शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

साखर नव्हे, पाण्याची निर्यात; देशव्यापी मंथन घडवून आणायला हवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 14:24 IST

ऊस आणि कापूस ही महाराष्ट्रातील रोखीची प्रमुख पिके ! कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर आत्महत्यांची पाळी येऊन आता काही दशके उलटली आहेत. भविष्यात तशीच पाळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांवरही येऊ शकते, असा इशारा जर गडकरी देत असतील, तर त्यामागे निश्चितच काही विचार असला पाहिजे.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी हे अफलातून कल्पना आणि त्यांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ख्यात आहेत. सोबतच विविध विषयांवरील स्पष्ट, परखड, सडेतोड मतप्रदर्शनासाठीही ते ओळखले जातात. त्याच ख्यातीला जागत, त्यांनी नुकतेच सोलापूर येथे एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य केले. वाढत्या ऊस उत्पादनामुळे शेतकऱ्यांवर एक दिवस आत्महत्येची पाळी येईल, असे वक्तव्य त्यांनी केले. दुष्काळी जिल्हा ही सोलापूरची कोणे एकेकाळची ओळख ! उजनी धरण झाले आणि सोलापूर जिल्ह्याचे रूपडेच पालटले. आज देशात सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा ही सोलापूरची नवी ओळख आहे. त्या एकाच जिल्ह्यात तब्बल ४० साखर कारखाने आहेत. त्यांनी सोलापूर जिल्ह्यात समृद्धी आणली आहे खरी; परंतु वेळीच आवश्यक ती दुरुस्ती न केल्यास त्या समृद्धीला दृष्ट लागू शकते, असा इशाराच जणू काही गडकरी यांनी दिला आहे.

ऊस आणि कापूस ही महाराष्ट्रातील रोखीची प्रमुख पिके ! कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर आत्महत्यांची पाळी येऊन आता काही दशके उलटली आहेत. भविष्यात तशीच पाळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांवरही येऊ शकते, असा इशारा जर गडकरी देत असतील, तर त्यामागे निश्चितच काही विचार असला पाहिजे. गडकरी स्वत: साखर कारखाना चालवतात. त्यांचा अर्थकारणाचा अभ्यास चांगला आहे. शिवाय नव्याने उदयास येत असलेले तंत्रज्ञान आणि त्याच्या दूरगामी परिणामांबाबतही ते अद्यतन असतात. त्यामुळे त्यांनी जर ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर आत्महत्यांची पाळी येऊ शकते, असा इशारा दिला असेल, तर त्यावर गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. सध्याच्या घडीला भारतातील साखर उद्योगाला सुगीचे दिवस आलेले दिसतात ते ब्राझील या प्रमुख साखर निर्यातदार देशामधील दुष्काळामुळे !

ब्राझीलमधील दुष्काळ संपला की साखरेचे दर घसरायला वेळ लागणार नाही. दुसरीकडे शेतकऱ्यांना उसाचा जो दर द्यायचा आहे, त्यामध्ये तर कपात करणे शक्य नाही. त्यामुळे साखर कारखानदारांनी वेळीच साखर उत्पादन कमी करून इथेनॉल उत्पादनावर भर द्यावा, असा सल्लाही गडकरी यांनी दिला. उद्या जागतिक बाजारपेठेत साखरेचे दर कोसळले तर साखर कारखाने बंद करण्याची पाळी येईल आणि त्या स्थितीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांपुढे आत्महत्येशिवाय पर्यायच राहणार नाही, असे गडकरी यांना सुचवायचे होते. गडकरींचे इथेनॉल प्रेम प्रसिद्ध आहे. भारताला ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण बनविणे, आयातीत खनिज तेलावरील परावलंबित्व संपुष्टात आणणे, हे त्यांचे स्वप्न आहे. त्यासाठी ते सतत विविध पर्यायांच्या शोधात असतात. इथेनॉल हा त्यापैकी एक. त्यामुळे ते सातत्याने इथेनॉलचे उत्पादन वाढविण्यावर भर देत असतात. त्यामुळेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर आत्महत्यांची पाळी येईल, असा टोकाचा इशारा त्यांनी दिल्याचा आरोप होऊ शकतो; पण साखर अथवा एकूणच कृषी उत्पादनांच्या निर्यातीला आणखी एक कंगोरा आहे.

कृषी उत्पादनांची निर्यात करणे म्हणजे एकप्रकारे पाण्याची निर्यात करणेच असते; कारण कृषिमालाच्या उत्पादनासाठी, विशेषतः ऊस उत्पादनासाठी, प्रचंड प्रमाणात पाणी लागते. भारताने २०२०-२१ या आर्थिक वर्षात कृषिमालाच्या निर्यातीत तब्बल १७.३४ टक्क्यांची वाढ नोंदवली. त्या माध्यमातून भारताला ४१.२५ अब्ज डॉलर्स एवढे विदेशी चलन प्राप्त झाले खरे; मात्र त्यासाठी अमूल्य असे पाणी खर्ची पडले. आज देशात सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. त्यामागचे कारण हे आहे, की गत ५० वर्षात भारतातील पाण्याची दरडोई उपलब्धता तब्बल ६० टक्क्यांनी घटली आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये आपण जो कृषिमाल निर्यात केला, त्याच्या उत्पादनासाठी लागलेल्या पाण्यात एक हजार लोकसंख्येच्या दीड हजार गावांची वर्षभर तहान भागविता आली असती. तिसरे महायुद्ध झाले तर ते पाण्यासाठीच होईल, असा इशारा तज्ज्ञ अनेक वर्षांपासून देत आहेत. काही हुशार देशांनी तो गांभीर्याने घेतला असून, जलसंवर्धनाच्या दृष्टीने कृषिमाल, मांस, चामडे  यांचे देशांतर्गत उत्पादन घटवून आयातीवर भर देणे सुरू केले आहे. भारतानेही त्या दृष्टिकोनातून आतापासून विचार करणे अगत्याचे आहे. ज्या पिकांना जास्त पाणी लागते त्यांची आयात करणे आणि कमी पाण्यात तयार होणाऱ्या पिकांच्या निर्यातीवर भर देणे, असे उपाय योजण्याचा विचार भारताने करायला हवा. नितीन गडकरी यांनी या विषयाला तोंड फोडले आहेच, तर त्यावर देशव्यापी मंथन घडवून आणायला हवे आणि भविष्याचा विचार करून धोरण निश्चित करायला हवे!

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी