शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

कमला मिलचे फलित : ‘दर’ आणखी वाढतील

By अतुल कुलकर्णी | Updated: January 1, 2018 01:25 IST

सरत्या वर्षात मुंबईत एकापाठोपाठ एक अनेक दुर्दैवी घटना घडल्या. अनेकांचे जीव गेले. घटना घडल्या की तातडीने चौकशी करू, दोषींवर कठोर कारवाई करू, अशा घोषणा झाल्या. पण आजपर्यंत एकाही चौकशीचा अहवाल समोर आला नाही.

सरत्या वर्षात मुंबईत एकापाठोपाठ एक अनेक दुर्दैवी घटना घडल्या. अनेकांचे जीव गेले. घटना घडल्या की तातडीने चौकशी करू, दोषींवर कठोर कारवाई करू, अशा घोषणा झाल्या. पण आजपर्यंत एकाही चौकशीचा अहवाल समोर आला नाही. एलफिस्टनच्या चेंगराचेंगरीत २३ लोक मेले, त्यावेळी याच सदरात ‘सगळ्यांना सगळे माहिती आहे, हिंमत मात्र कोणाकडेही नाही कारण सगळे मिंधे झालेले आहेत. आॅडिट कसले करता..’ असे आम्ही लिहिले होते. वर्ष संपण्याच्याआत त्या विधानाचा दुर्दैवी प्रत्यय आला. याहीवेळी चौकशीची घोषणा झाली आहे.कमला मिल परिसरातील आगीने निर्माण केलेले प्रश्न केवळ कागदोपत्री चौकशीचे फार्स पूर्ण करून संपतीलही, तेवढ्यापुरती कोणाला तरी शिक्षाही होईल. मात्र मूलभूत प्रश्न कधीही समोर येणार नाहीत. सरकारने कठोर आॅडिटची घोषणा केली खरी पण कशाकशाचे आॅडिट करणार? कमला मिलमध्ये जी दोन हॉटेल जळून खाक झाली त्यातील नियमांचे उल्लंघनही अशाच प्रकारे झालेले आहे. त्या हॉटेलने पार्किंगच्या जागेत स्वत:चे पाय पसरले. त्याकडे डोळेझाक करण्यापासून ते फायर एनओसीपर्यंत सगळ्या गोष्टी अंडरटेबल ‘सुखरूप’ पार पडल्या. हवे ते मिळत गेल्याच्या बदल्यात अधिकाºयांनी कागदोपत्री ‘सबकुछ ओके’ करून दिले. या सगळ्या व्यवहाराचे आॅडिट कोण करणार?माजी पोलीस महासंचालक के.के. पाठक यांच्या मुलाची यातल्या एका हॉटेलमध्ये भागीदारी आहे. महिला व बालकल्याण विभागाचे निवृत्त उपायुक्त अशोक मानकर आणि गायक शंकर महादेवन यांची मुलं यात आहेत. त्यांच्यावर घटना घडल्याच्या दुसºया दिवशी गुन्हे दाखल झाले. या बड्या अधिकाºयाच्यांच मुलांना मोक्याच्या जागा व्यवसायासाठी कशा मिळतात? त्यांनी कागदोपत्री किती पैसे गुंतवले आणि प्रत्यक्षात तेथे खर्च किती झाले? जेवढ्या जागेत हे हॉटेल उभारले गेले त्याचा खर्च बाजारदराने काढला तरी तो प्रचंड आहे. तो खर्च या अधिकाºयांच्या मुलांनी कसा केला? त्याचे आॅडिट कोण करणार?या हॉटेलवर कारवाई करण्याची नोटीस दिल्यावर पाठक यांनी आयुक्तांना फोन करून ती कारवाई थांबवली असा मेसेज सोशल मीडियातून फिरत आहे. त्याचे आॅडिट करून सत्य बाहेर आणण्याचे काम कोण करणार? हुक्का ओढायला बंदी असताना तेथे तो कोणाच्या परवानगीने ओढला जात होता? पबच्या बारसमोर आगीचे लोट पेटवून त्यावर डान्स करण्याची परवानगी कोणी दिली होती? याचे आॅडिट कोण करणार?जे काही सांगितले जात आहे ती सगळी धूळफेक आहे आणि वेळ मारून नेण्याचा प्रकार आहे. कारण आजवर कोणत्याही चौकशीचा अहवाल कधीही समोर मांडला गेलेला नाही, अगदी एकनाथ खडसे आणि राधेश्याम मोपलवार यांच्याही चौकशीचा अहवाल सरकारने स्वत:हून प्रकाशित केलेला नाही. मुंबईत लिफ्टची तपासणी करणारा अधिकारीही एका लिफ्ट तपासणी प्रमाणपत्राचे ७०० रुपये घेतो. त्यातले १०० ते १५० तो स्वत:कडे ठेवतो. बाकीचे सगळ्यांना वाटतो. हे तो स्वत:च सांगतो. तेथे बाकीच्यांचे काय? या घटनेनंतर एकच होईल, ते म्हणजे, अशा सगळ्या परवानग्यांचे ‘दर’ सेक्शन गरम है... असे म्हणत आणखीन वाढतील..! असो. नवीन वर्षाच्या शुभेच्छा! 

टॅग्स :Kamala Mills fireकमला मिल अग्नितांडवMumbaiमुंबई