अशी मदत केली जात नाही, हे वास्तव आहे. नमामि चंद्रभागेसाठी बैठकांचा रतीब घालण्यात आला; पण पुढे काय? तशीच स्थिती ‘मन की बात’मध्ये उल्लेख झालेल्या मोर्णेच्या बाबतीत होऊ नये, ही अपेक्षा गैर नाही. मोर्णा नदी स्वच्छतेसाठी दानशूर व्यक्ती, संस्था व लोकप्रतिनिधी पुढे आले आहेत; परंतु नदीच्या स्वच्छता व सौंदर्यीकरणाचा आराखडा पाहता ती रक्कम अपुरी पडणार आहे. लोकसहभागातून सौंदर्यीकरणाला मर्यादा आहेत. शिवाय सांडपाण्याचा नदीतील निचरा थांबविण्याचेही आव्हान आहेच. त्यामुळे शासनाने नद्यांची स्वच्छता व सौंदर्यीकरणासाठी केवळ घोषणा व लोकसहभागाचे कौतुक करू नये, तर मदतीचा हातही देण्याची गरज आहे.

टॅग्स :riverनदी