शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

प्रादेशिक माध्यमेच नि:स्पृह आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेची राखणदार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 13:33 IST

मुख्य प्रवाहातील हिंदी-इंग्रजी माध्यमांनी बहुतांशवेळा निराशाच केलेली आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक माध्यमांची कार्यक्षमता मला फार महत्त्वाची वाटते.

दर्डा कुटुंबीयांशी माझा दीर्घकाळचा अनुबंध आहे. इंदिरा गांधी यांना प्रथम भेटण्याची संधी मला १९७० साली नागपुरात मिळाली. त्यावेळी विजय दर्डा हे युवक काँग्रेसचे काम करत असत. त्यांचे वडील जवाहरलाल दर्डा हे तर खूप आधीपासूनच काँग्रेस पक्षाशी जोडले गेले होते. त्या काळात इंदिरा गांधी देशात भूमी सुधारणेचा कार्यक्रम राबवत होत्या. १९७०, १९७१ आणि १९७२ ही ती २-३ वर्षे. भूमी सुधार हा या काळात काँग्रेस पक्षाचा मुख्य कार्यक्रम होता.

विजय दर्डा यांनी नागपूरमध्ये या विषयावर एक परिषद आयोजित केली. हैदराबादचा निजाम कॉलेजमधला एक तरुण विद्यार्थी म्हणून मी या परिषदेला हजर होतो. काही जणांना इंदिराजींशी संवाद साधण्याची संधी मिळाली, त्यात मी होतो. दर्डा कुटुंबाशी माझे नाते हे इतके जुने आहे. व्यावसायिक दृष्ट्यासुद्धा गेली २० वर्षे मी या कुटुंबाशी जोडला गेलो आहे.गेली अनेक वर्षे मी विजय दर्डा यांच्या स्तंभलेखनाचा वाचक आहे. देशाच्या विविध भागात विजय दर्डा यांच्यासारख्यांचे मतप्रतिपादन फार महत्त्वाचे आहे. कारण देश पातळीवरील मुख्य प्रवाहातील (मुख्यत: हिंदी-इंग्रजी) माध्यमांनी माझ्यासारख्या वाचकांची बहुतांशवेळा निराशाच केलेली आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक माध्यमांची कार्यक्षमता आणि त्यात प्रसिद्ध होत असलेले लेखन मला महत्त्वाचे वाटते.

गेली वीसेक वर्षे मी हे वाचत आलो, त्यात मला भरीव अशी परिपक्वता, समतोल सततच दिसला आहे. विजय दर्डा पक्षपाती भूमिका  घेत नाहीत. त्यांच्या लेखनात व्यावसायिक वस्तुनिष्ठता असते. त्यांचे कुटुंब गेली कित्येक वर्ष काँग्रेसबरोबर जोडले गेलेले असले तरी स्तंभलेखन करताना विविध विषयांकडे ते वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून पाहतात. त्यांच्यासारखे लोक माध्यमांमध्ये आहेत, हे आपले भाग्यच! सगळेच काही संपलेले नाही, याचा दिलासाच या अशा लेखनाच्या निमित्ताने सातत्याने मिळत असतो.

दुसरे म्हणजे आम्ही दोघेही देशाच्या एकाच भागातून आलो आहोत हेही मला सांगितले पाहिजे. स्वतंत्र तेलंगणाची स्थापना झाली तेव्हा विदर्भाच्या वाट्याला हे भाग्य आले नाही, याची खंत त्यांनी एका स्तंभातून व्यक्त केली. आम्ही काय आहोत, याची चुणूक मध्य भारतातून आलेल्या सगळ्याच लोकांमध्ये पाहायला मिळते. गांधीजी वर्ध्याला गेले आणि विनोबा भावे योगायोगाने तेथे आले असे मला मुळीच वाटत नाही. गांधीजी आणि विनोबाजी या दोघांनाही विदर्भाच्या भूमीनेच ओढून घेतले असले पाहिजे. हा हृदयस्थ प्रदेश देशाच्या वैविध्याचे प्रतिबिंब दर्शवितो. महाराष्ट्र एकाचवेळी मागासलेला आणि त्याचवेळी पुढारलेलाही आहे. विदर्भ प्रदेश अजूनही आपले अनेकत्व सांभाळून आहे. 

प्रादेशिक माध्यमांबद्दल माझ्या मनात खास स्थान आणि आस्थाही आहे. मी दैनिकाचा कारभार पाहत होतो त्यावेळी प्रादेशिक बातमीदारांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न मी सातत्याने केला. ‘लोकमत’मधल्या एका पत्रकाराला मी अलीकडेच भेटलो. मी पंतप्रधानांच्या कार्यालयातर्फे माध्यमांशी संपर्क आणि संवादाचे काम पाहत होतो, त्यावेळी ते मला भेटले होते. प्रादेशिक माध्यमांच्या पत्रकारांशी माझी गाठभेट सततच होत असते. निस्पृह आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेचा ध्वज उत्तुंग फडकावत ठेवल्याबद्दल मी लोकमत समूहाचे अभिनंदन करतो.संजय बारु, राजकीय भाष्यकार

टॅग्स :LokmatलोकमतVijay Dardaविजय दर्डा